शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

आपत्ती व्यवस्थापनासाठी सज्ज व्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2018 22:14 IST

वीज पडणे, भूकंप, अपघात, पूर व रोगराई या सारख्या आपत्ती केव्हाही येऊ शकतात. आपत्तीत आपल्यावर होणारी तारांबळ व नुकसान टाळण्यासाठी सर्वांनी आपत्ती व्यवस्थापनासाठी नेहमी सज्ज राहणे आवश्यक असल्याचे मत जिल्हाधिकारी शांतनू गोयल यांनी व्यक्त केले. जागतिक आपत्ती व्यवस्थापन सप्ताहानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

ठळक मुद्देशांतनू गोयल : आपत्ती व्यवस्थापन सप्ताहाचा जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते शुभारंभ

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : वीज पडणे, भूकंप, अपघात, पूर व रोगराई या सारख्या आपत्ती केव्हाही येऊ शकतात. आपत्तीत आपल्यावर होणारी तारांबळ व नुकसान टाळण्यासाठी सर्वांनी आपत्ती व्यवस्थापनासाठी नेहमी सज्ज राहणे आवश्यक असल्याचे मत जिल्हाधिकारी शांतनू गोयल यांनी व्यक्त केले. जागतिक आपत्ती व्यवस्थापन सप्ताहानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. अप्पर जिल्हाधिकारी दिलीप तलमले, निवासी उपजिल्हाधिकारी विजय भाकरे, उपजिल्हाधिकारी विलास ठाकरे, जी.जी. जोशी व आपत्ती व्यवस्थापन अधिकारी अभिषेक नामदास हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.९ ते १३ आॅक्टोंबर हा जागतिक आपत्ती व्यवस्थापन सप्ताह म्हणून जगभरात साजरा केला जाते. या सप्ताहात नागरिकांमध्ये आपत्ती विषयी जनजागृती करण्याचे काम प्रशासनातर्फे केले जाते. विविध विभागाच्या सहाय्याने व समन्वयाने आपत्ती व्यवस्थापन जनजागृती मोठया प्रमाणात करण्यात यावी, असे जिल्हाधिकारी म्हणाले. निसर्ग निर्मित व मानवनिर्मित आपत्तीचा सामना करण्यासाठी नेहमी तत्पर असणे गरजेचे आहे. या सप्ताहादरम्यान नागरिकांसाठी प्रत्येक तहसिलस्तरावर प्रशिक्षण आयोजित करण्यात येणार आहे. या प्रशिक्षणाचा लाभ घेण्याचे आवाहन त्यांनी केले. आपत्ती व्यवस्थापन सप्ताहादरम्यान चित्ररथ, कलापथक, जिंगल्स व पोस्टरद्वारे जनजागृती करण्यात येणार आहे. त्याच प्रमाणे चित्रकला, वकृत्व व निबंध स्पधेर्चे आयोजन करण्यात येणार आहे. जिल्हाभरात आपत्ती व्यवस्थापन कार्यशाळाही आयोजित करण्यात येणार असल्याचे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी अभिषेक नामदास यांनी सांगितले. हा सप्ताह यशस्वी करण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या वतीने काढण्यात येणाºया लोकराज्य मासिकाचा आॅक्टोंबर २०१८ चा अंक महाराष्ट्राच्या परिवर्तन कथा या वर आधारित आहे. या अंकाचे प्रकाशन जिल्हाधिकारी शांतनू गोयल यांचे हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमानंतर जिल्हाधिकारी यांनी जनजागृती चित्ररथास हिरवी झेंडी दाखविली. या कार्यक्रमास अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.