शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

विशेष लसीकरण मोहिमेद्वारे पूर्ण करणार लसीकरणाचे उद्दिष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2021 05:00 IST

लसीकरण झालेल्या नागरिकांना ओमायक्रॉनचा संभाव्य धोका कमी आढळल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांनी वर्तविले आहे. पहिला डोस घेतलेल्या; परंतु दुसरा डोस अपूर्ण असलेले व दुसऱ्या डोसची मुदत संपलेल्या व्यक्तींचे तातडीने लसीकरण करण्यात यावे, असे त्यांनी सांगितले. जिल्ह्यात ग्रामीण व शहरी भागात ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात लसीकरण शिल्लक आहे. त्याठिकाणी कॅम्पचे आयोजन करावे. 

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा  : लसीकरणाचे अपेक्षित उद्दिष्ट अद्यापही साध्य न झाल्याने विशेष मोहिमेद्वारे जिल्ह्यातील उर्वरित लसीकरणाला चालना देण्यात येणार आहे. त्यासाठी लसीकरण मोहिमेचे आयोजन करण्यात यावे व ज्या नागरिकांचा अद्यापही दुसरा डोस प्रलंबित आहे, त्या नागरिकांना फोनद्वारे लस घेण्यासाठी प्रोत्साहित करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी आज लसीकरणाबाबतच्या आढावा बैठकीत दिले.लसीकरणाबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते. मुख्य कार्यकारी अधिकारी विनय मून, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. रियाज फारुकी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रशांत उईके, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी अभिषेक नामदास, डॉ. माधुरी माथूरकर यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी व जिल्ह्यातील विविध कंपन्यांचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.ओमायक्रॉन विषाणूचा देशात व राज्यात संसर्ग आढळून आला आहे. ओमायक्रॉन विषाणूचा संसर्ग वेगाने पसरत असून, सध्या तरी कोरोनावर लस हाच एकमेव पर्याय आहे. लसीकरणामुळे मृत्यूदर कमी आहे. त्यामुळे लसीकरणाला गती द्यावी व शंभर टक्के उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी जिल्ह्यात २४ ते ३१ डिसेंबर दरम्यान विशेष लसीकरण मोहीम राबविण्यात यावी व लसीकरणाचे उद्दिष्ट पूर्ण करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी दिले.लसीकरण झालेल्या नागरिकांना ओमायक्रॉनचा संभाव्य धोका कमी आढळल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांनी वर्तविले आहे. पहिला डोस घेतलेल्या; परंतु दुसरा डोस अपूर्ण असलेले व दुसऱ्या डोसची मुदत संपलेल्या व्यक्तींचे तातडीने लसीकरण करण्यात यावे, असे त्यांनी सांगितले. जिल्ह्यात ग्रामीण व शहरी भागात ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात लसीकरण शिल्लक आहे. त्याठिकाणी कॅम्पचे आयोजन करावे. २४  ते ३१  डिसेंबर दरम्यानच्या कालावधीत रविवारीसुद्धा लसीकरण सुरू ठेवावे. जिल्ह्यात जवळपास २००  लसीकरण केंद्राद्वारे लसीकरण होणार असून, कॅम्पच्या अगोदरच्या दिवशी ग्रामीण भागात स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्या मार्फत बैठका घ्याव्यात व लसीकरणाबाबत जनजागृती करावी. तहसीलदार, गटविकास अधिकारी यांनी गावातील नागरिकांना लसीकरणाबाबत समुपदेशन करावे, असे निर्देश त्यांनी दिले. ज्या नागरिकांनी पहिला डोस घेतला; परंतु अद्यापही दुसरा डोस घेतला नाही, अशा नागरिकांची संख्या मोठी आहे. दुसऱ्या डोससाठी पात्र असूनही लस न घेणाऱ्या नागरिकांना फोनद्वारे माहिती देण्यासाठी सूचना दिल्या. यावेळी सर्वांनी पुढाकार घेण्याचे आवाहनही कदम यांनी केले.

स्वत:हून पुढे या- लसीकरणाचे उद्दिष्ट गाठण्यासाठी तसेच भविष्यातील ओमायक्रॉन विषाणूचा धोका टाळण्यासाठी नागरिकांनी स्वयंप्रेरणेने नागरिकांनी लसीकरणासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी केले आहे.  स्थानिक पातळीवर आशा, आरोग्य सेवक, आरोग्य कर्मचारी, प्राथमिक आरोग्य केंद्राशी संपर्क साधून लस घ्यावी.

 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcollectorजिल्हाधिकारी