शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई सेंट्रल स्टेशनचे नाव बदलले जाणार, नवे नाव काय असणार? CM देवेंद्र फडणवीस म्हणाले...
2
हरयाणा,गोव्यासह लडाखला मिळाले नवे राज्यपाल; घोष, गुप्ता आणि गजपती राजू यांची राष्ट्रपतींकडून नियुक्ती
3
IND vs ENG : गौतम गंभीरने Live सामन्यात दिली शिवी; अपशब्द उच्चारतानाचा Video झाला व्हायरल
4
पाकिस्तान जय श्रीरामच्या घोषणेने दुमदुमले; कराचीत मुस्लिम कलाकारांकडून रामलीलेचे सादरीकरण
5
"सरकार आणि उद्योगपतींच्या फायद्यासाठी जनसुरक्षा कायदा, काँग्रेस त्याची प्रत्येक जिल्ह्यात होळी करणार”, हर्षवर्धन सपकाळ यांची घोषणा
6
नो टॅक्स, नो टेन्शन! 'या' देशांमध्ये श्रीमंत लोकही भरत नाहीत एक रुपयाही कर, मग पैसा कुठून येतो?
7
खऱ्या आयुष्यातही सचिवजी अन् रिंकी प्रेमात? सानविकाच्या 'त्या' उत्तरावर जितेंद्र लाजला
8
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा जास्त उकळणं आरोग्यासाठी हानिकारक, कारण...
9
वैभव सूर्यवंशीची स्फोटक फलंदाजीनंतर आता गोलंदाजीत कमाल! युवा टीम इंडियाकडून कसोटीत रचला इतिहास
10
"नाव घ्यायला भीती वाटते तर बोलू नका" ; आदित्य ठाकरेंनी चड्डी बनियन गॅँगचा उल्लेख करताच राणे संतापले
11
घरभाडं, वीजबिल भरायला पैसे नव्हते, राष्ट्रीय खेळाडू बनले चोर, व्यापाऱ्याचं अपहरण करून लुटले, त्यानंतर... 
12
भाचाच्या प्रेमात वेडी झालेली बायको पळाली, घरी आणण्यासाठी गेलेल्या नवऱ्याचा हार्ट अटॅकने मृत्यू
13
भारताच्या शेअर बाजारात घसरण, पण पाकिस्तानच्या स्टॉक मार्केटमध्ये तुफान तेजी; १,३५,००० अंकांच्या पार, कारण काय?
14
"पहाटे ४ वाजता उठतो, रात्री ८ ला झोपतो", लेकाची शिस्त पाहून आर माधवनही होतो दंग; म्हणाला...
15
IND vs ENG :दुखापतग्रस्त पंत 'डिफेन्स' करताना फसला! जोफ्रा आर्चरची 'वेदनादायी' गोलंदाजी
16
Viral Video: चक्क माणसासारखं दोन पायावर उभा राहिला बिबट्या; स्वत: बघितल्याशिवाय विश्वास बसणार नाही!
17
"राज ठाकरे मराठीच्या नावावर द्वेष पसरवतात, त्यांच्यावर रासुका लावा’’, मुंबई हायकोर्टातील वकिलांची मागणी  
18
DSP सिराजला इंग्लिश बॅटर बेन डकेटशी पंगा घेणं पडलं महागात! ICC नं फाडलं 'चलान'
19
मुंबई-पुण्यात घरं घेणाऱ्यांसाठी गुडन्यूज! मालमत्ता विक्रीत ३०% घट; 'या' कारणामुळे किमती खाली येणार!
20
भयंकर! कर्ज फेडण्यासाठी, विम्याचे २ कोटी हडपण्यासाठी मित्राची केली हत्या, जिवंत जाळलं अन्...

