शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

शासन शेतकऱ्यांच्या संपाबाबत गंभीर नाही

By admin | Updated: June 3, 2017 00:21 IST

आपल्या न्याय्य मागण्यांसाठी शेतकरी बांधवांनी राज्यव्यापी संप सुरु केला आहे. शेतकऱ्यांना विविध पक्ष व संघटना सशर्त पाठिंबा देत आहेत.

नरेश डहारे यांचा आरोप : कर्जमुक्ती करणे गरजचेलोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : आपल्या न्याय्य मागण्यांसाठी शेतकरी बांधवांनी राज्यव्यापी संप सुरु केला आहे. शेतकऱ्यांना विविध पक्ष व संघटना सशर्त पाठिंबा देत आहेत. कृषी प्रधान भारत देशातील व पुरोगामी विचारसरणीच्या महाराष्ट्र राज्यातील शेतकरी बांधवांवर संपावर जाण्याची वेळ यावी हे दुर्दैव असून सत्ताधाऱ्यांचे नाकर्तेपण ठरते. दस्तुरखुद्द मुख्यमंत्री शेतकरी बांधवांच्या समस्या सोडविण्याबाबत गंभीर नसून हे शासन भारतीयांचे की इंग्रजांचे की अन्य कोणाचे असा प्रश्न उपस्थित करण्यात येत असून शेतकरी बांधवांच्या संपाला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा सशर्थ पाठींबा असून वेळप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी रस्त्यावर उतरून जिल्हाभर आंदोलन करेल. वेळप्रसंगी खासदार, आमदार व मंत्र्यांना गावबंदी करू, या बाबतची संपूर्ण जबाबदारी शासन प्रशासनाची राहील. असा इशारा कृषी सभापती तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नरेश डहारे यांनी दिला आहे.राज्यातील शेतकरी बांधवांच्या शेतमाल हमी भाव मिळत नसल्याने ते आर्थिक संकटात सापडले आहेत. आर्थिक विवंचनेमुळे तसेच सततची नापिकी व कर्जबाजारीपणामुळे कर्जाची परतफेड करता येत नसल्याने नाईलाजास्तव आत्महत्या करावी लागते. हे फार मोठी शोकांतिका आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढणे व त्यांच्या समस्या सोडविण्यास टाळाटाळ करणे, शेतकऱ्यांना वेठीस धरून त्यांना एकाच दावणीला बांधून त्यांची मुस्कटदाबी करणे ही अत्यंत गंभीर व चिंताजनक बाब आहे. शासनाने शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य प्राप्त करून दिले पाहिजे. शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावले पाहिजे. त्यांचा आत्मविश्वास वाढविला पाहिजे. त्यांना सन्मानाने जीवन जगण्याची संधी उपलब्ध करून दिली पाहिजे. परंतु तीन वर्षाच्या काळात शेतकरी हिताचे धोरण झाले नसल्याने, शेतकरी मेटाकुटीस आले असून नागवले जात आहेत. सत्ताधारी केंद्र व राज्य सरकारला शेतकरी बांधवांची चिंता आहे की आणखी कोणाची चिंता आहे याचा जाहीर खुलासा करावा.संपावर जाण्यापूर्वी शासन प्रशासानाने समन्वय साधून व सम्यक विचार करून समाधानकारक तोडगा काढला असता तर शेतकरी बांधवांना संपावर जाण्याची वेळ आली नसती. परंतु शासनाने उलट खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना संपावर जाऊ दिले. यामुळे जनजीवन ढवळून निघत आहे. ही लोकशाही नसून दंडूकशाही आहे, असे दिसून येत आहे. शासन प्रशासनाने शेतकरी बांधवांच्या भावनांचा अंत पाहू नये. सदर संपाबाबद शक्य तितक्या लवकर समाधानकारक तोडगा काढून दिलासा द्यावा; मात्र याकडे शासन प्रशासनाने हेतुपुरस्सर अक्षम्य दुर्लक्ष केले तर याविरोधात नाईलाजास्तव संपूर्ण शेतकरी तुतारी व आसुड घेऊन रस्त्यावर उतरून आंदोलन करतील व वेळप्रसंगी खासदार, आमदार, मंत्र्यांनाही गावबंदी, तालुकाबंदी व जिल्हाबंधी करण्यात येईल असा इशाराही नरेश डहारे यांनी दिला आहे.