शहरं
Join us  
Trending Stories
1
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
4
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
5
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
6
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
7
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
10
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
11
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
12
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
13
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
14
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
15
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
16
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
17
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
18
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
19
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
20
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

मुलींनी स्पर्धा परीक्षेकडे वळावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2018 23:14 IST

प्रत्येक क्षेत्रात मुली अग्रेसर आहेत. मुलींनी ठराविक शिक्षण घ्यावे असे बंधन आता राहिलेले नाही. महाराष्ट्र शासनाने मुलींच्या शिक्षणासाठी विविध योजनांची अंमलबजावणी सुरू केलेली आहे तरीही स्पर्धा परीक्षांमध्ये त्यांची टक्केवारी अत्यल्प आहे.

ठळक मुद्देकमलेश जिभकाटे : लेक शिकवा अभियान

आॅनलाईन लोकमतपवनी : प्रत्येक क्षेत्रात मुली अग्रेसर आहेत. मुलींनी ठराविक शिक्षण घ्यावे असे बंधन आता राहिलेले नाही. महाराष्ट्र शासनाने मुलींच्या शिक्षणासाठी विविध योजनांची अंमलबजावणी सुरू केलेली आहे तरीही स्पर्धा परीक्षांमध्ये त्यांची टक्केवारी अत्यल्प आहे. उणीव भरुन काढण्यासाठी मुलींनी स्पर्धा परीक्षेची तयारी करावी असे प्रतिपादन तालुका संरक्षण अधिकारी कमलेश जिभकाटे यांनी केले.शिक्षण विभाग पंचायत समिती पवनी तर्फे नगर परिषद विद्यालयाच्या सभागृहात आयोजित सावित्रीबाई फुले लेक शिकवा अभियानात अध्यक्षीय भाषणात ते बोलत होते. शिक्षणासोबतच मुलींनी स्वसंरक्षणाचे धडे घ्यायला पाहिजे कारण स्त्रीयांवर अन्याय, अत्याचार वाढत आहेत. अन्यायाविरुद्ध लढण्याची तयारी महिलांनी केली पाहिजे असे मत जिभकाटे यांनी यावेळी व्यक्त केले. याप्रसंगी शिक्षण विस्तार अधिकारी शिल्पा निखाडे, मुख्याध्यापक संघाचे विभागीय कार्याध्यक्ष अशोक पारधी, योग शिक्षक तथा सेवानिवृत्त मुख्याध्यापिका पुष्पा बागडे, न. प. चे जेष्ठ शिक्षक जगदीश देशमुख प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.देशात स्त्रीभ्रूण हत्या वाढत असल्याने नागरिकांचे प्रबोधन करण्यासाठी शासनाने ' लेक वाचवा, लेक शिकवा' अभियान सुरू केले. मुलगा असो वा मुलगी दोन्ही सारखेच ही भावना जनमानसात रुजू लागली आहे. मुलींनी खुप शिकायला पाहिजे असे वाटत असेल तर पुरुषांना मानसिकता बदलायल हवी असे विचार मुख्याध्यापक अशोक पारधी यांनी व्यक्त केले.पुष्पा बागडे यांनी सुदृढ राहण्यासाठी योग - प्राणायाम आवश्यक असल्याचे प्रतिपादन केले.उद्घाटन प्रसंगी संगीत शिक्षक शशांक आठल्ये आणि चमूने हमे इतनी शक्ती देना दाता हे समुह गीत सादर केले.वैनगंगा विद्यालय, विकास विद्यालय, नगर परिषद विद्यालय व गांधी विद्यालय कोंढा येथील विद्याथ्यीर्नींनी पथनाट्य सादर केले. प्रास्ताविक शिक्षण विस्तार अधिकारी शिल्पा निखाडे यांनी केले. संचालन सहा. शिक्षिका संगीता उताणे यांनी तर आभार साधन व्यक्ती दिपाली बोरीकर यांनी मानले.