शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
2
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
3
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
4
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
5
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
6
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
7
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
8
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
9
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
10
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
11
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
12
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
13
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
14
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
15
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
16
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
17
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
18
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
19
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
20
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!

दृकश्राव्य जाहिरातींचे पूर्वप्रमाणिकरण करून घ्या

By admin | Updated: June 26, 2015 00:52 IST

राजकीय पक्ष किंवा उमेदवारांना दुरचित्रवाणी वाहिनी, स्थानिक केबल नेटवर्क, आकाशवाणी, एफएम, चित्रपटगृहे, सोशल मिडिया तसेच ...

उमेदवारांसाठी : जिल्हाधिकाऱ्यांनी दिले निर्देशभंडारा : राजकीय पक्ष किंवा उमेदवारांना दुरचित्रवाणी वाहिनी, स्थानिक केबल नेटवर्क, आकाशवाणी, एफएम, चित्रपटगृहे, सोशल मिडिया तसेच सार्वजनिक ठिकाणी निवडणूक प्रचारार्थ दृकश्राव्य जाहिरात प्रसारित करण्यासाठी पूर्व-प्रमाणिकरण करुन घेणे आवश्यक आहे. त्यासाठी संबंधित जिल्हा परिषद व पंचायत समिती क्षेत्राच्या निवडणूक निर्णय अधिकारी यांचेकडे अर्ज सादर करुन पुर्व-प्रमाणिकरण करुन घ्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी धीरजकुमार यांनी केले आहे. भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मान्यताप्राप्त राष्ट्रीय तथा राज्यस्तरीय राजकीय पक्ष, उमेदवार यांनी दृकश्राव्य जाहिरात प्रत्यक्ष प्रसारणाच्या तीन दिवस आधी पूर्व-प्रमाणिकरण करुन घेण्यासाठी अर्ज सादर करणे आवश्यक आहे. तर मान्यताप्राप्त नसलेल्या राजकीय पक्ष, उमेदवार तसेच अपक्ष उमेदवारांनी जाहिरात प्रसारणाच्या सात दिवस आधी अर्ज करणे आवश्यक आहे. भंडारा जिल्ह्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती क्षेत्रातील राजकीय पक्ष, उमेदवारांनी त्या-त्या क्षेत्राच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे जाहिरातीच्या पुर्व-प्रमाणिकरणासाठी अर्ज सादर करावा. अर्जाचा नमुना संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे उपलब्ध आहे. या नियमांचे पालन करणे गरजेचे असल्याचेही निवडणूक विभागाने स्पष्ट केले आहे. (प्रतिनिधी)