शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

परिवर्तनाच्या लढाईसाठी सज्ज व्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2019 23:04 IST

कोका गावाच्या विकासात ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांची मोलाची भूमिका आहे. गावात अनेक योजना कार्यान्वित करण्यासाठी त्यांची धडपड असते. जीर्ण झालेल्या इमारतीच्या जागी आज त्यांच्या कर्तव्यामुळे सुसज्ज इमारत उभी राहिली आहे. तरुणानों, परिवर्तनाच्या लढाईसाठी तयार व्हा, गावाच्या विकासाला लागणाºया निधीची कमतरता पडू दिली जाणार नाही, असे प्रतिपादन शेतकरी, शेतमजूर काँग्रेस संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष नाना पटोले यांनी केले.

ठळक मुद्देनाना पटोले : कोका ग्रामपंचायतच्या नवीन इमारतीचे लोकार्पण

लोकमत न्यूज नेटवर्ककरडी (पालोरा) : कोका गावाच्या विकासात ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांची मोलाची भूमिका आहे. गावात अनेक योजना कार्यान्वित करण्यासाठी त्यांची धडपड असते. जीर्ण झालेल्या इमारतीच्या जागी आज त्यांच्या कर्तव्यामुळे सुसज्ज इमारत उभी राहिली आहे. तरुणानों, परिवर्तनाच्या लढाईसाठी तयार व्हा, गावाच्या विकासाला लागणाºया निधीची कमतरता पडू दिली जाणार नाही, असे प्रतिपादन शेतकरी, शेतमजूर काँग्रेस संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष नाना पटोले यांनी केले.कोका येथे शनिवारी नवनिर्मित ग्रामपंचायत इमारतीच्या लोकार्पण सोहळ्यात ते बोलत होते. या इमारतीचे उद्घान खासदार मधुकर कुकडे यांच्या हस्ते फित कापून करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून भंडारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष सुनील फुंडे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष नाना पंचबुध्दे, नरेश डहारे, गजानन झंझाड, राजेश हटवार, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष हितेश सेलोकर, जिल्हा परिषद सदस्य उत्तम कळपते, सुजाता फेंडर, बालू ठवकर, प्रभुजी फेंडर, हेमंत बांडेबुचे, रामकृष्ण बेदरकर, लोकेश खोब्रागडे, अतुल तिडके, कोकाचे सरपंच संजय इळपाते, उपसरपंच रवींद्र तिडके, ग्रामसेवक डी.एच. जाधव, ग्रामपंचायत सदस्य श्रीराम नेवारे, गोपीचंद कुंभारे, उषा चौधरी, जयश्री हातझाडे, सरीता कोडवते, वैशाली हातझाडे उपस्थित होते.नाना पटोले म्हणाले गावाचा विकास हा गावकºयांच्या हाती असतो. गावकºयांनी मनात घेतले तर गावांचा कायापालट करता येते. हे कोका येथील नागरिकांनी सिध्द करुन दाखविले आहे. या गावाचा आदर्श इतर गावांनी घेवून विकासासाठी पुढाकार घ्यावा, असे त्यांनी सांगितले.यावेळी खासदार कुकडे यांनी कोका ग्रामपंचायत पदाधिकाºयांच्या विकास कामांप्रती असलेल्या तळमळीची प्रशंसा केली. त्याचबरोबर गावाच्या विकासासाठी सर्वांची साथ घेण्याची आवश्यकता असल्याचे मत व्यक्त केले. याप्रसंगी सामाजिक क्षेत्रात उल्लखनिय कार्य करणाºया मान्यवरांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.कोका येथील वनवैभव आदिवासी आश्रम शाळा, इंदिरा हायस्कुल व प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करुन उपस्थितांची मने जिंकले. यावेळी कोकासह परिसरातील गावातील सरपंच व नागरिक उपस्थित होते.