शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
US Israel Iran War : युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
4
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
5
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
6
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
7
मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
8
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
9
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
10
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
11
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
12
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
13
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
14
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
15
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
16
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
17
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
18
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
19
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
20
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
Daily Top 2Weekly Top 5

६ लाख ११ हजार ई-कार्ड बनविण्याचे उद्दिष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2019 22:21 IST

केंद्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेत लाभार्थ्यांना वितरित करण्यात येणाऱ्या ई-कार्डचे उद्दिष्ट दोन आठवड्यात पूर्ण करण्यात यावे. जिल्ह्याला ६ लाख ११ हजार ई-कार्ड बनविण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे.

ठळक मुद्देजिल्हाधिकारी गीते यांची माहिती : आयुष्यमान भारत योजनेचे कार्ड वितरण

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : केंद्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेत लाभार्थ्यांना वितरित करण्यात येणाऱ्या ई-कार्डचे उद्दिष्ट दोन आठवड्यात पूर्ण करण्यात यावे. जिल्ह्याला ६ लाख ११ हजार ई-कार्ड बनविण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. ज्यांचे उद्दिष्ट पूर्ण होणार नाही त्या अधिकाऱ्यांवर प्रशासकीय कारवाई प्रस्तावित करण्यात येईल, अशा स्पष्ट सूचना जिल्हाधिकारी डॉ. नरेश गीते यांनी दिल्या.जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात मंगळवारी आयुष्मान भारत, प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेअंतर्गत ई-कार्ड वाटप संबंधाने गट विकास अधिकारी, मुख्याधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी यांची बैठक आयोजित करण्यात आली होती, त्यावेळी ते बोलत होते.अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुभाष पवार, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रमोद खंडाते, उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा कुरसंगे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन चव्हाण उपस्थित होते. आयुष्मान भारत योजनेत भंडारा यंत्रणांमार्फत १ लाख ७ हजार लाभार्थ्यांचे कार्ड बनविण्यात आले आहेत. ही प्रगती अत्यल्प असल्यामुळे जिल्हाधिकारी यांनी नाराजी व्यक्त केली. कार्ड बनविण्यासाठी लागणाºया थम मशिन गट विकास अधिकाºयांनी दोन दिवसात उपलब्ध करुन घ्याव्यात, असे निर्देश त्यांनी दिले.हेल्थ कार्ड देण्यासाठी आर्थिक व सामाजिक जनगणनेच्या यादीमधील पात्र लाभार्थ्यांची निवड करुन नोंदणी करायची आहे.यासाठी जिल्हयातील ई-सेवा केंद्र, ग्रामपंचायत, ठराविक रुग्णालय याठिकाणी आधार कार्ड व थम मशिनद्वारे नोंदणी करावयाची आहे. यासाठी तालुका आरोग्य अधिकारी व गट विकास अधिकारी यांनी समन्वय ठेवून उद्दिष्ट पूर्ण करावे. या बैठकीत जिल्हाधिकाºयांनी आयुष्मान भारत योजनेचा गावनिहाय आढावा घेतला. ई-कार्डसाठी लागणारे यंत्र तात्काळ खरेदी करावे, अशा सूचना त्यांनी दिल्या.आयुष्मान भारत योजनेत नागरिकांना ५ लाखापर्यंत आरोग्याचा विमा मिळणार आहे. सामान्य माणसासाठी ही आरोग्याच्या दृष्टीने महत्वाची योजना असून या योजनेत अनेक आजारावर ईलाज करण्यासाठी हा विमा मदतगार साबीत होणार आहे. पात्र लाभार्थ्यांनी आपले ई-कार्ड बनवून घ्यावे, असे आवाहन त्यांनी केले.कुपोषणाचे पुनर्सर्वेक्षण कराजिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागातील कुपोषणाचे पुनर्सर्वेक्षण करण्याच्या सूचना जिल्हाधिकाºयांनी संबंधित विभागाला दिल्या. मॅम व सॅम दोन्ही कॅटेगिरीमधील सर्वेक्षणाचा यात समावेश असावा. या विषयावर आपण स्वत: डॉ.गीते लक्ष ठेवून आहेत. बालकाच्या आरोग्य विषयीच्या योजनांचा लाभ त्यांना मिळावा यासाठी हा सर्वे आवश्यक आहे.

टॅग्स :collectorजिल्हाधिकारी