शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

हरदोली येथील शासकीय धान खरेदी केंद्र बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2017 23:55 IST

खरेदी विक्री संस्थेच्या अखत्यारीत असणाºया हरदोली येथील गोडावूनच्या दारात शेतकºयांनी धानाची पोती विक्रीसाठी ठेवली आहेत.

ठळक मुद्देधानाची सुरक्षा नाही : गोदामाच्या प्रवेशद्वारात धानाची पोती, व्यवस्थापनाचे दुर्लक्ष

आॅनलाईन लोकमतचुल्हाड (सिहोरा) : खरेदी विक्री संस्थेच्या अखत्यारीत असणाºया हरदोली येथील गोडावूनच्या दारात शेतकºयांनी धानाची पोती विक्रीसाठी ठेवली आहेत. या पोतींची सुरक्षा करणारी यंत्रणा नाही. यामुळे धानाची पोती चोरी होण्याची शक्यता आहे. शासकीय धान खरेदी केंद्र बंद असल्याची माहिती मिळाली आहे.तुमसर -बपेरा राज्य मार्गावर असणाºया हरदोली गावात खरेदी विक्री संस्थेचे गोडावून आहे. या गोडावूनच्या प्रांगणात अनेक वर्षापासून शासकीय धान खरेदी केंद्र सुरु करण्यात येत आहे. यामुळे शेतकरी या गोडावूनच्या दारात धानाची पोती विक्रीकरिता ठेवत आहे. परंतु यंदा या गोडावूनच्या परिसरात शासकीय धान खरेदी केंद्राला मंजुरी देण्यात आली नाही. या शिवाय खरेदी विक्री संस्थेच्या अखत्यारीत असणारे गोडावून भाडे तत्वावर देण्यात आले नाही. यामुळे गोडावूनचे प्रवेशद्वारात असणारे धानाची पोती सुरक्षित नाही. हरदोली गावात शासकीय धान खरेदी केंद्राला मंजुरी देण्यात आली आहे. अन्य संस्थेला मंजुरी मिळाल्याने त्यांनी खासगी गोडावून भाड्याने घेतली असल्याने या खरेदी केंद्राची माहिती शेतकºयांना नाही. या संस्थेने १,४०० क्विंटल धानाची खरेदी केली असल्याची माहिती मिळाली आहे. या धान विक्रीचे चुकारे अद्याप शेतकºयांना प्राप्त झाले नाही. यामुळे चुकाºयासाठी शेतकºयांची ओरड सुरु झाली आहे. दरम्यान गोडावूनचे प्रांगणात उघड्यावर ठेवण्यात आलेल्या धानाची नासाडी सुरु झाली आहे. अनेक पोते नासधुस झाली आहे. उघड्यावर असणाºया धानाचे कुणी वाली नाही, असे वास्तव आहे. शेतकºयांनी ठेवलेल्या धानाची पोती सुरक्षित ठेवणारी यंत्रणा नाही. या गोडावूनचे प्रांगणात धान खरेदी केंद्र मंजुर नसल्याने ठेवण्यात आलेल्या धानाची पोती सुरक्षित करण्याचा प्रश्नच नाही, अशी माहिती मिळाली आहे. याशिवाय गोडावूनच्या प्रवेशद्वारात असणाºया धानाची पोती सुरक्षित करण्याची जबाबदारी शेतकºयाची असल्याचे सांगण्यात येत आहे. सुरुवातीपासून शेतकरी अडचणीत आहे. विलंबाने धानाची रोवणी केली. धानाला मावा, तुडतुडा या रोगाने फस्त केले. थोड्याफार धानाची विक्री करण्यासाठी नेले असता या धानाला वाºयावर सोडण्यात आहे. धान खरेदी केंद्र बंद असल्याने खुल्या आभाळाचे छत्रछायेत असणाºया धान पोत्याची सुरक्षा ऐरणीवर आली आहे. खासगी घरी धान खरेदी केंद्र सुरु असले तरी यासंदर्भात शेतकरी अनभिज्ञ आहेत. धानाचे खरेदी केंद्राचे स्थान बदलले आहे. संस्था नवीन आहे. यामुळे संस्थेने गावात जनजागृती करण्याची आवश्यकता असताना तसे प्रयत्न सुरु करण्यात आले नाही. अंदाजे ८०० ते ९०० धानाची पोती बेवारस सोडण्यात आली आहे. गोडावूनचे प्रांगणात धान खरेदी केंद्र सुरु होण्याची प्रतीक्षा शेतकºयांना आहे. दिवस असताना धान खरेदी केंद्र संदर्भात शेतकरी माहिती काढण्याचा प्रयत्न करीत आहेत. परंतु रात्री या पोत्यांची सुरक्षा कुणी करावी असा सवाल आहे. या गोडावून परिसरात धान खरेदी केंद्र धारकांनी माहिती व सूचना फलक लावले नसल्याने शेतकरी संभ्रमात असून तात्काळ धान खरेदी केंद्र सुुरु करण्याची मागणी होत आहे.हरदोलीचे शासकीय धान खरेदी केंद्राचे संदर्भात संभ्रम निर्माण झाला आहे. दारात असणारी धानाची नासाडी होत असल्याने प्रचंड नुकसान सोसावे लागणार आहे. या पोत्याचा तात्काळ मार्ग काढण्यात यावे.-योगराज टेंभरे, तालुका महासचिव, शिवसेना, रनेराहरदोलीचे धान खरेदी केंद्रात बंद अवस्था आहे. फक्त १४०० क्विंटल धान खरेदी करण्यात आली असून चुकारे अडले आहे.-बालू कटरे, युवा शेतकरी, हरदोली.