पवनी तालुक्यातील कोंढा येथे डाव्या कालव्याच्या उपकालव्याच्या भूमिपूजन प्रसंगी ते बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून आमदार नरेंद्र भाेंडेकर, आमदार मनोहर चंद्रिकापुरे, माजी राज्यमंत्री विलासराव श्रृंगारपवार, माजी राज्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नाना पंचबुध्दे, राष्ट्रवादीचे प्रदेश सचिव धनंजय दलाल मंचावर उपस्थित होते. यावेळी लघु कालव्यांच्या ४५ कोटी रुपये किमतीच्या ११ कामांचे भूमिपूजन करण्यात आले. खासदार पटेल म्हणाले, वितरिका पूर्ण झाल्याशिवाय शेतकऱ्यांना लाभ मिळणार नाही. सन २०१५ - १६मध्ये राष्ट्रीय प्रकल्पाचा दर्जा काढून केंद्र सरकारने या भागातील शेतकऱ्यांचा विश्वासघात केला. विकासकामात अडथळे आणणाऱ्यांना आपण धडा शिकवू, असा इशारा दिला. आमदार नरेंद्र भोंडेकर चांगले काम करीत असून, आपण नेहमी त्यांच्या पाठीशी राहू, असेही खासदार पटेल यांनी सांगितले. आमदार नरेंद्र भोंडेकर म्हणाले, गोसे प्रकल्पाच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांनी जमिनी, घरांचा त्याग केला आहे. त्यांचा त्याग वाया जाऊ देणार नाही. प्रकल्पबाधित व लाभक्षेत्रातील शेतकरी यांच्या प्रश्नासाठी आपण प्रयत्न करीत असून, प्रकल्पाच्या उर्वरित कामासाठी सहकार्य करण्याचे आवाहन यांनी केले.
कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष लोमेश वैद्य, जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष सुनील फुंडे, मुकेश बावनकर, विजय सावरबांधे, शिवसेना भंडारा तालुकाप्रमुख अनिल गायधने, पवनी तालुकाप्रमुख विजय काटेखाये, विधानसभाप्रमुख बाळू फुलबांधे, उपतालुकाप्रमुख प्रशांत भुते, राजू ब्राम्हणकर, महिला तालुका संघटक भाग्यश्री गभने, समीर कुर्झेकर, जितू लिचडे, भोजराज वैद्य, जितेश ईखार, सुधाकर साठवणे, प्रकाश मानापुरे, मुन्ना काटेखाये, राजेश तलमले, दिनेश नंदपुरे आदी उपस्थित होते. तालुकाप्रमुख विजय काटेखाये यांनी प्रास्ताविक केले. आशिष माटे यांनी सूत्रसंचालन केले. भाग्यश्री गभने यांनी आभार मानले.