शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
3
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
4
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
5
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
6
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
7
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
8
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
9
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
10
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
11
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
12
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
13
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
14
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
15
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
16
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
17
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
18
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
19
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
20
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
Daily Top 2Weekly Top 5

मुलींनो झाशीची राणी बना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2017 22:37 IST

प्रचंड प्रयत्न करा, तरीही अपयश आले तरी अपयश पचवता आले पाहिजे. त्यासाठी अभ्यासातून ज्ञान मिळवा. त्याने तुमच्यात आत्मविश्वास निर्माण होईल.

ठळक मुद्देसंजय देशमुख : विद्यार्थ्यांसाठी प्रशिक्षण शिबिर

लोकमत न्यूज नेटवर्कसाकोली : प्रचंड प्रयत्न करा, तरीही अपयश आले तरी अपयश पचवता आले पाहिजे. त्यासाठी अभ्यासातून ज्ञान मिळवा. त्याने तुमच्यात आत्मविश्वास निर्माण होईल. मुलींनो अर्धा तास व्यायाम करावा, देशी गाईचे दूध रोज प्यावे, धैर्य, हिंमत, संयम स्वत:मध्ये निर्माण करा, कामाशी प्रामाणिक राहा. जिद्दीने ध्येय गाठा, अन्याय सहन करू नका. मुलींनी स्वत:ला दलित गुलाम समजू नका, आत्मनिर्भर बना, असे प्रतिपादन जिल्हा सत्र न्यायाधीश संजय देशमुख यांनी केले.साकोली येथील विद्यार्थिनींसाठी सुरु असलेल्या लैंगिक अत्याचार प्रतिबंध व स्वसंरक्षणासाठी धडे प्रशिक्षण शिबिराचे आयोजन मनोहरभाई पटेल महाविद्यालयात केले होते, यावेळी ते बोलत होते. यावेळी स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ.छाया कापगते, भंडारा जिल्हा अप्पर पोलीस अधीक्षक रश्मी नांदेडकर, पोलीस विभागाचे उपविभागीय अधिकारी श्रीकांत डिसले, महिला आयोगाच्या जिल्हा समुपदेशिका मृणाल मुनीश्वर, जिल्हा समन्वयक वैशाली केळकर उपस्थित होत्या.यावेळी स्त्री रोग तज्ज्ञ डॉ.कापगते यांनी आरोग्यविषयक मार्गदर्शन केले. किशोरवयीन मुुलींच्या शरीरातील बदल तसेच आहार, सुरक्षेसाठी तंत्र याविषयी माहिती दिली. अप्पर पोलीस अधीक्षक रश्मी नांदेडकर म्हणाल्या, साकोली तालुक्यात अल्पवयीन मुलींना फुस लावून पळवून नेणे किंवा किशोरवयीन मुली पळून जाणे असे प्रकार वाढले आहे. मुलींना स्वत:चे महत्त्व समजून घ्या, स्त्री ही वापरून घ्यायची वस्तू नाही. मुलींनी स्वत:च्या करिअरवर स्वयंकेंद्रीत व्हावे. उज्ज्वल यश मिळवावे.उपविभागीय अधिकारी श्रीकांत डिसले यांनी यशाचा मार्ग सांगितला. चारित्र्य जपा. आईवडीलांचे नाव कलंकीत होईल असे कुठलेही काम करू नका असे प्रतिपादन केले. उपविभागीय अधिकारी अर्चना मोरे यांनी, मुलींनी स्वत:मधील गुण ओळखा. प्रयत्नातून ध्येय गाठा, असे प्रतिपादन केले. संचालन मनिषा काशिवार यांनी केले. तर आभार वैशाली केळकर यांनी मानले. यावेळी अनेकांची उपस्थिती होती.