शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणने अशी कोणती मिसाईल डागली? इस्रायलमध्ये ना अलर्ट आला ना सायरन वाजला; हायफावर कोसळली...
2
"वाटलं भारताने अण्वस्त्र हल्लाच केला, पाकिस्तानकडे फक्त...', नेमकं काय म्हणाले बिलावल भुट्टो
3
KL राहुलनं शतकी खेळीसह साधला विक्रमी डाव! लिटल मास्टर गावसकरांसह द्रविडलाही टाकले मागे
4
'मी राज्यसभेवर जाणार नाही...', स्वतः अरविंद केजरीवालांनी लावला चर्चांना पूर्णविराम
5
इराण-इस्त्रायल युद्ध पेटले! ४० मिनिटे इस्रायलवर क्षेपणास्त्रांचा मारा, थरकाप उडवणारे व्हिडिओ व्हायरल!
6
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
7
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार
8
“विकासासाठीचा प्रत्येक रुपया सर्वसामान्यांपर्यंत पोहोचला पाहिजे”: DCM एकनाथ शिंदे
9
तिसऱ्या महायुद्धाला तोंड फुटण्याची भीती...! इराण इस्रायल युद्धात आणखी एका देशाची उडी; कुणाला देणार साथ?
10
“भास्कर जाधव नौटंकी, जनताच संन्यास देणार, तो काही एवढा मोठा माणूस नाही”; कुणी केली टीका?
11
गोव्याला जायचा प्लान करताय? ‘मुंबई-गोवा वंदे भारत’ट्रेनच्या शेकडो फेऱ्या रद्द; कारण आले समोर
12
क्रूरतेच कळस! हुंड्यात कार न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीला मारलं, मणक्याचं हाड तोडलं अन्... 
13
रणथंबोरची राणी, मगरींच्या शिकारीसाठी प्रसिद्ध; 'अ‍ॅरोहेड'ने घेतला अखेरचा श्वास...
14
Maharashtra Election : महापालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुका कधी होणार? समोर आली मोठी अपडेट
15
Iran Israel War : 'पुतिन आमची मदत करा...', इस्रायलने बॉम्ब टाकल्यावर खामेनींना रशियाची आठवण झाली, परराष्ट्रमंत्र्यांना दूत म्हणून पाठवले
16
जगाच्या नकाशावर नाहीसा होऊ लागलाय 'हा' सुंदर देश; शास्त्रज्ञांनाही फुटलाय घाम!
17
स्वामींच्या मठात गेल्यावर तुम्हालाही ‘या’ २ गोष्टींचा अनुभव आला आहे का? उत्तर हो असेल तर...
18
युद्धातही श्रीमंतीचा डंका! इस्रायलची सर्वात श्रीमंत महिला चर्चेत! कसं उभं केलं ५.१६ लाख कोटींचं साम्राज्य?
19
तीन वेळा पतीचा जीव घेण्याचा केला प्रयत्न; चौथ्यांदा चिकन भात खायला देत कायमचा संपवला
20
Nag Panchami 2025: यंदा नागपंचमी कधी? कालसर्प दोष निवारणासाठी 'हा' दिवस राखीव ठेवाच!

पदोन्नतीमध्ये लाभ द्या

By admin | Updated: September 21, 2015 00:26 IST

जिल्ह्यात सर्व शासकीय कार्यालयात मोठ्या प्रमाणात धनगर समाजाचे कर्मचारी कार्यरत आहेत.

धनगर समाजाची मागणी : नाना पटोले यांना निवेदनचिचाळ : जिल्ह्यात सर्व शासकीय कार्यालयात मोठ्या प्रमाणात धनगर समाजाचे कर्मचारी कार्यरत आहेत. मात्र पदोन्नतीमध्ये दरवर्षी त्यांना डावलण्यात येते. वर्षाला होणाऱ्या पदोन्नतीमध्ये धनगर एन. टी. ‘क’ दर्जाच्या कर्मचाऱ्यांचा समाविष्ट करावा, या आशयाचे निवेदन खासदार नाना पटोले व मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र निंबाळकर यांना धनगर समाज संघर्ष समितीच्या वतीने देण्यात आले.भंडारा जिल्ह्यात धनगर समाज मोठ्या प्रमाणात आहे. या समाजात शिक्षणाचा अभाव आहे. या समाजातील युवक चतुर्थश्रेणी पदावर विविध कार्यालयात पदावर कार्यरत आहेत. शासनाने धनगर समाजाला एन.टी. ‘क’ चे सर्वात जास्त प्रमाणात आरक्षण असुन सुध्दा दरवर्षी होणाऱ्या पदोन्नतीमध्ये एन.टी. ‘क’ ऐवजी एन.टी.‘ब’ आणि एन.टी. ‘ड’ ची नियुक्ती करुन एन.टी.‘क’ वर अन्याय करीत आहेत. यावर्षी होणाऱ्या पदोन्नतीमध्ये धनगर एन.टी. ‘क’ प्रवर्गातील कर्मचाऱ्यांची पदोन्नती करण्यात यावी अशी मागणी आहे. निवेदन देणाऱ्या शिष्टमंडळात धनगर समाज संघर्ष समिती जिल्हाध्यक्ष राजकुमार मरठे, जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश हातेल, पंडीतराव पांडे, प्रा. दिलीप ढगे, सुनिल सुर्यवंशी, सुकराम धनीस्कार, तुळशीराम खऊळ आदींचा समावेश होता. (वार्ताहर)