शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

घरकुलच्या ‘ड’ यादीतील गरजू पात्र लाभार्थींना न्याय द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2021 04:36 IST

संपूर्ण तालुक्यात सरपंच, ग्रामपंचायत पदाधिकारी यांच्याविरोधात वातावरण तयार झाले आहे. यात ग्रामपंचायतीसह सरपंचांचा कोणताही दोष नाही. परंतु शासनस्तरावरून झालेली ...

संपूर्ण तालुक्यात सरपंच, ग्रामपंचायत पदाधिकारी यांच्याविरोधात वातावरण तयार झाले आहे. यात ग्रामपंचायतीसह सरपंचांचा कोणताही दोष नाही. परंतु शासनस्तरावरून झालेली चूक स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या माथी मारली जात आहे. गावात कलह तयार होत असून पदाधिकाऱ्यांना गाव कारभार चालविताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी गोरगरिबांना पक्क्या घराकरिता न्याय द्यावा, अशी मागणी सरपंच संघटना लाखनी यांच्या वतीने करण्यात आली आहे.

पालांदूरजवळील मांगली बांध येथील ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेच्या ठरावानुसार २०१८ ला ग्रामसभेतून २०१ लाभार्थी पात्र ठरले. मात्र नंतर लाभार्थींची १५१ एवढीच यादी पात्र धरून ४९ लाभार्थी पात्र असूनही अपात्र ठरविण्यात आले. पालांदूर येथे सुद्धा ४६९ पात्र लाभार्थी असून, यातील सुमारे पस्तीस लाभार्थींचा सर्व्हे झालेला नसल्याने त्यांचेसुद्धा घरकुल समस्येत आले आहे. असाच प्रकार तालुक्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये घडलेला आहे.

चौकट

सरपंच संघटनेने यापूर्वीसुद्धा प्रशासन स्तरावरून प्रयत्न चालविले होते. परंतु अजूनही त्यांना न्याय मिळालेला नाही. ऑनलाइन पद्धतीने सध्या सर्वच कारभार सुरू झाला आहे. केंद्र सरकारने यात सहकार्य करून ग्रामीण घरकुल व्यवस्थेला सहकार्य करावे, अशी अपेक्षा सरपंच संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. निवेदन देताना लाखनी तालुका सरपंच संघटनेचे अध्यक्ष म. वा. बोळणे, नरेंद्र भांडारकर, देवनाथ निखाडे, पंकज चेटुले, सुधाकर हटवार, प्रशांत मासुरकर, संगीता बारस्कर, संगीता घोनमोडे, वीणाताई नागलवाडे, कल्पना सेलोकेर, रसिका कांबळे, जयंत बिंझडे आदी उपस्थित होते.