शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

सेंदुरवाफा-साकोलीचा विकास हेच ध्येय

By admin | Updated: January 15, 2017 00:29 IST

सेंदुरवाफा साकोलीवासीयांच्या स्वप्नाची पुर्तता करण्याचे माझे ध्येय असून त्याकरीता आपल्या सर्वांची साथ हवी आहे.

नाना पटोले : साकोलीत नवनिर्वाचित नगरसेवकांचा सत्कारसाकोली : सेंदुरवाफा साकोलीवासीयांच्या स्वप्नाची पुर्तता करण्याचे माझे ध्येय असून त्याकरीता आपल्या सर्वांची साथ हवी आहे. या दोन्ही गावांच्या विकासाकरिता निधीची कमतरता पडू देणार नाही. यासाठी नगरसेवक व नगराध्यक्षांनी प्रमाणिकपणे काम करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन खासदार नाना पटोले यांनी केले. साकोली येथे भाजपतर्फे आयोजित नवनिर्वाचित नगराध्यक्ष व नगरसेवकांच्या सत्कार समारंभाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी मंचावर भाजपाचे जिल्हाध्यक्ष तारीक कुरैशी, आमदार बाळा काशीवार, नगराध्यक्ष धनवंता राऊत, तालुका अध्यक्ष रमेश खेडीकर, शहर अध्यक्ष किशोर पोगडे, रवि अग्रवाल, सभापती धनपाल उंदीरवाडे, उपसभापती लखन बर्वे, जिल्हा महामंत्री भरत खंडाईत, जिल्हा परिषद सदस्य नेपाल रंगारी, दीपक मेंढे, अ‍ॅड.दिलीप कातोरे, माजी सभापती गीता कापगते, नईम अली, इंद्रायणी कापगते, सविता ब्राम्हणकर उपस्थित होते.यावेळी खासदार नाना पटोले म्हणाले, निवडणुकीत निवडून येणे सोपे आहे. मात्र पाच वर्षे जनतेत टिकून राहणे कठीण आहे. कारण लोकप्रतिनिधींनी केलेल्या कामाचा आढावा हा पुढच्या निवडणुकीत पाहुनच मतदान केले जाते. यापुर्वी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता होती. मात्र त्यांनी लोकांची कामे केली नाही त्यामुळे मतदारांनी त्यांना नाकारून भाजपला सत्तेवर आणले. त्यामुळे आपल्याला कामे करावी लागणार आहेत. याची खबरदारी प्रत्येकाला घ्यावी लागणार आहे. यावेळी साकोलीच्या नवनियुक्त नगराध्यक्ष धनवंता राऊत, नगरसेवक अनिता पोगडे, जगन उईके, राजश्री मुंगुलमारे, लता कापगते, रोहिनी मुंगूलमारे, शैजुताई बोरकर, पुरूषोत्तम कोटांगले, नालंदा टेंभुर्णे, तरूण मल्लाणी, मिना लांजेवार, वनिता डोये, रवि परशुरामकर, सुभाष बागडे, गीता बडोले या नगरसेवकांचा शाल श्रीफळ व पुुष्पगुच्छ देऊन सपत्नीक सत्कार करण्यात आला. (तालुका प्रतिनिधी)१६ तास वीज पुरवठा देऊ -काशीवारभारनियमन हे मागील सरकारचे पाप आहे. यावर काही तरी तोडगा काढू. यावर्षीच्या उन्हाळी पिकाकरीता १६ तास विद्युत पुरवठा करू यासाठी मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाली असून लवकरच त्याची अंमलबजावणी होणार असल्याचे आमदार बाळा काशीवार यांनी सांगितले.स्वामीजी पडद्यामागचे हिरोभाजप मेळावा व सत्कार समारंभप्रसंगी खासदार नाना पटोले यांनी साकोली नगर परिषदेच्या भरीव यशाबद्दल स्वामीजी यांची स्तुती करीत स्वामीजी म्हणजे पडद्यामागचे हिरो अशी प्रशंसा केली. यावेळी उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट करून प्रतिसाद दिला. या कार्यक्रमात एकोडीचे सरपंच अनिरूद्ध समरीत, चांदोरीचे सरपंच नंदू हातझाडे यांच्यासह अनेकांनी काँग्रेस व राष्ट्रवादीला रामराम करीत भाजपात प्रवेश केला.