भंडारा येथील लालबहाद्दूर शास्त्री विद्यालयाची पूनम भोजराज शहारे ही विज्ञान शाखेची विद्यार्थिनी जिल्ह्यातून पहिली आली आहे. तिला ९२.४६ टक्के (६0१) गुण मिळाले आहेत. परसोडी येथील ओम सत्यसाई कनिष्ठ विद्यालयाचा दर्शन गिरीधर ब्राम्हणकर हा विद्यार्थी जिल्ह्यातून द्वितीय आला असून त्याला ९१.६९ टक्के (५९६) गुण मिळाले. शहापूर येथील नानाजी जोशी विद्यालयाची उत्तरा श्रीराम इंगळे ही विद्यार्थिनी तृतीय आली असून तिला ८९.६९ टक्के (५८३) गुण मिळाले आहेत निकाल जिल्ह्यातून १५ हजार ९७७ विद्यार्थ्यांनी आवेदन अर्ज भरले होते. त्यापैकी १५ हजार ९६४ विद्यार्थ्यांंनी परीक्षा दिली. यापैकी १४ हजार ९८ विद्यार्थी ऊतीर्ण विद्यार्थ्यांंमध्ये ६ हजार ४६८ मुले तर ७ हजार ६३0 मुलींचा समावेश आहे. यात ३५५ विद्यार्थी प्राविण्यप्राप्त ठरले. २,९८६ विद्यार्थी प्रथम श्रेणीत, ९,१00 विद्यार्थी द्वितीय श्रेणीत तर १,७३१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.शाखानिहाय
जिल्ह्यात
निकाल विज्ञान शाखेचा निकाल ९४.१६ टक्के, कला शाखेचा निकाल ८३.३0 टक्के, वाणिज्य शाखेचा निकाल ९0.६१ टक्के तर एमसीव्हीसी शाखेचा निकाल ९0.७७ टक्के लागला आहे. शाखानिहाय विद्यार्थ्यांंमध्ये विज्ञान शाखेचे ६,00९ विद्यार्थी, कला शाखेचे ६,९३0 विद्यार्थी, वाणिज्य शाखेचे ८२0 तर एमसीव्हीसी शाखेचे ४१३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. जिल्ह्यातील ५६ परीक्षा केंद्रातून या विद्यार्थ्यांंनी परीक्षा दिली होती. साकोली
आघाडीवर भंडारा
१४
जिल्ह्याचा निकाल ८८.३१ टक्के लागला असून जिल्ह्यातील सातही तालुक्यातून साकोली तालुका विद्यार्थ्यांंच्या उत्तीर्ण होण्याच्या टक्केवारीत आघाडीवर आहे. लाखांदूर तालुक्याचा निकाल पिछाडीवर आहे. यात साकोलीची टक्केवारी ९१.३१, भंडारा ९१.0८, पवनी ९0.७३, लाखनी ८६.६४, तुमसर ८६.१६, मोहाडी ८५.३७ तर लाखांदूर तालुक्याची टक्केवारी ८0.७१ इतकी आहे. सातही तालुक्यातून मुलांची उत्तीर्ण होण्याची टक्केवारी ८५.६२ असून मुलींची टक्केवारी ९0.७३ आहे. तालुकानिहाय उत्तीर्ण विद्यार्थी हजार ९८ विद्यार्थी उत्तीर्ण विद्यार्थ्यांंमध्ये भंडारा तालुक्यातून ४,३७३ परीक्षार्थ्यांंपैकी ३,९८३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. लाखांदूर तालुक्यातून १,१७७ पैकी ९५0 विद्यार्थी, लाखनी तालुक्यातून १,९२४ पैकी १,६६७ विद्यार्थी, मोहाडी तालुक्यातून २,२७0 पैकी १,९३८ विद्यार्थी, पवनी तालुक्यातून २,00६ पैकी १,८२0 विद्यार्थी, साकोली तालुक्यातून १,९३४ पैकी १,७६६ विद्यार्थी, तुमसर तालुक्यातून २,३७७ पैकी २,0४८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. १
यंदाच्या
00 टक्के निकालाच्या ८ शाळा १२ वी परीक्षेत जिल्ह्यातील ८ शाळांनी निकालाच्या टक्केवारीत १00 गाठली आहे. यात भंडारा तालुक्यातून २, लाखांदूर १, लाखनी २ तर मोहाडी, पवनी व तुमसर येथील एका शाळेचा समावेश आहे. जुन्या
अभ्यासक्रमाचा निकाल
बारावीच्या
१७ टक्के परीक्षेत जुन्या अभ्यासक्रमाचा भंडारा जिल्ह्याला निकाल १६.९९ टक्के लागला आहे. जुन्या अभ्यासक्रमाद्वारे परीक्षा देणार्या विद्यार्थ्यांंना फेब्रुवारी २0१४ ची टर्म शेवटची होती. यानंतर नवीन अभ्यास क्रमानुसार परीक्षा द्यावी लागणार आहे. विज्ञान शाखेतील ७0३ विद्यार्थ्यांंनी परीक्षा दिली. यात १५८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. कला शाखेतून २,३१४ विद्यार्थ्यांंपैकी ३६३ विद्यार्थी पास झाले. वाणिज्य शाखेत २९३ विद्यार्थ्यांंंपैकी ३९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. कौशल्य अभ्यासक्रमांतर्गत ३९ विद्यार्थ्यांंनी परीक्षा दिली. यापैकी ९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. जिल्ह्यातील ३,३४९ विद्यार्थ्यांंंनी परीक्षा दिली. यापैकी ५६९ विद्यार्थी ऊत्तीर्ण झाले. नागपूर विभागात राज्यशास्त्र ९५.४८ टक्के, इतिहास ९५.४७ टक्के, समाजशास्त्र ९५.३३ तर अर्थशास्त्