शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
2
Video : हॉट एअर बलूनमध्ये लागली आग, २१ जण जमिनीवर कोसळले! ८ जणांचा जागीच मृत्यू
3
IND vs ENG : बुमराह एकटा नडला! फिल्डिंगवेळी गडबड घोटाळा; ओली पोपच्या सेंच्युरीसह दुसरा दिवस इंग्लंडचा
4
इराणवर मोठा हल्ला; इस्रायलने पुन्हा खामेनेईंचे कमांडर मारले; अणुशास्त्रज्ञाचाही मृत्यू
5
बंकर बस्टर बॉम्ब...! अमेरिकेची एकाचवेळी ६ बी-२ बॉम्बर विमाने झेपावली; इराणमध्ये काहीतरी मोठे घडणार...
6
बुमराहचा मोठा पराक्रम! इंग्लंडच्या मैदानात पाकच्या वसीम अक्रमच्या विक्रमाला लावला सुरुंग
7
सस्पेन्स...! कोण होणार बिहारचा CM? अमित शाह स्पष्टच बोलले, नितिश कुमारांचे टेन्शन वाढवले
8
मोठा खुलासा! राजाचा मृतदेह घरी आणण्यापासून ते अंत्यविधीपर्यंत प्रत्येक क्षणाची खबर सोनमला देत होता राज कुशवाहा अन्... 
9
१४ वर्षांनी लहान असणाऱ्या तरुणाच्या प्रेमात पडली ४५ वर्षांची महिला, पतीला असं संपवलं की कुणाला संशयही आला नाही!
10
"पिक्चर अभी बाकी है…!"; 2029 मधील आपल्या भूमिकेबद्दल नेमकं काय म्हणाले नितिन गडकरी?
11
Superb! पंतच्या खेळीवरील गावसकरांची कमेंट चर्चेत; आधी 'स्टुपिड' म्हणत काढली होती 'अक्कल' (VIDEO)
12
युद्धाच्या सावटाखाली इराण, खामेनेई यांनी निवडले तीन संभाव्य उत्तराधिकारी, पण मुलाचे नाव नाही!
13
बापरे...! आता गो इंडिगोच्या वैमानिकाने मेडे अलर्ट पाठविला; रात्रीची वेळ अन् विमानात प्रवासीही होते...
14
गोदाम फोडणाऱ्या दोघांना अटक; अडीच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त, लातूर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
15
मौसम मस्ताना..! जसप्रीत बुमराहनं पहिल्याच षटकात सलामीवीर Zak Crawley चा केला 'करेक्ट कार्यक्रम'
16
महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे...  
17
कुपवाडजवळ पावणेबारा लाखांची दारू पकडली, आटपाडीच्या दोघांना अटक, स्थानिक गुन्हे अन्वेषणची कारवाई
18
रिलायन्स दरोड्यातील प्रिन्सकुमारला अटक; डेहराडून कारागृहातून ताबा, साथीदारांना दुचाकी पुरवली
19
"दहशत आणि विनाशासाठी इस्रायल दोषी...!", UN मधील अमेरिकेच्या विधानाने सर्वच चकित; व्हिडिओ व्हायरल
20
Viral Video : प्रसिद्धीसाठी काहीही! लाईक्स आणि व्ह्यूजसाठी महिलेनं चक्क बेडकांसोबत बनवला व्हिडीओ

शासकीय निधीची अफरातफर

By admin | Updated: September 6, 2015 00:39 IST

पवनी तालुक्यातील मोखारा येथील ग्राम आरोग्य पोषण पाणी पुरवठा व स्वच्छता समितीला सन २०१३-१४ व सन २०१४-१५ या दोन वर्षी प्राप्त झालेल्या सहा रुपयांच्या निधीचा खर्च ...

पत्रपरिषद : सरपंच म्हणतात, आरोप बिनबुडाचेपवनी : पवनी तालुक्यातील मोखारा येथील ग्राम आरोग्य पोषण पाणी पुरवठा व स्वच्छता समितीला सन २०१३-१४ व सन २०१४-१५ या दोन वर्षी प्राप्त झालेल्या सहा रुपयांच्या निधीचा खर्च न करता तो निधी सरपंचा संध्या वासनिक यांनी स्वत:कडे ठेवून गावाच्या विकासाकरिता आलेल्या निधीचा अपहार केला, असा आरोप ग्राम मोखारा येथील सामाजिक कार्यकर्ते गिरीश नखाते, जागेश्वर पडोळे व राजू नखाते यांनी एका पत्रपरिषदेत केला. निधीच्या गैरवापराबद्दल १५ आॅगस्ट रोजी झालेल्या ग्रामसभेत प्रश्न विचारण्यात आला. या विषयावर चर्चा करण्यात आली. तेव्हा खात्यातील निधी खर्च झाला हे दाखविण्याकरिता आपण स्वत: जवळ ही रक्कम ठेवल्याचे सरपंचांनी ग्रामसभेत मान्य केले. तसा खुलासा त्यांनी ग्रामसभेत केला. गावाच्या सरपंचा या समितीच्या अध्यक्षा व अंगणवाडी शिक्षिका या समितीच्या सचिव आहेत. सरपंचांनी स्वत: आग्रह करून हे पद आपल्याकडे मागून घेतल्याचा आरोप देखील त्यांनी केला. सरपंचांच्या उत्तराने आपण समाधानी नसून हा एक प्रकारे भ्रष्टाचार व मनमानी कारभार आहे. गावातील लहान मुलांच्या व लोकांच्या आरोग्याशी खेळण्याचा हा प्रकार आहे. याची गांभीर्यपूर्वक दखल घेऊन तात्काळ चौकशी करावी व गावकऱ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी त्यांनी पत्रपरिषदेत केली. गावकऱ्यांच्या सह्या असलेल्या निवेदनाच्या प्रती त्यांनी जिल्हा परिषद अध्यक्ष, जिल्हा परिषदचे मुख्य कार्यपालन अधिकारी , खंडविकास अधिकारी पवनी, पंचायत समिती सभापती पवनी व वैद्यकीय अधिकारी पवनी यांना दिलेल्या आहेत. (तालुका प्रतिनिधी)