शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
6
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
7
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
8
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
9
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
10
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
11
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
12
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
13
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
14
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
15
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
16
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
17
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
18
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
19
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
20
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
Daily Top 2Weekly Top 5

आसोला मेंढा तलावात सोडले गोसेखुर्दचे पाणी

By admin | Updated: September 13, 2015 00:28 IST

पाऊस समाधानकारक पडला नसल्यामुळे पुर्व विदर्भातील शेतकरी चिंतामग्न झालेले आहेत. धानाचे पिक वाळण्याच्या मार्गावर आहे.

पवनी/गोसेखुर्द : पाऊस समाधानकारक पडला नसल्यामुळे पुर्व विदर्भातील शेतकरी चिंतामग्न झालेले आहेत. धानाचे पिक वाळण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे शेतीला गोसीखुर्द धरणाच्या पाण्याने सिंचन होण्याकरीता गोसीखुर्द धरणाच्या उजव्या कालव्यातून मोठ्या प्रमाणात पाणी सोडले जात आहे. ९९ कि.मी. लांबीच्या या कालव्यातून गोसीखुर्द धरणाचे पाणी आज संध्याकाळ पर्यंत चंद्रपूर जिल्ह्यातील आसोलामेंढा तलावात पोहचणार आहे. गोसीखुर्द धरणामुळे सिंचन, पिण्यासाठी पाणीपुरवठा, औद्योगिक पाणीपुरवठा व जल विद्युत निर्मिती होणार आहे. शासनाने ठरविल्या प्रमाणे गोसीखुर्द धरणाद्वारे ‘वैनगंगेचे पाणी शेतकऱ्यांचे अंगणी’ पोहचविण्याचे धोरण आहे.गोसीखुर्द धरणाच्या उजव्या कालव्याचे एकुण ९९ कि.मी. पर्यंतची कामे सुरु असून मातीकाम व बांधकामे बहुतांश पुर्ण झालेली आहेत. या कालव्याच्या कामाची किंमत ५,१८९ कोटी आहे. उजव्या कालव्याद्वारे ६४,३६२ हेक्टर सिंचन क्षमता निर्माण होणार आहे. मार्च २०१५ अखेर ९,४२० हेक्टर सिंचन क्षमता निर्माण झाली आहे. सन २०१५-१६ मध्ये ४,४०२ हेक्टर सिंचनक्षमतेचे उद्दीष्ट आहे. सन २०१४-१५ मध्ये १,२७२ हेक्टर प्रत्यक्ष सिंचन करण्यात आले आहे.शेतीला गोसीखुर्द धरणाचे पाणी मोठ्या प्रमाणात देवून सिंचन करण्याकरीता नियोजन करण्यात येत आहे. या करीता धरणाच्या उजव्या कालव्यातून चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यातील आसोलामेंढा तलावात पाणी सोडण्याचे ठरविण्यात आले. याकरीता मागील आठ दिवसापासून धरणाची सर्व ३३ वक्रद्वारे बंद करून धरणातील जलस्तर वाढविला जात आहे. मागील दोन दिवसांपासून उजव्या कालव्यातून मोठ्या प्रमाणात पाणी सोडले जात आहे. आज शनिवारला सकाळी ११ वाजता ७० कि.मी. अंतरापर्यंत पाणी पोहचले होते. संध्याकाळी ९९ कि.मी. अंतरावरील आसोलामेंढा तलावात पाणी पोहचणार आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात सिंचनाची सोय होणार आहे. (शहर प्रतिनीधी/वार्ताहर)