शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
3
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
4
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
5
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
6
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
7
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
8
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
9
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
10
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
11
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
12
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
13
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
14
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
15
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
16
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
17
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
18
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
19
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
20
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
Daily Top 2Weekly Top 5

बहुरुप्यांच्या पालावर मुलीचा वाढदिवस

By admin | Updated: June 7, 2017 00:31 IST

गावोगावी भटकंती करून कुटुंबाचे उदरनिर्वाह करणारा बहुरूपी समाजबांधव आजही आधुनिक जगापासून कोसोदूर आहे.

आनंदोत्सव : लाखनीच्या ब्रोकन मेन सोशल मुव्हमेंटचा पुढाकारलोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : गावोगावी भटकंती करून कुटुंबाचे उदरनिर्वाह करणारा बहुरूपी समाजबांधव आजही आधुनिक जगापासून कोसोदूर आहे. यांच्या वाड्या, झोपड्यांमध्ये प्रगतीचा प्रकाश पडलेला नाही. प्रगतीपासून दूर असलेल्या या समाजातील मतीमंद नयना राजू तांदुळकर या मुलीचा वाढदिवस साजरा करण्यात आला. हा प्रकार बहुरूपी समाजासाठी अभिनव ठरला असला तरी, ज्यांनी हा कार्यक्रम आयोजीत केला होता त्यांनी जगासमोर आदर्श निर्माण केला आहे.लाखनी येथील सामाजिक कार्यकर्ते तथा ब्रोकन मेन सोशियल मुव्हमेंटचे संयोजक सी. एम. बागडे, डॉ. सुरेश खोब्रागडे, डॉ. रेवाराम खोब्रागडे यांनी पालावर जाऊन मुलीचा वाढदिवस साजरा केला. वाढदिवसानिमित्त मुलीला नवीन कपडे घेऊन दिले. तिच्या वाढदिवसानिमित्त केक कापून तथा अल्पोपहाराची व्यवस्था करून पालावर आनंदोत्सव साजरा केला. तसेच त्यांना मार्गदर्शनही केले. यावर्षी पालावरची मुले विनोद बांते यांच्या मदतीने जिल्हा परिषद शाळेत जाणार आहेत. देशाला स्वातंत्र मिळून ७० वर्षे झालीत. तरीही अजूनही भटके विमुक्त, बहिरुपी आणि इतर उपेक्षित जाती - जनजातीचे लोक मुख्य प्रवाहापासून दूर आहेत. विविध सोंगे घेऊन लोकांच्या दारात जाऊन भीक मागणारी बहिरुपी जमात आजही भटक्याचे जीवन जगत असून गेल्या तीन वर्षापासून राष्ट्रीय महामार्गावरील भिलेवाडा येथे वास्तव्याला आहेत. अन्न, वस्त्र आणि निवारा या जीवन जगण्याच्या मुलभूत सुविधांपासून त्यांना वंचित राहावे लागते. पालांवर राहून आणि विविध आरोपांच्या छत्रछायेखाली माणुसकी गहाण ठेवून त्यांना अत्यंत अमानुषरितीने जीवन जगावे लागते. ३३ लोकंचे कुटुंब गेल्या अनेक वर्षापासून भटकंती करीत तीन वर्षापासून भिलेवाडा येथील सरपंच त्रिवेणी बांते आणि विनोद बांते यांच्या सहकार्याने वास्तव्य करून आहेत. त्या आधी १० वर्षे त्यांनी पिंपळगाव येथे घालविले होते. पालावर एका समाज मंदिराचे बांधकाम लोकवर्गणीतून आणि अंकुश सादुराम तांदुळकर यांच्या आणि सरपंचाच्या पुढाकारातून सुरु असून सी.एम. बागडे यांनी त्या कामात सढळ हाताचे चार हजार रुपये देऊन सहकार्य केले. पावसाळा काही दिवसानंतरच सुरु आहे. परंतु समाजमंदिर पैसा अभावी छताविना पडून आहे.