शहरं
Join us  
Trending Stories
1
आता रशिया-युक्रेन युद्ध थांबणार? पंतप्रधान मोदींची फ्रान्सच्या अध्यक्षांसोबत चर्चा; मॅक्रॉन म्हणाले...!
2
ओबीसींचा महामोर्चा काढणार, दोन पातळ्यांवर लढणार; काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा निर्धार
3
विसर्जनासाठी गेलेला 'गणेश' गिरणा पात्रात वाहून गेला, आई-वडिलांच्या डोळ्यासमोरच तरुण मुलगा बुडाला... 
4
गुजरातमधील पंचमहल यथे मोठा अपघात; पावागडमध्ये रोपवे कोसळला, 6 जणांचा मृत्यू
5
“PM मोदींच्या नेतृत्वाखालील सक्षम, नवीन भारत आपले परराष्ट्र धोरण स्वतः ठरवतो”: CM फडणवीस
6
एकनाथ शिंदे यांनी घेतली शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांची भेट; म्हणाले, “अभिमानास्पद...”
7
गोपाळ शेट्टींसह मेहता, गुप्ता, मिश्रा अन् शर्मा यांच्यावर मुंबई भाजपानं दिली मोठी जबाबदारी
8
फक्त ३ वर्षांत दिला ५३२% परतावा, आता कंपनीला मिळाली ₹३,००,००,००० ची ऑरडर; ₹१०० पेक्षाही स्वस्त आहे शेअर!
9
Asia Cup Record : सचिन तेंडुलकर भारताचा 'नंबर वन ऑलराउंडर'; जयसूर्याची तर गोष्टच न्यारी
10
अमेरिका निघाली होती रशियाला पंगू बनवायला, आता स्वतःवरच आली अंडी खरेदीची वेळ! ३२ वर्षांत पहिल्यांदाच...
11
CM फडणवीसांकडून ग्रीन सिग्नल मिळताच अजित पवार गटाला बसणार झटका?; भाजपा आमदार लागले कामाला
12
राज ठाकरेंना मिळणार खास मान...यंदाचा शिवसेनेचा 'दसरा मेळावा' ठाकरे बंधू गाजवणार?
13
जीएसटी कमी झाल्यानंतर, किती रुपयांवर येईल Maruti Baleno? किती रुपयांचा होईल फायदा? जाणून घ्या
14
जगातील सगळ्यात महागडी शाळा; वर्षाची फी तब्बल १,१३,७३,७८० रुपये! आहे तरी कुठे नक्की?
15
चंद्रग्रहण २०२५: तुमच्या राशीनुसार करा ‘हे’ दान, धनवान बनाल; कल्याण होईल, सुख-सुबत्ता लाभेल
16
"गणित जुळलं की...", अभिनेत्री ऋतुजा बागवे लग्नाबद्दल स्पष्टच बोलली
17
DCM अजित पवार अन् पोलीस अधिकारी अंजना कृष्णा यांच्यात नेमका काय झाला संवाद? वाचा शब्द न् शब्द
18
भारत, पाकिस्तान, अमेरिका अन् जपानमध्ये आपत्ती येणार; बाबा वेंगाची 'ती' भविष्यवाणी खरी होणार?
19
“...तोपर्यंत मराठा समाजाला कायमस्वरूपी टिकणारे आरक्षण मिळणार नाही”: बाळासाहेब थोरात
20
५०० वर्षांनी चंद्रग्रहणात शुभ योग: ५ राशींचे पंचक सुटेल, लाभ मिळेल; ४ राशींनी सावध राहावे!

उठ तरुणा जागा हो, स्वच्छतेचा धागा हो!

By admin | Updated: January 5, 2017 00:39 IST

सर्वत्र अस्वच्छतेने कळस गाठला आहे. यामुळे त्याचा आरोग्यावर विपरित परिणाम होवून देशात हजारोंचा नाहक जीव जात आहे.

