शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
3
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
4
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
5
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
6
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
7
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
8
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
9
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
10
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
11
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
12
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
13
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
14
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
15
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
16
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
17
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
18
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
19
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
20
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
Daily Top 2Weekly Top 5

डायलीसिसची सुविधा आठवड्यातून तीन वेळा द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2018 22:13 IST

जिल्हा सामान्य रुग्णालय भंडारा येथे आठवड्यातून तीन वेळा डायलीसिसची सुविधा उपलब्ध करून द्या अन्यथा भीक मांगो आंदोलन करण्यात येईल, या आशयाचे निवेदन युथ पँथर्स युवा सामाजिक संघटनेच्या वतीने प्रदेशाध्यक्ष तेजपाल मोरे यांच्या नेतृत्वात आ. रामचंद्र अवसरे यांना देण्यात आले.

ठळक मुद्देअन्यथा भीक मांगो आंदोलन : युथ पँँथर्स संघटनेचे प्रशासनाला निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जिल्हा सामान्य रुग्णालय भंडारा येथे आठवड्यातून तीन वेळा डायलीसिसची सुविधा उपलब्ध करून द्या अन्यथा भीक मांगो आंदोलन करण्यात येईल, या आशयाचे निवेदन युथ पँथर्स युवा सामाजिक संघटनेच्या वतीने प्रदेशाध्यक्ष तेजपाल मोरे यांच्या नेतृत्वात आ. रामचंद्र अवसरे यांना देण्यात आले.वैद्यक शास्त्रानुसार किडनीच्या आजाराने ग्रस्त रुग्णांनी आठवड्यातून किमान तीनवेळा (१२ तास) डायलेसिस करणे आवश्यक असते. परंतु जिल्हा समान्य रुग्णालय भंडारा येथे डायलेसिसची सुविधा रुग्णांना आठवड्यातून फक्त दोनचं वेळा देण्यात येत आहे. वैद्यक शास्त्रानुसार असे करणे म्हणजे रुग्णांच्या जीवासाठी अत्यंत धोकादायक आहे. सुरुवातीला जिल्हा सामन्य रुग्णालयात आठवड्यातून तीन वेळा डायलेसिसची सुविधा उपलब्ध होती परंतु रुग्णालय प्रशासनाने आर्थिक कारण समोर करून डायलेसिस विभागातील कंत्राटी कर्मचाऱ्यांना पदावरून कमी केल्यामुळे पुरेशा मनुष्यबळाअभावी आता मात्र ही डायलेसिसची सुविधा आठवड्यातून दोनच वेळा देण्यात येत आहे. परिणामी मागील आठवड्यात जिल्हा सामान्य रुग्णालयात किडनीच्या रुग्णांना आठवड्यातून तीन वेळा डायलेसिसची सुविधा उपलब्ध न झाल्यामुळे तब्बल सहा रुग्णांना जीव गमवावा लागला आहे.सामान्य रुग्णालयातील डायलेसिस विभागाला पुरेशा मनुष्यबळाचा पुरवठा करून डायलेसिसची सुविधा पूर्वीप्रमाणेच आठवड्यातून तीन वेळा उपलब्ध करण्यात यावी अन्यथा युथ पँथर्स युवा समाजिक संघटना संपूर्ण जिल्ह्यात भीक मांगो आंदोलन करून प्राप्त झालेल्या निधीतून स्वत; डायलेसिस विभागाला मनुष्यबळाचा पुरवठा करून डायलेसिस सुविधा पूर्वपदावर आणेल. अशा आशयाचे एक लेखी निवेदन युथ पँथर्स युवा सामाजिक संघटनेच्या वतीने भंडारा विधानसभा क्षेत्राचे आमदार रामचंद्र अवसरे यांना देण्यात आले. शिष्टमंडळात प्रदेशाध्यक्ष तेजपाल मोरे, उपाध्यक्ष मोरेश्वर राऊत, जिल्हाध्यक्ष राहुल बांते, महासचिव ऊमेश सरदार, शहराध्यक्ष दिनेश मेश्राम, शहर सरचिटणीस सुधीर फुलबांधे, महिलाध्यक्षा रंजना मोरे, विद्यार्थी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रज्जत खोब्रागडे, विभागीय अध्यक्ष सत्यपाल मोरे, राहुल ठाकरे, राष्ट्रपाल मोरे, पुस्तकला भेदे, प्रदीप रामटेके, राकेश बांते, प्रशांत बोरकर आदींचा समावेश आहे.