शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

महिला सक्षमीकरणासाठी शासन प्रशासन सरसावले

By admin | Updated: August 9, 2016 00:37 IST

समाजात महिलांना सन्मान मिळावा. समाजाच्या बदलात महिलांनी समान सहभाग मिळावा....

लाखनी तालुक्यात जनजागृती कार्यक्रम : महिलांची लक्षणीय उपस्थितीपालांदूर : समाजात महिलांना सन्मान मिळावा. समाजाच्या बदलात महिलांनी समान सहभाग मिळावा. शासनाच्या विविध योजनात पुरुषांबरोबरीचे हक्क स्त्रियांनाही मिळावे. स्त्रियांचे आर्थिक सामाजिक, राजकीय, धार्मिक शोषण थांबावे,या उदात्त हेतूने लाखनी तालुकाभर महसूल सप्ताहाच्या प्रसंगाने २२ तलाठी साझ्यात कार्यक्रमाची रेलचेल होती. यात बचतगट, विद्यार्थीवर्ग, आरोग्य विभाग, महसूल, महिला बालकल्याण विभाग, पंचायत समिती व तालुक्यातील सर्व विभागाचे प्रमुखांनी सहभाग नोंदवित कार्यक्रम यशस्वी केला.तालुक्याला स्वप्नदीप सभागृहात कार्यक्रम घेण्यात आला. यात आमदार राजेश काशीवार, अप्पर जिल्हाधिकारी प्रदीप डांगे, उपजिल्हाधिकारी अशोक लटारे, जिल्हापुरवठा अधिकारी बेंडे, खनिकर्म आधिकारी नेताम, उपविभागीय अधिकारी दिलीप तलमले, जिल्हा परिषद अध्यक्ष भाग्यश्री गिल्लोरकर, पंचायत समिती सभापती रजनी आत्राम, नगरपंचायत अध्यक्षा भिवगडे, तहसिलदार साकोली, लाखांदूर, लाखनीचे राजीव शक्करवार तसेच सर्व विभागाचे तालुका प्रमुख हजर होते. लक्ष्मीमुक्ती योजनेअंतर्गत सातबारा उता-यावर पुरुषांबरोबरच महिलांचा मालकी हक्काची नोंद वारसान नोदंणीत महिलांच्या नावाचा समावेश महिला खातेदारांची अभिलेख विषयाची प्रकरणे निकाली काढणे, रोहयो अंतर्गत महिलांकरिता जॉबकार्ड मार्गदर्शन, शिधापत्रिकेवर कुटूंबप्रमुख म्हणून महिलांची नोंद, १८ वर्षे पुर्ण झालेल्या मुलींची मतदार नोंदणी, शाळा, महाविद्यालयातील मुलींना विविध दाखल्यांचे वितरण व मुलींच्या आत्मरक्षणाकरिता पोलीस विभागाच्यावतीने कराटे प्रशिक्षणाची सोय आदी उपक्रमावर मान्यवरांनी मार्गदर्शन केले. पालांदूर परिसरात पालांदूर, किटाडी, गुरठा, इसापूर (गोंडेगाव) या तलाठी मुख्यालयात महिला सक्षमीकरण मेळावे पार पडले. याकरिता तलाठी नरेश पडोळे, एस. जी. अकनरवार, दिपा डहाट, आर. जी. देशमुख, मंडळ अधिकारी टिकेश्वर गि-हेपुंजे यांनी सहकार्य केले.लाखनी येथील मेळाव्यात लाभार्थ्यांना १२ सोलर कंदिल, ३ ताडपत्री, ३ पंपसेट, राष्ट्रीय कुटूंब अर्थसहाय्याचे प्रत्येकी २० हजाराचे ३९ लाभार्थ्यांना धनादेश देण्यात आले. तसेच जेष्ठ नागरिक ओळखपत्र घरकुलचे धनादेश, कुटूंबप्रमाणपत्र, अधिवास प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. प्रास्ताविक तहसिलदार राजीव शक्करवार, आभार ना. तहसिलदार अश्विनी जाधव यांनी केले. कार्यक्रमाकरिता सर्व महसूल कर्मचारी व इतर कर्मचा-यांनी सहकार्य केले. (वार्ताहर)