विविध दाखल्यांचे वाटप : लाखनी येथे कर्मचाऱ्यांचा सन्मानलाखनी : महसुल दिनाच्या निमित्ताने शासकीय कर्मचाऱ्यांचा सन्मान करुन त्यांची कार्यकुशलता वाढविण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचे तहसीलदार एस.जी. समर्थ यांनी सांगितले. महसुल कर्मचाऱ्यांप्रमाणेच इतर शासकीय विभागाच्या कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्याचा उपक्रम प्रथमच राबविण्यात येत आहे. स्वत:मधील कार्यक्षमता ओळखून जनतेच्या समस्या सोडविण्याचा प्रयत्न करावा व उत्कृष्ट सेवा प्रदान करण्याचे आवाहन तहसीलदार समर्थ यांनी केले.स्थानिक तहसील कार्यालयाच्या सभागृहात पंचायत समिती व पोलीस स्टेशन यांच्या सहकार्याने महसुल दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या निमित्ताने कुटुंब अर्थसहाय्य योजनेचे धनादेश व शासकीय दाखल्यांचे वाटप कार्यक्रमाचे आयोजन केले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तहसीलदार एस.जी. समर्थ उपस्थित होते. अतिथी म्हणून खंडविकास अधिकारी हेमंत मेहर, पोलीस निरीक्षक जयवंत चव्हाण, नायब तहसीलदार सुरेश शिंदे, खडसे, कृषी अधिकारी एम.के. जांभुळकर, नायब तहसीलदार के.के.दोनोडे उपस्थित होते.प्रास्ताविक तलाठी गेडाम यांनी केले. याप्रसंगी पाहुण्यांच्या हस्ते तहसील कार्यालयातील कर्मचारी, तलाठी, पंचायत समितीचे कर्मचारी व पोलीस स्टेशनच्या उत्कृष्ट सेवा बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला.कुटुंब अर्थसहाय्य योजनेअंतर्गत ललिता उईके, सिंधु मांढरे, रुस्तमा धारगावे, अनिता इळपाते, अनुसया डोळस, शुद्धमता मेश्राम, तुळसा पडोळे, सुनीता गजबे, लता पेटकुले, आशा कनोजे, वाघाये, मेश्राम, मयुरी कोसलकर, नंदरधने यांना धनादेश देण्यात आले. निवडणूक कार्यात यशस्वी भूमिका पार पाडलेले बी.एल.ओ. ओ.रा. शेंडे, जी.के. खंडाईत, एफ.आर. सेलोकर यांचा प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला. सुवर्ण जयंती राजस्व अभियान अंतर्गत आबादी प्लॉटचे पट्टे वाटपपत्र व ज्येष्ठ नागरिक ओळखपत्राचे वितरित करण्यत आले.मार्गदर्शनपर भाषणात ठाणेदार चव्हाण यांनी कर्मचाऱ्यांनी लोकांचे प्रश्न सोडविण्याकडे पुढाकार घ्यावे, आपण जनतेचे सेवक आहे. जनता आपली मालकी आहे. कोणत्याही परिस्थितीत जनतेच्या हिताचा विचार करुन निर्णय घेण्याचे आवाहन चव्हान यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन एन.एच. गोटेफोडे यांनी केले. आभारप्रदर्शन आकनुरवार यांनी केले. (तालुका प्रतिनिधी)
शासकीय कर्मचाऱ्यांनी कार्यक्षमता वाढवावी
By admin | Updated: August 4, 2014 23:35 IST