शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

गोसेच्या अपूर्ण कालव्याने सिंचनाचे स्वप्न धुळीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2019 06:00 IST

पवनी तालुक्यातील गोसे येथे महत्वाकांक्षी गोसेखुर्द प्रकल्पाची उभारणी करण्यात आली. ३७२ कोटी रुपयांचा हा प्रकल्प सध्या १४ हजार ९९९ कोटीवर जाऊन पोहचला आहे. परंतु अद्यापही या प्रकल्पाच्या कालव्याचे काम पूर्णपणे झाले नाही. भंडारा आणि चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकºयांना या प्रकल्पाच्या पाण्याचा मोठा फायदा होऊन समृद्धी येणार असल्याचे सांगितले जात आहे.

ठळक मुद्देलाखांदूर तालुका : कालव्याचे काम पूर्ण होणार तरी केव्हा ?

दयाल भोवते।लोकमत न्यूज नेटवर्कलाखांदूर : पूर्व विदर्भातील शेतकऱ्यांना सुजलाम सुफलाम करणारा आणि राष्ट्रीय प्रकल्पाचा दर्जा मिळालेल्या गोसेखुर्द प्रकल्पाच्या कालव्याचे काम अद्यापही अपूर्ण आहे. त्यामुळे लाखांदूर तालुक्यातील शेतकऱ्यांचे स्वप्न धुळीस मिळाले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून सिंचनाची आस लावून बसलेले शेतकरी कालव्याचे काम पूर्ण केव्हा होणार असा प्रश्न करीत आहेत.पवनी तालुक्यातील गोसे येथे महत्वाकांक्षी गोसेखुर्द प्रकल्पाची उभारणी करण्यात आली. ३७२ कोटी रुपयांचा हा प्रकल्प सध्या १४ हजार ९९९ कोटीवर जाऊन पोहचला आहे. परंतु अद्यापही या प्रकल्पाच्या कालव्याचे काम पूर्णपणे झाले नाही. भंडारा आणि चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकºयांना या प्रकल्पाच्या पाण्याचा मोठा फायदा होऊन समृद्धी येणार असल्याचे सांगितले जात आहे. या धरणाचा डावा कालवा ४२ किलोमीटरचा तर उजवा कालवा ११० किलोमीटरचा आहे.१९८८ सालापासून विविध दिव्यांना सामोरे जात या प्रकल्पाच्या मुख्य धरणाचे काम पूर्ण करण्यात आले. तर डाव्या कालव्याचे काम अद्यापही पूर्ण झाले नाही. डाव्या कालव्यामुळे लाखांदूर तालुक्यातील अनेक गावांना सिंचनासाठी पाणी मिळणार होते, परंतु ही समस्या सुटायला तयार नाही. मोहरना, खैरना, दोनाड, नांदेड, इटाण येथील शेतकºयांनी कार्यकारी अभियंत्यांना निवेदन दिले. धान उत्पादक शेतकºयांना या भागातून गेलेल्या डाव्या कालव्याचे पाणी मिळत नाही. उलट सोडलेले पाणी सरळ चुलबंद नदीत वाहून जाते. याचा फायदा शेतकºयांना होत नाही. त्यासाठी पारी बनविण्यात याव्या, गेटची सुविधा करावी आदी मागण्या करण्यात आल्या. परंतु अद्यापपर्यंत यावर कोणतीही उपाययोजना करण्यात आली नाही. आणखी किती वर्ष या प्रकल्पातील पाण्याची प्रतीक्षा करावी लागेल असा प्रश्न या भागातील शेतकरी करीत आहेत. धान उत्पादक शेतकºयांना या प्रकल्पापासून मोठी अपेक्षा आहे. परंतु विविध कारणाने प्रकल्पाचे पाणी मिळतच नाही.विविध समस्या कायमलोकप्रतिनिधी आणि शेतकºयांनी वारंवार गोसे प्रकल्प प्रशासनाला सिंचनासंदर्भात निवेदने दिलीत. परंतु या समस्यांचे निराकरण झाले नाही. लाखांदूर आणि पवनी तालुक्यातील कालव्यांच्या विविध समस्या कायम आहेत. गेल्या दोन तीन वर्षात समस्या निकाली निघाल्या नाहीत. आणखी अनेक वर्ष सिंचनाच्या पाण्यासाठी शेतकºयांना प्रतीक्षा करावी लागेल हे मात्र तेवढेच खरे.

टॅग्स :Gosekhurd Projectगोसेखुर्द प्रकल्प