मुखरु बागडे।लोकमत न्यूज नेटवर्कपालांदूर : जन्माष्टमीच्या पर्वावर पालांदुरातील कुंभारपुरीत श्रीकृष्णाला घडविण्याचे काम मागील आठवडाभरापासून अहोरात्र सुरू आहे. शंभर ते पाचशे रूपयापर्यंत मोल घेत संस्कृतीशी प्रामाणिकता कुंभार समाज जोपासत आहे. कुटुंबातील सर्वच सदस्य हातभार लावत देवाच्या मूर्त्या आकाराला आणण्यासाठी राबत आहे. रंगरंगोटीलाही जीएसटीने सोडले नाही, देवा तरीही मोल वाढवून मिळत नाही. तेच किमान देवा तुझी कृपादृष्टी ठेवत आमच्याही आयुष्याला घडव अशी आर्त विनवणी कुंभार समाज श्रीकृष्णाला करीत असावा....पालांदुरातील कुंभार ४०-४५ कुटुंबाने कित्येक वर्षापासून इथेच स्थायिक आहेत. शेतीवाडी नसल्याने हातावर आणून पानावर खाणेच सुरू असल्याचे आजही हा समाज आर्थिक खाईत खितपत जीवन जगत आहे. अठराविश्व दारिद्रयामुळे शैक्षणिक गंगा प्रवाहीत नाही. अज्ञानामुळे शैक्षणिक क्रांती नाही व शैक्षणिकांनी घरात नसल्याने वडिलोपार्जीत काम आजची पिढी उद्याच्या पिढीला देत आहे. शासनाचे साधे घरकुलसुद्धा मिळू शकत नाही. २०११ च्या आर्थिक सर्व्हेतून कुंभारपुरा सुटल्याने व त्याचाच आधार घरकुलाला असल्याने समाजावर संकट ओढवले आहे. कच्चा माल पक्का करण्याकरिता वेगळी जागा नसल्याने घरासमोर भट्टी लावीत धुरांच्या साक्षीने जीवन जगत आहे. अल्पावधीतच इंद्रिय निकामी होतात. हक्काची मातीची खान नाही, लाकडे, कोळशा मिळत नाही अद्यावत (यांत्रिक) कलाकुसरीकरिता साधने शासनाकडून मिळत नसल्याने हातच्याच भरोशाने कलाकुशरीची कामे सुरू आहेत. जग कितीही बदलले असले तरी पिण्याच्या पाण्याची थंड तहान भागविण्याची किमया याच कुंभारपुरीत घडते.हिंदू संस्कृतीत श्रीकृष्ण जन्माष्टमीला विशेष महत्व आहे. दिड दिवसाकरिता श्रीकृष्ण अनेकांच्या घरी पाहुणा म्हणून येतो. सन्मानाने त्याची पुजाअर्चा करीत गोडधोडाचा नवैद्य पुरविला जातो. भजन किर्तन डहाके यातून श्रीकृष्ण लिलयांचा प्रेदणादाई वर्णन करीत आजच्या पिढीला श्रीकृष्णाची जीवनशैलीचे दर्शन घडविल्या जतो. श्रीकृष्णाचे बालपन त्यांच्या गौळवी, यशोदामाना कालीया मर्दन, गौमाता, दही दुधाचे महत्व, श्रीकृष्ण सुदामा मैत्री, गोपालकाला यातून एक आदर्श जीवनाची प्रचिती जगाला श्रीकृष्ण चरित्रातून मिळाली आहे.पालांदुरात नाग, गाय, पाळणा, करंबाचे झाड, राधा यांच्या सोबतचे श्रीकृष्णाची प्रतिभा साकारणे अंतिम टप्प्यात आली आहे. प्रत्येक घरात ५० च्या सुमारास मुर्ती घडविल्या आहेत. कुणी नगदीने देतात तर कृणी देण वर नेतात म्हणजे वर्षात एकदा धन धान्य द्यायचे त्याबदल्यात वर्षभर लागणारी साहित्य न्यायचे असा हा कुंभार समाज आजही जुन्याच व्यवहारात जगत आहे. शेतकरी वर्गाशी गाठ असल्याने मोठ्या निधीची अपेक्षाच नाही. देवाचे मोल सुद्धा अधिक घ्यायचे नाही. या दातृत्वविचाराने कुंभार समाज पालांदुरात जगत आहे. शासनाकडून शासनदरबारी अशा कर्तृत्वान समाजाची दखल घेणे काळाची गरज आहे. त्याच्या कलेची कदर करीत त्या कलेला टिकवून विकसीत करण्याची जबाबदारीसुद्धा शासनाची आहे. पुर्वी राजेरजवाड्यात प्रत्येक कलेला किंमत होती. त्याचा मानसन्मान वेगळा होता. लोकशाही खरी मात्र मुठभर लोकच त्यात शहाणी होत पुढे गेली. प्रत्येक समाजाला न्याय मिळाला नाही. त्यात कुंभार समाज आजही मागेच आहे, हेच म्हणावे लागेल.
हे ईश्वरा, आमच्याही आयुष्याला घडव रे !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2017 23:32 IST
जन्माष्टमीच्या पर्वावर पालांदुरातील कुंभारपुरीत श्रीकृष्णाला घडविण्याचे काम मागील आठवडाभरापासून अहोरात्र सुरू आहे.
हे ईश्वरा, आमच्याही आयुष्याला घडव रे !
ठळक मुद्देकुंभार समाजाचे श्रीकृष्णाला साकडे : कुंभारपुरीत घरोघरी घडतात कान्होबा