शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: जे लोकसभेला कमावले, ते विधानसभेला का गमावलं?; उद्धव ठाकरेंची चूक कबुल केली, म्हणाले...
2
Video: मुंबई गुजरातचाच भाग होता, मराठी लोक केवळ ३२ टक्केच; भाजपा खासदार निशिकांत दुबे पुन्हा बरळले
3
'मला वाटतं ५ विमानं पाडण्यात आली...', भारत-पाकिस्तान तणावावर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा दावा
4
जीवघेणा कॅन्सर कायमचा संपणार! शास्त्रज्ञांनी क्रांतीकारी mRNA लस केली विकसित
5
China Rare Earth Quotas: चीननं शांततेत केलं हे काम, भारताचं टेन्शन वाढणार; कसे धोक्यात येतील हे व्यवसाय?
6
'समुद्रात बुडवून बुडवून मारू', राज ठाकरेंच्या टीकेला, खासदार दुबेंनी दिले प्रत्युत्तर; पुन्हा हिंदी भाषेवर म्हणाले,...
7
"मराठी माणूस हिंदी सिनेमात हिरो होऊच शकत नाही, कारण...", अशोक सराफ स्पष्टच बोलले
8
सावध ! विंचू पिंडीवर बसलाय ! पडळकर हा विषय अत्यंत गंभीर अन् आव्हाडांची गँग...
9
आजचे राशीभविष्य, १९ जुलै २०२५: यश प्राप्तीसाठी कठोर परिश्रम करावे लागतील
10
गौरी योगात कामिका एकादशी: ८ राशींवर धनलक्ष्मी कृपा, पदोन्नती-पगारवाढ; सुबत्ता-कल्याण काळ!
11
मुख्यमंत्री संतापले : लाेक म्हणतात आमदार माजले, आपण लाथाबुक्क्यांतून संदेश देणार आहोत का?
12
मराठा आरक्षण : अंतिम सुनावणीस सुरुवात, अंतरिम स्थगिती देण्याची याचिकाकर्त्यांची मागणी
13
आयपीएस सुपेकरांवर कारवाई का नाही? वैशाली हगवणे आत्महत्या, पोलिसांवर कडक ताशेरे
14
मंत्र्यांच्या आईच्या नावावर डान्सबार; अनिल परब यांचा आरोप
15
कर्जमाफीचे आश्वासन पूर्ण करूच, शेतकऱ्यांसाठी कधी हात आखडता घेतला नाही : मुख्यमंत्री
16
मी तसे बोलायला नको होते; सभागृहात आणि बाहेर केलेल्या विधानांवरून आमदारांचा माफीनामा
17
‘विधिमंडळ प्रवेश पास ५ ते १० हजारांत विकले जातात’; आमदारांच्या आरोपाने खळबळ
18
दुबे यांनी मुंबईत येऊन दाखवावे, समुद्रात बुडवून बुडवून मारू; राज ठाकरेंचे भाजप खासदाराला प्रत्यूत्तर 
19
गांजा घरातच ‘पिकविण्या’चा नवा उद्योग; चार वर्षांपूर्वी पोलिसांना कल्पनाही नव्हती...
20
शेतकऱ्यांसाठी अलर्ट : टॅरिफमुळे अमेरिकेची कृषी उत्पादने भारतात आल्यास गंभीर परिणाम 

मुलींनी ध्येय ठरवून स्वत:ला सक्षम बनवावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2017 22:37 IST

मुलींनी स्वत:चे ध्येय ठरवा ते पूर्ण करण्यासाठी कठोर परिश्रम करून आत्मनिर्भर व्हा, सक्षम बना, धैर्यवान व्हा,....

ठळक मुद्देविनिता साहू : शालेय मुलींसाठी स्वसंरक्षण शिबिर, महिला आयोग व पोलीस विभागाचे आयोजन

लोकमत न्यूज नेटवर्कसाकोली : मुलींनी स्वत:चे ध्येय ठरवा ते पूर्ण करण्यासाठी कठोर परिश्रम करून आत्मनिर्भर व्हा, सक्षम बना, धैर्यवान व्हा, अन्यायाचा प्रतिकार करायला शिका, पोलिसांची भीती बाळगू नका, अन्याय, अत्याचार झाल्यास पोलीस स्टेशनमध्ये तक्रार करा, अन्याय करणाºयापेक्षा अन्याय सहन करणारा जास्त गुन्हेगार असतो, असे प्रतिपादन पोलीस अधीक्षक विनिता साहू यांनी केले.भंडारा पोलीस दल व राज्य महिला आयोग यांचे वतीने शालेय विद्यार्थीनीचे लैगीक अत्याचार प्रतिबंध व संरक्षण प्रशिक्षण शिबिराचे आयोजन साकोली येथील मनोहरभाई पटेल महाविद्यालयात बुधवारी करण्यात आले. या शिबिरात उद्घाटन प्रसंगी त्या बोलत होत्या.यावेळी व्यासपीठावर राज्य महिला आयोग सदस्या अंकिता ठाकरे, साकोली पोलीस उपविभागीय अधिकारी श्रीकांत डिमले, एम.बी. पटेल कॉलेजचे प्राचार्य डॉ. नरेश त्रिवेदी, महिला आयोगाच्या जिल्हा समुपदेशक मृणाल मुनीश्वर, समन्वयक वैशाली केळकर, शिक्षण विस्तार अधिकारी आर.एस. बांते उपस्थित होते. १३ सप्टेंबरपासून १७ सप्टेंबर अशा पाच दिवसीय शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. पुढे बोलताना पोलीस अधिक्षिका विनिता साहू पुढे म्हणाल्या फेसबुक, सोशल मिडिया या आधुनिक तंत्रज्ञानातून फसवणूक होऊ शकतो. या तंत्राचा सुरक्षित वापर करून धोके ओळखा. स्वत:चे संरक्षण करण्यासाठी पोलीस विभाग तसेच महिला आयोगातर्फे स्वसंरक्षण शिबिराचे आयोजन करून किशोरवयीन मुलींना निर्भर बनवण्यसाठी या शिबिराचे आयोजन केले आहे. मुलींनी यांचा उपयोग करून सक्षम बनायचे आहे.राज्य आयोग सदस्य नीता ठाकरे यांनी, जिल्ह्यातील साकोली, पवनी, भंडारा या तालुक्यात मुली पळून जाणे व पळवून नेणे याचे प्रमाण सर्वाधिक आहे. किशोरवयीन मुलींमध्ये शारीरिक बदलामुळे मुलांप्रती आकर्षण निर्माण होते. त्यातून मुलींकडून चुका घडतात. मुलींना भविष्यातील धोक सांगणे हा शिबिराचा उद्देश आहे. प्रास्ताविकातून जिल्हा समुपदेशिका मृणाल मुनीश्वर यांनी, आजची किशोरी उद्याची माता आहे. तिला सक्षम करणे यासाठी महिला आयोगाकडून प्रयत्न केले जाते आहे. साकोली पोलीस उपविभागीय अधीक्षक श्रीकांत डिसले यांनी करियर विषयक मार्गदर्शन केले. संचालन मनिषा काशिवार यांनी केले. आभार वैशाली केळकर यांनी मानले. कार्यक्रमासाठी सविता सोनकुसरे, स्रेहल रामटेके, सुधीर वर्मा, अनुराधा फुकट आदींनी सहकार्य केले.