शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

दोन हजार द्या आणि बांधकाम कामगार व्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2019 06:00 IST

भंडारा पंचायत समितीमार्फत आतापर्यंत फक्त १४०० पावत्यांचा हिशोब दाखवण्यात आला आहे. उर्वरीत २५०० पावत्या शिल्लक असतानाही अधिकारी कर्मचाऱ्यांकडून कोणतीच माहिती मिळत नसल्याने पंचायत समिती एजंटांमार्फत भ्रष्टाचार सुरु असल्याचा कामगारांनी आरोप केला आहे.

ठळक मुद्देएजंटाचा वाढला सुळसुळाट : भंडारा पंचायत समितीचा भोंगळ कारभार

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : शासनाकडून योजनांचा लाभ मिळतोय म्हणून केवळ बांधकाम कामगारांची नोंदणी अवैधरित्या करणाऱ्या एजंटांचा सुळसुळाट वाढला आहे. याला भंडारा पंचायत समितीकडून त्याला खतपाणी मिळत असल्याचे निदर्शनास आले आहे. ग्रामीण भागातील अनेक कामगार पंचायत समितीमध्ये कामगार नोंदणी करण्यासाठी येत असून दोन हजार रूपये द्या आणि बांधकाम कामगार व्हा, असा छुपा फतवाच काढण्यात आला आहे.यामुळे कामगारांची गैरसोय होत आहे. भंडारा कामगार आयुक्तालयांतर्गत ३९०० बांधकाम कामगारांसाठी पावती पुस्तकांचे वाटप करण्यात आले. परंतु भंडारा पंचायत समितीमार्फत आतापर्यंत फक्त १४०० पावत्यांचा हिशोब दाखवण्यात आला आहे. उर्वरीत २५०० पावत्या शिल्लक असतानाही अधिकारी कर्मचाऱ्यांकडून कोणतीच माहिती मिळत नसल्याने पंचायत समिती एजंटांमार्फत भ्रष्टाचार सुरु असल्याचा कामगारांनी आरोप केला आहे.एजंटांकडून पैसे मोजलेल्यांचीच नोंदणी होत असल्याने खºया गरजू कामगारांना याचा लाभ मिळत नसून त्यांची गैरसोय होत आहे. मात्र यासाठी अधिकाºयांना वारंवार भेटून देखील अधिकारी कर्मचारी या एजंटांना खतपाणी घालत आहेत.कामगारांकडून नोंदणीकृत करण्यासाठी ८५ रुपये घेण्याचा शासनाचा नियम असताना भंडारा पंचायत समितीत नोंदणी करण्यासाठी कर्मचारी कामगारांकडून २०० रुपयाप्रमाणे वसुली करीत आहेत. कामगार नोंदणीसाठी कर्मचाºयांकडून गावागावात दलाल तयार झाले असल्याने हे एजंट नोंदणी करण्याचे आमीष देऊन कामगारांकडून दोन हजार रुपयांची लुबाडणूक करीत आहेत. तसेच दररोज येणाºया ग्रामीण भागातील कामगारांना दिवसभर ताटकळत थांबावे लागते. दिवसभरात फक्त ५० कामगारांची नोंदणी होत असल्याने हे एजंट बाहेर पैसे दिल्यावरच फावल्या वेळेत पावत्या फाडत आहेत. याविरोधात कामगारांनी एकत्र येत कामगार उपायुक्तालयाला घेराव घातला असता त्यानंतर लोकप्रतिनिधीच्या नेतृत्वात पंचायत समितीवर धडक दिली.अन् अधिकारी,कर्मचाऱ्यांनी काढला पळयावेळी घडलेल्या या प्रकाराने पंचायत समितीतील अधिकारी कर्मचाºयांनी प्रसंगावधान राखत पळ काढला. रात्रीपर्यंत कामगार पंचायत समितीत तळ ठोकून होते. मात्र त्यांच्याकडे एकही अधिकारी कर्मचारी फिरकला नाही. यावेळी कामगारांसोबत जिल्हा परिषद सदस्य सुभाष आजबले, बेला येथील सरपंच पूजा ठवकर, मंगेश हुमणे, बालू ठवकर, आभा चोले, युवा संग्राम शहर अध्यक्ष कमल साठवणे, दिगांबर गाढवे, महेंद्र रामटेके, अनिल कढव, जाखचे सरपंच विनोद जगनाडे, रवींद्र वंजारी, स्वप्नील आरीकर, संजय सार्वे, शिल्पा सोनारकर, संगीता बाभरे, वर्षा माकडे आदी मान्यवर कामगारांसोबत उपस्थित होते.

टॅग्स :government schemeसरकारी योजना