शहरं
Join us  
Trending Stories
1
"चीनपेक्षाही धोकादायक म्हणजे RSS…"; ओवेसींनी साधला निशाणा, PM मोदींना विचारला एक प्रश्न
2
ठाकरे बंधूंच्या पॅनेलला टक्कर देण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी २ शिलेदारांवर सोपवली जबाबदारी
3
भारताच्या स्वातंत्र्याने खलिस्तान्यांना होतोय त्रास; ऑस्ट्रेलियाच्या रस्त्यांवर गोंधळ घातला
4
पाकिस्तानमध्ये हाहाकार! ढगफुटी, पूर आणि भूस्खलनात ४१ लोकांचा मृत्यू, असंख्य बेपत्ता; पाचशे पर्यटक अडकले
5
प्रियकराची ओढ, पत्नीचं संसाराकडे दुर्लक्ष; त्यानंतर पतीने जे केले..., सासरचे जावयावरच उलटले
6
सुदर्शन चक्र, दहा वर्षात तयार होणार भारताचं स्वदेशी सुरक्षा कवच, सर्व शस्त्रास्त्रे ठरणार निष्प्रभ, अशी आहे योजना
7
“जालना, मुंबई, दिल्लीत कुठेही आंदोलन कर, पण...”; जरांगेंच्या निर्धारावर भुजबळ स्पष्टच बोलले
8
'दहा मृतदेह आम्ही स्वतःच बाहेर काढले, अजूनही लोक मातीखालीच...'; चशोटीत आक्रोश, मन्न सुन्न करणारे अनुभव
9
"त्यांनी माझे गाल ओढले, दंडाला चिमटे काढले...", हळदीकुंकूच्या कार्यक्रमाला गेलेल्या प्रिया बेर्डेंना चाहत्यांकडून आलेला धक्कादायक अनुभव
10
क्रिकेटरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी दिसणार सलमान खानच्या 'बिग बॉस १९'मध्ये?, जाणून घ्या याबद्दल
11
"भारत-पाक संघर्ष अणुयुद्धात बदलला असता, मी होतो म्हणून..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा 'तो' दावा कायम
12
शशी थरूर 'क्लीन बोल्ड'! एका तरूणाच्या इंग्रजी ट्विटने काढली 'विकेट', रिप्लाय देत म्हणाले...
13
जन्माष्टमी २०२५: ‘या’ राशींवर श्रीकृष्ण कृपा, पैसे कमी पडत नाहीत; सुबत्ता-वैभव-भरभराट लाभते!
14
राजा रघुवंशीच्या घरी अचानक पोहोचला पोलिसांच्या वेशातील व्यक्ती; कुटुंबाला आला संशय, तपास करताच धक्कादायक सत्य उघड
15
७ वर्षांनी डोनाल्ड ट्रम्प आणि पुतिन भेट होणार; ३२ हजार सैन्य तैनात, ३०० किमी परिसरात 'नो फ्लाय झोन'
16
"कोणतीही अघोरी शक्ती आली तरी मराठी माणसांची..."; 'या' महापालिकांमध्ये मनसे-शिवसेना एकत्र लढणार?
17
PM मोदींनी सर्व रेकॉर्ड मोडले, लाल किल्ल्यावर १०३ मिनिटे भाषण केले; पाहा, १० मोठे मुद्दे
18
"युवराज्ञींना येणं भाग पडलं...", प्राजक्ता-शंभुराजच्या साखरपुड्याला आली भोसले राजघराण्यातील महत्त्वाची व्यक्ती, अभिनेत्रीची खास पोस्ट
19
सूरज चव्हाणला पक्षात बढती, अजित पवार म्हणतात, "मला माहिती नाही..."; सुनील तटकरेंचा वेगळाच दावा
20
“स्वातंत्र्य चळवळ अन् RSSचा संबंध काय? PM मोदी पुन्हा लाल किल्ल्यावरून खोटे बोलले”: सपकाळ

स्वच्छतेच्या कार्याला लोकचळवळीचे स्वरुप द्या

By admin | Updated: January 31, 2015 23:15 IST

प्रत्येक महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये वर्क्तृत्व गुण असतात. स्वत:मधल वर्क्तृत्व गुणांच्या सहाय्याने सामाजाची सेवा करता येते. पाणी व स्वच्छतेच्या विषयाला गावोगावी पोहचविण्यासाठी