विद्यार्थ्यांनी गाजविली स्पर्धा : जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्षाची वक्तृत्व स्पर्धा भंडारा : सर्वत्र अस्वच्छतेने कळस गाठला आहे. यामुळे त्याचा आरोग्यावर विपरित परिणाम होवून देशात हजारोंचा नाहक जीव जात आहे. त्यामुळे ही परिस्थिती सुधारावी असी महाविद्यालयीन युवक युवतीनी इच्छा व्यक्त केली. अस्वच्छतेच्या अराजकतेचा विद्यार्थ्यांनी चांगलाच खरपूस समाचार घेत परिस्थिती सुधारण्यासाठी शौचालय बांधकाम करून गाव हागणदारी मुक्त करण्यासाठी ‘उठ तरुणा जागा हो, स्वच्छतेचा धागा हो’ असा मुलमंत्र देत शौचालय निर्मितीसाठी पुढाकार घेण्यासाठी एल्गार पुकारला. स्वच्छता जनजागृतीसाठी शासनाने कोट्यवंधीचा खर्च केला आहे. मात्र स्वच्छता अभियानाला केवळ अहवालापुरता प्रतिसाद मिळतो. मात्र त्यानंतर परिस्थिती जैसे थे असते. अशा परिस्थितीवर मात देण्यासाठी जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्ष शौचालय बांधकामावर काम करीत आहे. त्या अनुषंगाने ही शौचालय बांधकामाची मोहिम तेवत रहावी यासाठी सदर कक्षाच्यावतीने आज जिल्हा परिषद सभागृहात स्वच्छता मित्र वर्क्तृत्व करंडक स्पर्धा घेतली. यात जिल्ह्यातील सातही तालुक्यातील वर्क्तृत्व स्पर्धेत विजेते ठरलेले स्पर्धक आले होते. या महाविद्यालयीन युवक-युवतींनी समाजातील जुन्या प्रथा परंपरा राबविणाऱ्यांच्या कानपिचक्या घेतल्या. शौचालय बांधकाम करुन आरोग्य सुदृढ ठेवावे व समाजातील नागरिकांना स्वच्छतेचा संदेश द्यावा यासाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च करण्यात येत आहे. या अनुषंगाने आज घेण्यात आलेल्या स्पर्धेत महाविद्यालयीन युवक-युवतींनी सभागृह गाजविला. विविध महाविद्यालयातून आलेल्या या युवांनी शौचालय बांधकाम व त्याचा वापर करा हा मुलमंत्र समाजापर्यंत पोहचविण्याची शपथ घेतली. यावेळी युवांनी उघड््यावर शौचास जात असल्याने हवा प्रदुषणासह विविध रोगांचा आजाराने नागरिकांना जीव गमवावा लागतो. ही परिस्थिती सुधारण्यासाठी सर्वांनी सहकार्य करण्यासाठी पुढाकार घेण्याची गरज असल्याची यावेळी स्पर्धेतून सुर निघाले. नैसर्गिक साधन साम्रुगी असतानाही पृथ्वीचा समतोल बिघडत असून वसूधेचा नाश होत असल्याची चिंता यावेळी स्पर्धकांनी व्यक्त केली. लोकसंख्येसह कचरा प्रदुषणही वाढत आहे. माणुस शौचालयाचा शत्रु बनला असून ग्रामीण भागाचा विकास केल्यास देशाचा विकास करता येण्याची उर्मी व्यक्त केली. अस्वच्छता करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करणे गरजेचे आहे. अस्वच्छतेने सर्वत्र पोखरन झालेली असून आजाराचे मुळ कारण दुषित पाणी व अस्वच्छता आहे. आजारपणामुळे दरवर्षी मृत्यूचा आकडा वाढत आहे. त्यामुळे समाजातील प्रत्येक घटकाने स्वत:चे कर्तव्य समजून स्वच्छता राबवावी अशी प्रतिज्ञाच महाविद्यालयीन युवक-युवतींनी घेतली. जंगली स्वापदांचा अनेकांचा बळी गेला असून यातील अनेकजण हे शौचालयाला गेले असताना हा प्रकार घडला आहे. त्यामुळे प्रत्येकाच्या घरी शौचालय बांधकाम करावे असे वर्क्तृत्व स्पर्धेतून सुर उमटले. (शहर प्रतिनिधी) विजेत्यांची नावे जिल्ह्यातील सात तालुक्यातून कनिष्ठ व वरिष्ठ अशा दोन गटात २८ स्पर्धक सहभागी झाले होते. यात प्रत्येक गटातील विजेत्यांना बक्षीस देण्यात आले. कनिष्ठ व वरिष्ठ दोन्ही गटात तिसऱ्या क्रमांकासाठी प्रत्येकी दोघांची निवड करण्यात आली. कनिष्ठ गटातील प्रथम विजेता आकाश टेंभूर्णे, द्वितीय वेजेता त्रिवेणी समरीत तर तृतीय विजेते मिंजल शेख व विपूल रामटेके यांना संयुक्तीकरित्या घोषित करण्यात आले. वरिष्ठ गटात प्रथम क्रमांक नेहा हटवार या विद्यार्थीनीने पटकाविला तर द्वितीय क्रमांक मयुर बोरकर तर तृतीय क्रमांक निकिता डाखोरे व शैल शुक्ला यांना संयुक्तरित्या देण्यात आला.