शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
2
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
3
निवडणूक आयोगाने आधारहीन म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, स्पष्टीकरणासह त्या दाव्यातील हवाच काढली
4
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
5
VIRAL : एकमेकांना पाडलं, केस धरून हाणलं; भर बाजारात नवरा-बायकोमध्ये जुंपली!
6
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
7
दीपिका पादुकोणची 'कल्की 2898 एडी' सिनेमातून एक्झिट, कारण आलं समोर
8
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
9
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
10
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी
11
राहुल गांधी यांचा सर्वात मोठा आरोप; मतचोरीचा पुरावा देत 'त्या' लोकांना थेट स्टेजवर बोलावले अन्...
12
सरकारी कर्मचारी-पेन्शनधारकांची दिवाळी होणार गोड! किती वाढणार पगार? मोठी अपडेट समोर
13
बेपत्ता महिला कॉन्स्टेबलची हत्या, कारमध्ये मृतदेह लपवला; आरोपी पोलिसाने सत्य सांगताच अधिकारी हैराण
14
Pune Firing: दुचाकीला साईड न दिल्याचे किरकोळ कारण; कोथरूड परिसरात निलेश घायवळ टोळीकडून गोळीबार, एक गंभीर जखमी
15
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचं 'मत'चोरीला संरक्षण; राहुल गांधी यांचा गंभीर आरोप
16
'ऑपरेशन ३१३'चा भांडाफोड! ३००हून अधिक मदरसा कॅम्प बांधण्याची तयारी होती सुरू, जैशचा मोठा कट उघडकीस
17
सासऱ्याच्या मृत्यूनंतर सून ढसाढसा रडली, संशय येताच पोलखोल झाली; 'ते' सत्य लपवण्यासाठी...
18
महाराष्ट्रातील या मतदारसंघात झाली मतचोरी, हजारो मतदार वाढले, राहुल गांधींचा पुराव्यानिशी सनसनाटी आरोप 
19
सेफ्टीमध्ये 'TATA'च एक नंबर, सलग नवव्या गाडीला मिळालं 5 स्टार रेटिंग; कोणती आहे कार?
20
जगातील सर्वात महान कर्णधार कोण? किरॉन पोलार्डनं 'या' दिग्गजाचं घेतलं नाव!

सिहोरा परिसरात जनावरे खरेदी विक्रीचा गोरखधंदा

By admin | Updated: May 22, 2015 01:08 IST

राज्य शासनाने गो-हत्या बंदीचा कायदा लागू केला असताना छुप्या मार्गाने बैल आणि गाय या जनावरांची कत्तलीसाठी सिहोरा परिसरात खरेदी विक्रीचा गोरखधंदा सुरू आहे.

रंजित चिंचखेडे  चुल्हाड (सिहोरा)राज्य शासनाने गो-हत्या बंदीचा कायदा लागू केला असताना छुप्या मार्गाने बैल आणि गाय या जनावरांची कत्तलीसाठी सिहोरा परिसरात खरेदी विक्रीचा गोरखधंदा सुरू आहे.आंतर राज्यीय सिमेवर असणाऱ्या सिहोरा परिसरात छुप्या मार्गाने जनावरे खरेदी विक्री करणाऱ्या केंद्राचा 'लोकमत'ने शोध घेतला असता धक्कादायक वास्तव उघडकीस आले. या आधी पासून नजिकच्या मध्यप्रदेशात गो-हत्या बंदीचा कायदा लागू करण्यात आल्याने राज्याच्या सिमावर्ती गावातील बैल बाजारात जनावरे विक्रीला आणली जात आहे. परंतु राज्य शासनाने ही कायद्या लागू करताच जनावरांची आयात थांबली आहे. बैल बाजारात शुकशुकाट दिसून येत आहे. यामुळे जनावर खरेदी करणारे माफिया, एजंट आणि दलाल यांचा व्यवसाय अडचणीत आलेले आहे.सिहोरा परिसरात १ आणि मध्यप्रदेशातील सिमावर्ती गावात २ अशा जनावरे खरेदी केंद्राची निर्मिती करण्यात आली आहे. जंगल व्याप्त गावात ही केंद्र आहेत. या केंद्रावर वस्त्या नामक एजंट सक्रिय आहे. सिहोरा परिसरात असणारा हा केंद्र महत्वपूर्ण मानला जात आहे. या केंद्रांवरच जनावरांची साठवणूक केली जात आहे. या जनावरामध्ये गाय आणि बैल यांचा समावेश आहे. हलाखीच्या परिस्थितीत जीवन जगणारा बस्त्या नामक एजंट ३०-४० बैल आणि गाय ही जनावरे एका साठवणूक केंद्रात गोळा करीत आहे.या केंद्रापासून पोलीस प्रशासन अनभिज्ञ असावे असे चित्र निर्माण करण्यात आले आहे. ६ ते ७ फुट उंच भिंती तयार करण्यात आल्या असून या जनावरांना चारा आणि पानी दिले जात नाही. यामुळे या जनावरांची अवस्था वाईट झाली आहे. आठवड्यातून दोन दिवस या जनावरांना विक्रीसाठी काढले जात आहे. कोंबड बाजाराच्या धर्तीवर या व्यवसायाची अंमलबजावणी करण्यात येत आहे. सोमवार, मंगळवार जनावर खरेदीचा दिवस ठेवण्यात आलेला आहे. रविवार आणि बुधवार असे दोनच दिवस या जनावरांची विल्हेवाट लावण्यात येत आहे.मध्यप्रदेशात खरेदी करण्यात आलेली जनावरे या केंद्रावर गुरूवार, शुक्रवार आणि शनिवार दिनी आणली जात आहे. जनावरे खरेदी करणाऱ्या माफियांना या परिसरातून जनावरे विक्री होत नाही. १८ ते २० कि़मी. अंतरावरील रामपूर या गावात बुधवार आणि रविवार दिवस आधीच ही जनावरे पोहचती केली जात आहे.