गोसेखुर्द प्रकल्पाच्या बोगद्याचे काम पूर्णत्वाच्या मार्गावर

By admin | Updated: May 22, 2017 00:51 IST

इंदिरा सागर महत्वाकांक्षी गोसेखुर्द प्रकल्पाचे बोगद्याचे शिल्लक कामे पूर्ण करण्यासाठी पाणी साठा कमी

धरणाची पातळी २३८ मीटरवर : नऊ दिवसांचा कालावधी शिल्लक प्रकाश हातेल । लोकमत न्यूज नेटवर्क चिचाळ : इंदिरा सागर महत्वाकांक्षी गोसेखुर्द प्रकल्पाचे बोगद्याचे शिल्लक कामे पूर्ण करण्यासाठी पाणी साठा कमी करण्यात आले ते चार बोगद्याची कामे मे महिन्याच्या अखेरीस पूर्ण होणार असल्याची माहिती आहे. २२ एप्रिल १९८८ मध्ये गोसे धरणाची निर्मिती झाली. पायथ्याजवळ पाणी वाहुन जाण्याकरिता चार भुमिगत बोगद्याची ‘कडूळ’ निर्मिती करण्यात आली होती आज हे प्रकल्प पूर्णपणे तयार असून शासनाने पाणी अडविण्याची भूमिका घेतल्याने सर्वत्र जलसाठा निर्माण झाला आहे. धरणाचे २४२ मीटरचा दुसरा टप्पा अर्थात २० टीएमसी उद्दिष्ट पूर्ण केले गेले होते. या वर्षी त्यात वाढ करुन २४२.५०० मीटरपर्यंत जलसाठा साठविण्यात येणार आहे. मात्र धरणाच्या गेट क्रमांक ८, ९ व १० वरील चार भुमिगत बोगदे बंद करावयाचे असल्याने धरणातील जलसाठा टप्प्याटप्प्याने कमी केले जात आहे. आजमितीला धरणातील पाण्याची पातळी २३८ मिटर आहे. तर धरणाचे ३३ वक्रद्वारे बंद केले असून आवश्यकतेनुसार पाणी ८ ते १० दिवसांनी पाणी सोडले जात आहे. व कंडूळ बोगद्याचे कामे वक्रद्वाराने पाणी अडवून बोगद्याचे काम केली जात असून मे महिन्याचे शेवटपर्यंत पूर्ण कामे होणार असल्याची विश्वसनीय माहिती आहे. धरणाचा मुख्य कालवा, शाखा कालवा, वितरिका, लघु कालवा आदी कालव्याचे मुख्य कालव्यापासून साडे आठ किमी पर्यंतची कामे जुनपर्यंत पूर्ण करण्याचे शासनाचे निदे्रश असल्याने कामे युध्दपातळीवर सुरु आहेत. गोसे प्रकल्पाच्या पाण्यावर वीज निर्मिती करणाऱ्या पॉवर हाऊसवचे कामे अंतिम टप्प्यात आली असून धरणाच्या पाळी शेजारी आली आहेत. त्या पॉवर हाऊसच्या कामासाठी पुन्हा पाण्याची पातळी कमी करण्यात येणार आहे. त्यावेळी पॉवर हाऊस व बोगद्यांची शिल्लक कामे पूर्ण केली जाणार आहेत. डिसेंबर २०१७ ला धरणाचे संचयन पातळी गाठणार आहे. प्रकल्पग्रस्तांच्या डोळ्यात अश्रू ४प्रकल्पाची कामे होताच पाणी अडविण्याची भुमिका शासनाने घेतली. नदी काठावरील प्रकल्प ग्रस्तांना गावे सोडावी लागली. मात्र आजमितीला धरण खाली केल्याने जुने गावाचे दर्शन झाले असून गावातील रस्ते, मंदिरे, चौकटी वरील वटवृक्ष, पडलेली घरे जुन्या आठवणी निर्माण करीत असून प्रकल्पग्रस्तांची डोळे पाणावली आहेत. ४धरणाचे कामे पूर्ण होताच शासनाने पाणी अडविण्याची भुमिका घेतली त्यामुळे ५० किमीपर्यंत नदी जलमय झाली होती. तेव्हापासून नागरिकांन नदीचे पात्र पाहिले नव्हते. मात्र आता धरणाचे पाणी कमी केल्याने नदीतील साचलेले घाण पाणी व नदीतील दुषीत पाणी वाहुन गेले आहे तर नागरिकांना वैनगंगेचे दर्शन झाले आहे.