शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटी नंतर MRP वर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सामान्यांच्या थेट खिशावर परिणाम होणार...
2
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
3
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
4
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
5
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
6
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
7
"तरीही त्याला कुत्रा चावतो.."; पाकिस्तानी सलामीवीर सॅम अयुबबाबत नेमकं काय बोलला माजी खेळाडू?
8
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
9
पितृपक्ष २०२५: चतुर्दशी श्राद्धाला असते विशेष महत्त्व, पण असे का? पाहा, काही मान्यता
10
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
11
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू
12
Garud Puran: मृत्यूनंतर मोक्ष मिळेल का माहीत नाही, पण जिवंतपणी 'या' उपायांनी मिळू शकेल!
13
परप्रांतीयांना भाड्याने घरं देऊ नका, पंजाबमध्ये ठिकठिकाणी आवाहन; यूपी-बिहारींना हाकलण्याची मागणी
14
"काय अर्थ निघतील, याचाही विचार केला पाहिजे", CM फडणवीसांनी गोपीचंद पडळकरांचे टोचले कान
15
तीन सख्ख्या बहिणींवर नातेवाईकच २०२० पासून करत होता बलात्कार; अहिल्यानगरमधील संतापजनक घटना
16
विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीला 'खासदारकी'मुळे आव्हान, न्यायालयाने काय दिला निकाल?
17
स्कँडल, कर्ज आणि घसरते शेअर्स... जगातील सर्वात मोठ्या फूड कंपनीला वाचवू शकतील का नवे बॉस?
18
VIDEO: अरे देवा! 'मोटूलाल'ने प्यायली ७२ लाखांची दारू, जमीनही विकली; मुलाखत झाली व्हायरल
19
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत संघात स्थान का मिळालं नाही? कुलदीपचं गंभीरबाबत मोठं विधान, म्हणाला...
20
'सकाळी उठतात, डोळे चोळत काहीही पोस्ट करतात...', कंगना राणौतचा राहुल गांधींवर पलटवार

तरूणीची भेट तरूणाच्या अंगलट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2017 00:18 IST

सावधान... तरुणीला भेटण्यासाठी फोन करताय, तुम्ही अलगत सापळ्यात अडकू शकता.

भावाच्या मित्राने धू-धू धुतले : पोलीस कोठडीत होळीचा झाला बेरंगमोहाडी : सावधान... तरुणीला भेटण्यासाठी फोन करताय, तुम्ही अलगत सापळ्यात अडकू शकता. एवढंच कशाच धुतलेही जाणार. असाच प्रकार रंगपंचमीच्या दिवशी मोहाडीत घडला. तरुणीला वारंवार फोन करणे तरूणाच्या अंगलट आले. काल धुळीवंदनाचा दिवस होता. होळीचा रंगपंचमीचा दिवस तरूणाला बेफान करून जाते. या बेफान तरुणाने मोहाडीच्या एका तरुणीला भ्रमणध्वनी केला. गुलाल गाली लावून प्रेमाची पावती मिळेल ही भोळी आशा त्या तरुणाच्या अंगलट आली. सिरसोली (कान्हळगाव) येथील तरुण लक्ष्मण उर्फ लच्छू जयचंद दमाहे (२५) हा मोहाडीतील एका तरुणीला वारंवार फोन करायचा.तिला भेटण्यासाठी आग्रह करायचा. भेट कधी घडणार यासाठी तो कासावीस होता. भेटण्याचा मुहूर्त छान आहे समजून त्याने रंगपंचमीच्या दिवशी तिला भ्रमणध्वनी केला. तरुणीनेही भेटण्याचा होकार दिला. पहिल्या भेटीत रंगून जाऊन चांदपूरचे दर्शनही करू असे ठरविले. तरुण एकदम खूश झाला. कधी तिला भेटतोय याचा क्षण शोधत होता. मोहाडीच्या तहसील जवळील बसस्थानकमध्ये भेटण्याचे ठरले. ती ठरलेल्या ठिकाणी आली. पण त्याला काय माहिती, माझ्यासाठी जाळे विणले गेले आहे. ती तरुणी अन् तरूणीच्या वडिलासह मित्र तिथेच होते. तो आला अन् तरुणीला भेटला. पुढे काय? आधी त्याला धू-धू धुतले. पोलिसांना खबर केली. पोलीसही आले. त्याला उचलले. गुन्हा दाखल केला. रात्रभर पोलीस कोठडीत राहिला. विशेष म्हणजे ही तरुणी त्याला कधीच भेटली नाही. अन् तोही भेटला नव्हता. तो तरुण भ्रमणध्वनीच्या माध्यमातून तरुणीशी सूत जुळविण्याचा प्रयत्न करीत होता. तथापि तो असफल ठरला. तरुणीवर रंग उधळण्याचा निश्चयाने आलेल्या त्या मजनूला चोप तर खावाच लागला. शिवाय पोलीस कोठडीची हवा रात्रभर खावी लागली. (तालुका प्रतिनिधी)