शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

रस्त्याची वाट लावण्याचा घातला जातोय घाट!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2018 22:32 IST

तालुक्यातील खैरीपट येथे मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत होत असलेले रस्त्याचे निकृष्ट बांधकाम मागील चार दिवसांपासून सर्वत्र चर्चेचा विषय ठरलेला आहे. नियमांना धाब्यावर बसवून मनमानी कारभार करून निकृष्ट दर्जाचे बांधकाम करून रस्त्याची वाट लावण्याचा घाट लावण्याचा प्रयत्न केला जात आहे. संबंधित अभियंते व कंत्राटदाराची मनमर्जी दिसून येत आहे.

ठळक मुद्देबांधकामात मुरूमाचा वापर कमी : खैरीपट येथील कामाची सखोल चौकशीची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कलाखांदूर : तालुक्यातील खैरीपट येथे मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत होत असलेले रस्त्याचे निकृष्ट बांधकाम मागील चार दिवसांपासून सर्वत्र चर्चेचा विषय ठरलेला आहे. नियमांना धाब्यावर बसवून मनमानी कारभार करून निकृष्ट दर्जाचे बांधकाम करून रस्त्याची वाट लावण्याचा घाट लावण्याचा प्रयत्न केला जात आहे. संबंधित अभियंते व कंत्राटदाराची मनमर्जी दिसून येत आहे.सोमवारला लोकमतने या रस्त्यांच्या निकृष्ट बांधकामाचे वृत्त प्रकाशित केले होते. मात्र संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे कानाडोळा केल्याने अभियंते व कंत्राटदाराची आणखीनच मुजोरी वाढली असून करण्यात आलेल्या डांबरीकरण बांधकामादरम्यान रस्त्यांच्या पहिल्या थराला बोल्डर वापरून त्याची चांगल्या प्रकारे दबाई न करताच मुरूम घालण्यात आले आहे. मात्र टाकण्यात आलेला मुरूमाचा थर एक ते दोन इंचीचाच असून त्यावर अल्पप्रमाणात पाणी मारल्याने लगेचच दगड उखडले आहेत. त्यामुळे रहदारीच्या नागरीकांना सलग तीन किमीचा रस्ता खडतर मार्गाने गाठावा लागत आहे.मागील दोन महिण्यांपासून चालू असलेल्या या कामात अनेक प्रकारच्या त्रृट्या दिसून येत आहेत. बांधकाम चांगल्या दर्जाचे करण्यात यावे म्हणून स्थानिक लोकप्रतिनिधींनी सांगितले होते. मात्र कंत्राटदाराने शासन नियमांना धाब्यावर ठेवत लोकप्रतिनिधी व ग्रामस्थांचे न ऐकता बांधकाम सुरू ठेवले आहे. हा रस्ता मागील पाच वषार्पासून उखळला असून, या मार्गाने परिसरातील चौदा गावातील नागरिक रहदारी करीत असतात.त्यामुळे हा रस्ता चांगल्या दर्जाचा होऊन, जास्तीत जास्त वर्षे टिकावा असे सर्वांनाच वाटत आहे. मात्र सुरू असलेले रस्त्याचे काम पाहता लोकांमध्ये नाराजी दिसत आहे.या रस्त्यांच्या कामापासून अर्धा किमी अंतरावर असलेल्या सावरगाव या रस्त्यांचे काम दुसºया कंत्राटदाराला असून हे काम खुपच चांगल्या दजार्चे केले जात आहे. माहीतीनुसार, दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या पुणे येथील चमूने या रस्त्याची पाहणी केली असता. संबंधित अभियंते व कंत्राटदाराला धारेवर धरले होते. एवढेच नाही तर रामा ३६४ ते सावरगाव या रस्त्यांच्या कामावर नेऊन अशाप्रकारे चांगल्या दर्जाचे काम करण्यास सांगितले आहे.रस्त्यावर रचले मुरूम व गिट्टीचे ढिगारखैरीपट येथे प्लाँटवर सुरू असलेल्या रस्त्यांच्या बांधकामासाठी सदर कंत्राटदाराने रस्त्याचा मध्यभागी गिट्टी व मुरूमाची ढिगार रचली आहेत. खैरीपट ते विहीरगाव हे दोन्ही गावे १ किमी अंतरावर असल्याने विहीरगाव व खैरीपट प्लाँट येथील लोक रोज सकाळी दुध विकणे व अन्य कामाकरीता खैरीपट गावात ये-जा करीत असतात. मात्र रस्त्यांच्या मध्यभागी मुरूम, गिट्टीचे ढिगार असल्याने रहदारीच्या नागरीकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.