शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

गुडमॉर्निंग पथक झाले बेपत्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2019 21:44 IST

स्वच्छतेकडून समृद्धीकडे असा नारा देत साकोली तालुका हागणदारीमुक्त करण्याचा प्रशासनाने निर्धार केला. त्यासाठी गुडमॉर्निंग पथक स्थापन करण्यात आले. उघड्यावर शौचास जाणाऱ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत होऊ लागले.

ठळक मुद्देसाकोली तालुका : स्वच्छ भारत अभियान कागदावरच

संजय साठवणे।लोकमत न्यूज नेटवर्कसाकोली : स्वच्छतेकडून समृद्धीकडे असा नारा देत साकोली तालुका हागणदारीमुक्त करण्याचा प्रशासनाने निर्धार केला. त्यासाठी गुडमॉर्निंग पथक स्थापन करण्यात आले. उघड्यावर शौचास जाणाऱ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत होऊ लागले. या प्रयोगाने नागरिकांच्या मानसिकतेत बदल होऊन शौचालयाचा वापर वाढू लागला होता. मात्र आता अलीकडे या उपक्रमाकडे प्रशासनाने पाठ फिरविली आणि स्वच्छता अभियान केवळ कागदावर राबविले जात आहे. त्यामुळे साकोली तालुक्यात गुडमॉर्निंग पथक आता बेपत्ता झाले आहे.स्वच्छ भारत अभियानांतर्गत साकोली तालुक्यातील गावे ३१ मार्च पर्यंत हागणदारीमुक्त करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न होता. त्या अनुषंगाने संबंधित ग्रामपंचायत व पंचायत समिती प्रशासनाला सूचनाही दिल्या होत्या. घरोघरी शौचालय बांधकाम करणे, शासकीय अनुदान देणे, जनजागृती आदी बाबींवर खर्च करण्यात आला. त्यातीलच महत्वाचा घटक म्हणजे गुडमॉर्निंग पथक होय. या पथकात सरपंच, ग्रामसेवक, आरोग्य सेवक अशा व्यक्तींचा समावेश होता. हे पथक पहाटे ५ ते ८ या वेळात उघड्यावर शौचास जाणाºयांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करीत होते. त्यांना स्वच्छतेचे महत्व पटवून देत होते. या प्रयोगामुळे काहींची गैरसोय झाली होती. मात्र हा प्रयोग काही दिवसाचाच ठरला. त्यानंतर पथकाने पाठ फिरविली आणि नागरिक पुन्हा उघड्यावर जाऊ लागले. नागरिकांच्या मानसिकतेत कोणताही बदल झाला नाही. काही गावात तर शौचालय केवळ कागदोपत्री असून काहींच्या बांधकामाचा दर्जाही निकृष्ट आहे. त्यामुळे गुडमॉर्निंग पथक आता लुप्त झाल्याचे दिसत आहे.प्रशासनाचे तोकडे प्रयत्ननागरिकांच्या मानसिकतेत बदल करण्यासाठी नगरपरिषद, ग्रामपंचायत प्रशासनाने जोरकस प्रयत्न करणे गरजेचे होते. वैयक्तिक लाभाच्या शौचालयाचे बांधकाम दर्जेदार करून सार्वजनिक शौचालयाचे बांधकाम करणे गरजेचे होते. परंतु प्रत्येक योजना राबविताना संबंधित मंडळी अर्थकारण विचारात घेत असल्याचे दिसून आले. शासकीय योजनेचे कुणालाही काही देणे घेणे दिसत नाही. त्यामुळे ही कल्याणकारी योजना फसली असून गावात घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे.सार्वजनिक शौचालयाचा अभावसाकोली ग्रामपंचायतीचे रुपांतर नगरपंचायतीत झाले. ग्रामपंचायतीच्या काळातील सार्वजनिक शौचालय आहे. तीन वर्षात नगरपरिषदेने एकही नवीन सार्वजनिक शौचालय बांधले नाही. परिणामी नागरिक उघड्यावर जात आहे.