जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन : मिलिंद धारगावे यांची मागणीभंडारा : रोजगार हमी योजनेच्या कामावर ९० दिवसांपेक्षा कमी काम करणाऱ्या मजूरांना इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळाच्या योजनेचा लाभ द्यावा. यामुळे त्यांचे जीवनमान उंचावेल, अशी मागणी मिलिंद धारगावे यांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.राज्य शासनाने सन २०११ पासून इमारत व इतर बांधकाम करणाऱ्या मजुरांसाठी व महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या कामावरील मजूरांसाठी विविध योजना सुरू केल्या आहेत. परंतु या योजनेचा लाभ गरजू लाभार्थ्यांना मिळत नाही.कारण रोजगार हमी योजनेअंतर्गत मजुरांना देण्यात येणारे काम ९० दिवस राहत नाही. जे कामगार ९० दिवसाच्या आत काम करतात तेव्हा तेच मजूर इमारत बांधकामाच्या कामावर सुध्दा मिळेल त्या ठेकेदाराजवळ काम करत असतात. परंतु असे मजूर ९० दिवसाच्या कमी कामामुळे या योजनेपासून वंचित राहतात.अशा कामगारांचा विचार करून रोजगार हमी योजनेत काम करणाऱ्या मजुरांची इमारत व इतर बांधकाम मंडळात नोंदणी करावी. त्यामुळे कोणतेही कामगार शासनाच्यावतीने चालत असलेल्या योजनांपासून वंचित राहणार नाही, अशी मागणी भारतीय जनता पार्टीप्रणीत सैनिक आघाडीचे जिल्हाध्यक्ष मिलिंद धारगावे यांनी केली आहे. (शहर प्रतिनिधी)
रोहयो मजुरांना कल्याणकारी मंडळाच्या योजनांचा लाभ द्या
By admin | Updated: July 31, 2016 00:22 IST