शहरं
Join us  
Trending Stories
1
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
2
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
3
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
4
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
5
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
6
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
7
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
8
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
9
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
10
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
11
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
12
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
13
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
14
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
15
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
16
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
17
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
18
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
19
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
20
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण

सरकारने केला शेतकरी, बेरोजगारांच्या स्वप्नांचा चुराडा

By admin | Updated: May 30, 2017 00:23 IST

वाढती बेरोजगारी, शेती व उद्योगांची पिछेहाट या पार्श्वभूमीवर मोदी सरकार तीन वर्षांचा जल्लोष साजरा करीत आहे.

बंडूभाऊ सावरबांधे : भंडाऱ्यात काँग्रेसचे धरणे लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : वाढती बेरोजगारी, शेती व उद्योगांची पिछेहाट या पार्श्वभूमीवर मोदी सरकार तीन वर्षांचा जल्लोष साजरा करीत आहे. शासनाने शेतकरी व बेरोजगारांच्या स्वप्नांचा चुराडा केला. देशातील बंधुभाव पायदळी तुडवून देशाला मागे नेण्याचे काम हे केंद्र व राज्य शासन करीत आहे, असा आरोप माजी राज्यमंत्री बंडुभाऊ सावरबांधे यांनी केला. शासनच्या निषेधार्थ येथील त्रिमूर्ती चौकात काँग्रेसच्यावतीने आयोजित आंदोलनात ते बोलत होते. यावेळी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नावे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. यावेळी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी शाश्वत विकासाचे फसवे गाजर दाखवून देशभरातील जनतेचा मोदी सरकारने भ्रमनिरास केला आहे. मोदी सरकारला तीन वर्षे पूर्ण झाल्याबद्दल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसतर्फे निषेध केला.देशातील नागरिकांना भूलथापा देऊन केंद्रात मोदी सरकार सत्तेवर आले. हे सरकार सत्तेवर येऊन तीन वर्ष झाले. परंतु, निवडून येण्यापूर्वी मोदी यांनी जनतेला जी आश्वासने दिली, ती आश्वासने पूर्ण होऊ शकलेली नाही. शेतकरी दररोज आत्महत्या करीत असून महागाई वाढली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांचा भारतीय जनता पक्षवरील तसेच सरकारवरचा विश्वास उडाला आहे. भाजप सरकार नागरिकांचे प्रश्न सोडविण्यात अपयशी ठरले आहे. येत्या काळात जनता भाजपला धडा शिकवेल, असे मतही उपस्थितांनी व्यक्त केले. निवेदन देताना माजी राज्यमंत्री बंडूभाऊ सावरबांधे, जिल्हाध्यक्ष प्रेमसागर गणवीर, प्रमोद तितिरमारे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष भाग्यश्री गिलोरकर, मनोहर सिंगनजुडे, सभापती विनायक बुरडे, धनराज साठवणे, तालुका अध्यक्ष राजकपूर राऊत, शहर अध्यक्ष सचिन घनमारे, माजी नगराध्यक्ष अमर रगडे, शंकर राऊत, भूमेश्वर महावाडे, सभापती नीलकंठ कायतें, जिल्हा परिषद सदस्य प्रेम वणवे, अनिक जमा पटेल, गणेश निमजे, महेंद्र निंबार्ते, नगराध्यक्ष स्वाती निमजे, मंगेश हुमने, भावना शेंडे, छाया पटले, जनार्धन निंबार्ते, दिनेश बोंदे्रे, प्रा मारबते, प्रीती बागडे, मिसाराम चोपकर, स्नेहल रोडगे,प्रवीण भोंदे, लांजेवार, आशिष पात्रे, जि.प.सदस्य के.के.पंचबुद्धे, एस टी गिऱ्हेपुंजे, अश्विन नाशिने, संजय वरगंटीवार, अरुण श्रीपाद, सुषमा वरगंटीवार, दिनेश गिऱ्हेपुंजे, सचिन फाले, विवेक गायधने उपस्थित होते. संचालन महेंद्र निंबार्ते यांनी तर आभारप्रदर्शन अजय गडकरी यांनी केले.