शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

भंडारा पोलिसांच्या सतर्कतेने सोनेरी टोळी जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2021 04:39 IST

भंडारा तालुक्यातील विनोद भुजाडे या सराफा व्यवसायीकाची ७५ लाखांचे दागिने असलेली बॅग सोमवारी दुकानासमोरुन लंपास करण्यात आली होती. या ...

भंडारा तालुक्यातील विनोद भुजाडे या सराफा व्यवसायीकाची ७५ लाखांचे दागिने असलेली बॅग सोमवारी दुकानासमोरुन लंपास करण्यात आली होती. या घटनेने संपूर्ण जिल्ह्यात एकच खळबळ उडाली. जिल्हा पोलीस अधीक्षक वसंत जाधव, अपर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती, उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पाटील, स्थानिक गुन्हे शाखेचे जयवंत चव्हाण यांनी घटनास्थळाला भेट दिली. पोलीस अधीक्षक जाधव यांच्या मार्गदर्शनात तपास सुरु झाला. परंतु कोणताही थांगपत्ता लागत नव्हता. पोलिसांनी चोरटे कोणत्या मार्गाने गेले याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. एका सीसीटीव्ही फुटेजमध्ये तीन मिनिटानंतर कुठे गेला हे कळायला मार्ग नव्हता. पोलिसांनी बोरगाव फाटा, चिखली फाटा, कुही मार्ग व इतर ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज तपासले. परंतु थांगपत्ता लागत नव्हता.

चोरटे पळून गेल्याची दिशा निश्चित मिळत नसल्याने पोलिसांनी उलट्या दिशेने प्रवास सुरु केला. चोरटे कोणत्या मार्गाने आले याचा शोध घेतला. यावेळी माथनी टोल नाक्यावर त्यांचा माग मिळाला. त्यानंतर पारडी, कळमना परिसरातील फुटेज तपासण्यात आले. नागपूरच्या बेला नगरच्या गल्लीतुन बाहेर पडताना चोरटे दिसले. त्यावरुन भंडारा पोलिसांनी नागपूर शहर क्राइम ब्रांचची मदत घेतली. नागपूर पोलिसांच्या पथकाने मंगळवारी सहा जणांच्या मुसक्या कळमना परिसरातून आवळल्या.

या टोळीने भंडारासोबतच नागपूर, गोंदिया आणि गुजरातमध्येही दरोडे टाकून पाऊण कोटी रुपयांचे दागिने पळविल्याचे पुढे आले. चोरटे सध्या नागपूर पोलिसांच्या ताब्यात असून रात्री उशिरापर्यंत भंडारा पोलीस त्यांना ताब्यात घेणार असल्याचे सांगण्यात आले.

बाॅक्स

एलसीबीचे पथक नागपूरात तळ ठोकून

ठाणा येथे चोरी झाल्यानंतर चोरट्यांचा माग नागपूरात आढळून आला. तेव्हापासून भंडारा स्थानिक गुन्हे शाखेचे पथक नागपूरात तळ ठोकून आहेत. एलसीबीचे प्रमुख जयवंत चव्हाण यांच्यासह पोलीस उपनिरीक्षक विवेक राऊत, सुनील उईके, रवींद्र रेवतकर आणि इतर बारा कर्मचारी नागपूरातच आहेत. या सहा चोरट्यांना ताब्यात घेतल्यानंतर ते भंडारा येथे येणार असल्याची माहिती आहे. जवाहरनगरचे ठाणेदार पंकज बैसाने यांनीही या चोरीचा छडा लावण्यात मोलाचे सहकार्य केले.