शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

मडेघाटच्या महिलांचा घागर मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2019 22:08 IST

तालुक्यातील मडेघाट येथे भीषण पाणी टंचाई निर्माण झाली असून त्यातच दहा दिवसांपासून नळ योजना बंद आहे. परिणामी त्रस्त झालेल्या महिलांनी सोमवारी लाखनी तहसीलवर घागर मोर्चा काढून आपला रोष व्यक्त केला. डोक्यावर पाण्याचे हंडे घेवून महिला मोर्चात सहभागी झाल्या होत्या.

ठळक मुद्देतहसीलदारांना निवेदन : दहा दिवसांपासून नळ योजना बंद

लोकमत न्यूज नेटवर्कलाखांदूर : तालुक्यातील मडेघाट येथे भीषण पाणी टंचाई निर्माण झाली असून त्यातच दहा दिवसांपासून नळ योजना बंद आहे. परिणामी त्रस्त झालेल्या महिलांनी सोमवारी लाखनी तहसीलवर घागर मोर्चा काढून आपला रोष व्यक्त केला. डोक्यावर पाण्याचे हंडे घेवून महिला मोर्चात सहभागी झाल्या होत्या.यावर्षी पाऊस कमी पडल्याने तलाव पुर्ण क्षमतेने भरले नाही. आता उन्हाचा तडाखा वाढत असल्याने जलस्त्रोत कोरडे पडले आहे. त्यामुळे लाखांदूर तालुक्यातील अनेक गावात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. मडेघाट येथेही पाण्यासाठी हाहाकार उडाला आहे. नळ योजना गत आठ ते दहा दिवसांपासून बंद आहे. संपूर्ण गावात पाणीटंचाई निर्माण झाली आहे. महिलांना तासन्तास पाण्यासाठी भटकंती करावी लागते.मडेघाट हे सहा हजार लोकसंख्येचे गाव आहे. गावासाठी चुलबंद नदीवर पाणीपुरवठा योजना तयार करण्यात आली. जवळपास ७ ते ८ किमी अंतरावरुन पाईपलाईनद्वारे पाणी आणले जाते. गावात असलेल्या टाकीत पाणी साठवून गावात वितरित केले जाते पंरतू नदी कोरडी पडल्याने नळ योजना कुचकामी ठरत आहे. मार्चच्या शेवटच्या आठवड्यातच नळ योजनेला घरघर लागली होती. नियोजन शुन्यतेमुळे गावात पाणी टंचाई निर्माण झाली आहे. यावर प्रशासनाने तोडगा काढावा म्हणून मडेघाट येथील महिला सोमवारी लाखांदूरात धडकल्या. येथील तहसील कार्यालय, गटविकास अधिकारी कार्यालय आणि पोलीस ठाण्यात जावून निवेदन देण्यात आले. ही नळयोजना पुर्ववत सुरु करण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली.पाण्यासाठी दाहीदिशामडेघाट सारखीच अवस्था लाखांदूर तालुक्यातील अनेक गावांची झाली आहे. महिलांना पाण्यासाठी पहाटेपासूनच भटकंती करावी लागत आहे. प्रशासनाने अद्यापही पाणीटंचाईच्या उपाययोजना प्रभावीपणे राबविल्या नाहीत.