भंडारा : प्रत्येक महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये वर्क्तृत्व गुण असतात. स्वत:मधल वर्क्तृत्व गुणांच्या सहाय्याने सामाजाची सेवा करता येते. पाणी व स्वच्छतेच्या विषयाला गावोगावी पोहचविण्यासाठी महाविद्यालयीन युवकांनी वर्क्तृत्व गुणांचा उपयोग करावा, जेणे करून पाणी व स्वच्छतेच्या विषयाला लोकचळवळीचे स्वरुप देता येईल, असे प्रतिपादन शासकीय अध्यापक महाविद्यालय, भंडाराच्या प्राचार्या वीणा लांडे यांनी केले. त्या जिल्हास्तरीय स्वच्छतामित्र वर्क्तृत्व करंडक स्पर्धेच्या उद्घाटनाप्रसंगी अध्यक्षस्थानावरून बोलत होत्या.यावेळी मंचावर उप मुख्य कार्यकारी अधिकारी (पं.), मंजुषा ठवकर, शासकीय अध्यापक महाविद्यालयाचे मराठी विभागाच्या प्राध्यापक डॉ.उपाध्ये, सांस्कृतिक विभागाचे डॉ.अ.हे. वरघट, शासकीय अध्यापक विभागाचे डॉ.वातकर, डॉ.इंगोले, प्रा.मुंडासे, विक्रम फडके, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक डी.एम. बिसेन आदींसह अन्य मान्यवर उपस्थित होते.डॉ.लांडे म्हणाल्या, प्रत्येक स्पर्धेत बक्षिस असते. परंतु नुसरे बक्षिसासाठी काम करायचे नाही. आपल्या विचाराला मर्यादित न ठेवता पाणी व स्वच्छतेची चळवळ उभी करण्यासाठी त्याचा उपयोग व्हायला हवा. आपले कर्तव्य म्हणून समाजाची सेवा करण्यासाठी स्वच्छतामित्र म्हणून वर्क्तृत्व गुणांचा फायदा झाला तर स्वच्छतेची चळवळ उभी राहील व स्वच्छ भारत मिशन सारखे कार्यक्रम यशस्विरित्या राबविता येईल असे मत व्यक्त केले. यानंतर उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पं.) ठवकर यांनी, दरवर्षी होणाऱ्या या स्वच्छतामित्र वर्क्तृत्व करंडक स्पर्धेतून पाणी व स्वच्छतेचे कार्य करणारे स्वच्छतामित्र निवडायचे असतात. बक्षिसापेक्षाही स्वच्छतामित्राच्या हातातून ग्रामस्तरावर होणारे पाणी व स्वच्छतेबाबतचे कार्य लाख मोलाचे आहे. स्पर्धेतून पाणी व स्वच्छतेबाबतचे मत व्यक्त करून गेल्यानंतर गावात त्या विचारांचा प्रसार करावा व चांगला समाज, आदर्श गाव घडविण्यासाठी प्रत्येकाने सहभाग घ्यावा असे मत मांडले.मान्यवरांच्या मार्गदर्शनानंतर स्पर्धेला सुरुवात करण्यात आली. सर्वप्रथम कनिष्ठ गटातून स्पर्धेला सुरुवात झाली. यावेळी स्पर्धकांनी पाणी व स्वच्छता संबंधित वेगवेगळ्या विषयाला धरून मत मांडले. एकापेक्षा एक सुरेख विचार मांडून ग्रामस्तरावर लोकहभागातून कार्य करण्याची गरज असल्याचा सूर यावेळी दिसून आला. तर वरिष्ठ गटातूनही एकापेक्षा एक सरस विचार मांडीत प्रत्येकानी स्वत:चा थोडासा वेळ गावाच्या विकासासाठी दिल्यास आपल्या स्वप्नातील भारत देश, आदर्श निर्मल गाव, पाण्याची सुरक्षितता ठेवण्यात स्वच्छतामित्र म्हणून पुढे येण्याचा सूर उमटला.वरिष्ठ गटातील १३ तर कनिष्ठ गटातून १४ असे एकूण २७ स्पर्धक स्पर्धेत सहभागी झाले होते. स्पर्धेनंतर काही वेळातच निकाल घोषित करण्यात आले. कनिष्ठ गटात प्रथम क्रमांक नगरपालिका ज्युनिअर महाविद्यालय पवनीच्या विद्यार्थी जयंत भैय्याजी देशमुख, द्वितीय क्रमांक जी.के. अग्रवाल महाविद्यालय तुमसरची विद्यार्थिनी सायली गजानन शुक्ला, तर तृतीय क्रमांक नगरपरिषद गांधी ज्युनिअर महाविद्यालय भंडाराचा विद्यार्थी आकाश कैलाश गोंडाणे तसेच वरिष्ठ गटात प्रथम क्रमांक इंदूताई अध्यापक विद्यालय तुमसरचा विद्यार्थी कामेश्वर ब्रिजलाल पटले, द्वितीय अरुण मोटघरे महाविद्यालय कोंढाचा विद्यार्थी जितेंद्र बाबूराव मेश्राम तर तृतीय क्रमांक यशवंतराव चव्हाण महाविद्यालय लाखांदूरची विद्यार्थीनी विद्या श्रीराम झोडे यांनी पटकाविला. दोनही गटातील प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांकाच्या विजेत्यांना अनुक्रमे ११ हजार, ७ हजार, ५ हजार रोख रक्कम, प्रशस्तीपत्र, मानचिन्ह प्रदान करण्यात येणार आहे. कार्यक्रमाचे संचालन मनुष्यबळ विकास सल्लागार अंकुश गभणे तर प्रास्ताविक व आभार राजेश्वर येरणे यांनी मानले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्षातील माहिती शिक्षण संवाद तज्ज्ञ निलीमा जवादे, स्वच्छता तज्ज्ञ गजानन भेदे, क्षमता बांधणी तज्ज्ञ अजय गजापुरे, नेत्रदिपक बोडखे, बबन येरणे, देवेंद्र खांडेकर यांनी सहकार्य केले. (शहर प्रतिनिधी)