शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

‘गोसेखुर्द’ बळीराजांसाठी दिवास्वप्न

By admin | Updated: September 19, 2015 00:37 IST

महत्त्वाकांक्षी गोसेखुर्द प्रकल्पाचे पाणी भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली व नागपूर या तीन जिल्ह्यांना मिळणार आहे.

शेती सिंचनापासून वंचित : चंद्रपूरात जलपूजन तर भंडारात जलसंकटखेमराज डोये आसगाव (चौ.) महत्त्वाकांक्षी गोसेखुर्द प्रकल्पाचे पाणी भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली व नागपूर या तीन जिल्ह्यांना मिळणार आहे. शासनाने हरितक्रांतीचे स्वप्न दाखवून शेतकऱ्यांच्या जमिनी घेतल्यात. मात्र, त्यांना या प्रकल्पाचे पाणी मिळाले नसल्याने हा प्रकल्प त्यांच्यासाठी दिवास्वप्न ठरला आहे.या धरणाचे उजवा व डावा कालव्याच्या पाळीचे काम पूर्ण आहे. या धरणासाठी तालुक्यातील शेतकऱ्यांनी जमिनी शासनाने मागितलेल्या किंमतीत दिल्या. या प्रकल्पामुळे अनेक गावे व कुटुंब विस्तापित झालीत. याच उजव्या कालव्याच्या पाळीतून चंद्रपुर जिल्ह्यातील असोलामेंढा तलावाला मागील आठवड्यात गोसे धरणातून पाणी सोडण्यात आले. त्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील नागरिकांमध्ये आनंदोत्सोव साजरा करण्यात येत आहे. परंतु, हा हरितक्रांतीचा महत्त्वकांक्षी प्रकल्प ज्या पवनी तालुक्यात बांधण्यात आला, तेथील शेतकऱ्यांना या प्रकल्पाचा एक थेंबही मिळाला नसल्याने शेकडो हेक्टरमधील पिके नष्ट होण्याचा दुदैवी प्रसंग ओढवला आहे.पवनी व लाखांदूर या तालुक्यातील डाव्या कालव्याद्वारे पाणी पुरवठा होवून हमखास धानाचे पीक वाचू शकते. परंतु डाव्या कालव्यांना कुठेही गेट लावले नसल्यामुळे व पागोला उपसा सिंचन योजना कार्यान्वित न केल्यामुळे या धरणाच्या पाण्याचा फायदा भंडारा, लाखनी, तालुक्याला होवू शकत नाही. पर्यायाने येथील शेतीतील उभे पीक सिंचनाअभावी हातून जाण्याच्या मार्गावर आहे. डाव्या कालव्यात गोसे धरणाचे पाणी सोडले जात आहे. पंरतु, याचा २५ टक्केही लाभ पवनी, लाखांदूर तालुक्यातील शेतकऱ्यांना होत नाही. त्यामुळे ज्या तालुक्यात हे महाकाय धरण बांधले आहे. त्याच शेतकऱ्यांना फायदा मिळताना दिसत नाही. चंद्रपूर जिल्ह्यात पाणी पोहचले म्हणून तिकडे ‘जलपूजन’ तर प्रकल्पाची मुहुर्तमेढ रोवलेल्या तालुक्यातील शेतीवर ‘जलसंकट’ असा दुजाभाव दिसून येत असल्याने शेतकऱ्यांवर, ‘घरी अळ, अन् पाण्यासाठी लळ’ असा प्रसंग ओढवला आहे.