शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

गोसेच्या बॅकवाॅटरने भंडारा जिल्ह्यातील वरठीत नळाला येतेय काळे-पिवळे पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2022 07:45 IST

Bhandara News गोसे प्रकल्पाच्या बॅक वाॅटरने नळाला काळे - पिवळे पाणी येण्याचा प्रकार मोहाडी तालुक्यातील वरठी येथे गत आठ दिवसांपासून सुरु आहे.

ठळक मुद्दे२० हजारांवर नागरिकांची पाण्यासाठी भटकंती

भंडारा : गोसे प्रकल्पाच्या बॅक वाॅटरने नळाला काळे - पिवळे पाणी येण्याचा प्रकार मोहाडी तालुक्यातील वरठी येथे गत आठ दिवसांपासून सुरु आहे. नाग नदीच्या दूषित पाण्याचा फटका बसत असून, २० हजारांवर नागरिकांना शुद्ध पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. ग्रामपंचायतीने या प्रकाराची तक्रार केल्यानंतर जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा विभागाने बुधवारी वरठीत धाव घेतली.

ग्रामीण पाणीपुरवठा योजनेचे जिल्ह्यातील पहिले जलशुद्धिकरण केंद्र वरठी येथे २०२१मध्ये सुरू करण्यात आले होते. तेव्हापासून जवळपास २० हजार नागरिकांना २,२०० नळजोडणीच्या माध्यमातून शुद्ध पाणी पुरवठा केला जात होता. वैनगंगा नदीच्या तीरावर खमाटा येथे नळ योजनेची विहीर असून, पाचगाव फाट्यावर जलशुद्धिकरण केंद्र आहे. मात्र, गत आठ दिवसांपासून नळाला येणारे पाणी पिवळसर - काळसर असल्याचे दिसून आले. सुरुवातीला नागरिकांनी याकडे दुर्लक्ष केले. त्यानंतर हा प्रकार सुरू असल्याने ग्रामपंचायतीकडे तक्रार देण्यात आली. ग्रामपंचायतीने तत्काळ दखल घेत जलशुद्धीकरण यंत्रणेत बिघाड झाला असेल म्हणून शोधाशोध केली. तुरटी, ब्लिचिंग पावडर टाकून पाणी शुद्ध करण्याचा प्रकार केला. परंतु काहीही उपयोग झाला नाही.

अधिकाऱ्यांकडून पाहणी

ग्रामपंचायतीने जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाकडे मंगळवारी तक्रार दाखल केली. बुधवारी अभियंता दिनेश देवगडे, शाखा अभियंता खेडकर यांनी वरठी येथे येऊन जलशुद्धिकरण केंद्राची पाहणी केली. यावेळी सरपंच श्वेता येळणे, सदस्य सीमा डोंगरे, ग्रामविकास अधिकारी दिगांबर गभणे आदी उपस्थित होते. जलशुद्धिकरण केंद्राच्या पाण्यावरही हिरवा तवंग आला असून, पाणी काळसर दिसत आहे. बॅक वाॅटरमुळेच वरठी येथे दूषित पाणी पुरवठा होत असल्याची माहिती पुढे आली. पाण्यात लोहाची मात्रा अधिक असून, ब्लिचिंगच्या संपर्कात आल्याने पाणी पिवळे होत असल्याची माहिती देण्यात आली.

पाण्याची पर्यायी व्यवस्थाच नाही

वरठी हे २० हजार लोकसंख्येचे गाव असून, येथे सनफ्लॅग हा मोठा उद्योग आहे. नळयोजनेचे पाणी येथील नागरिकांसाठी एकमेव पर्याय आहे. गावात असलेल्या विहिरी आणि बोअरवेलचे पाणी पिण्यायोग्य नसल्याने नागरिकांना आता पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.

टॅग्स :water pollutionजल प्रदूषण