शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

प्रकल्पग्रस्तांना २५ लाखांचा मोबदला द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2018 23:43 IST

गोसीखुर्द राष्ट्रीय प्रकल्पासाठी १९९८ मध्ये ग्रामस्थांच्या जमिनी अधिग्रहीत केल्या. मात्र या प्रकल्पाला अनेक वर्षांचा कालावधी लोटूनही तो अपुर्णावस्थेत आहे.

ठळक मुद्देग्रामस्थांची मागणी : पत्रपरिषदेत मांडल्या समस्या, बच्चू कडू यांनी केले आंदोलन

आॅनलाईन लोकमतभंडारा : गोसीखुर्द राष्ट्रीय प्रकल्पासाठी १९९८ मध्ये ग्रामस्थांच्या जमिनी अधिग्रहीत केल्या. मात्र या प्रकल्पाला अनेक वर्षांचा कालावधी लोटूनही तो अपुर्णावस्थेत आहे. त्यामुळे प्रकल्पग्रस्तही आर्थिक मोबदल्यापासून वंचित असून प्रत्येकांना २५ लाख रोख आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी प्रकल्पग्रस्तांनी पत्रपरिषदेतून केली आहे.शासकीय विश्रामगृहात संजय एकापूरे, कवळू गाढवे, मंगेश वंजारी, यशवंत टिचकुले, मारोती हारगुळे आदींनी पत्रपरिषद घेऊन त्यांच्या समस्या मांडल्या. राष्ट्रीय प्रकल्पासाठी शासनाने त्यांच्या जमिनी अधिगृहीत केल्या. त्यानंतर काही ग्रामस्थांचे पुनर्वसन केले. मात्र पुनर्वसित ठिकाणी योग्य सोयीसुविधा अद्यापही देण्यात प्रशासन अपयशी ठरल्याचा आरोप प्रकल्पग्रस्तांनी केला आहे. ८५ गावांचे या राष्ट्रीय प्रकल्पासाठी पुनर्वसन करण्यात आले. यात ८० हजारांवर प्रकल्पग्रस्तांना फटका बसला. मागील अनेक वर्षांपासून शासन दरबारी त्यांच्या समस्यांचा पाढा वाचण्यात येत आहे. मात्र प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप ग्रामस्थांनी करून २१ फेब्रुवारीला आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वात धरणावर निवासी आंदोलन केले. यामुळे प्रशासनाने दखल घेऊन समस्या तातडीने सोडविण्याचे आश्वासन दिले.याबाबत आयुक्त कार्यालयात पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सभा घेतली. यात प्रकल्पग्रस्तांच्या समस्या तातडीने सोडविण्याचे आश्वासन दिले. दरम्यान धरणा सध्या आठ ते १० टीएमसी पाणी आहे. पुनर्वसीत गावात प्रशासनाने नागरी सुविधा द्याव्या व धरणात नागनदीचे दूषित पाणी सोडणे बंद करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. पत्रपरिषदेला एजाज अली, सुहास वाघमारे, देवनाथ रामटेके, क्रिष्णा केवट, मंजुषा गजभिये, सरीता उके, विद्या मारबते, जिजाबाई मेश्राम, वाल्मीक नागपुरे, भाऊराव उके, रामप्रसाद ढेेंगे, मुकेश सुखदेवे, संजय लांजेवार, शरद मेश्राम, सुरेश पवनकर आदी उपस्थित होते.