शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

भ्रूणहत्येची माहिती द्या अन् बक्षीस मिळवा

By admin | Updated: March 19, 2017 00:20 IST

मुलींचे घटते प्रमाण रोखण्यासाठी राज्य शासनाने विविध उपाययोजना आखल्या असून स्त्रीभ्रुण हत्या करणाऱ्या डॉक्टरांचे व सोनोग्राफी केंद्राचे नाव कळविणाऱ्या ...

जिल्हा प्रशासनाचे आवाहन : नावाबाबत गोपनीयता राहीलभंडारा : मुलींचे घटते प्रमाण रोखण्यासाठी राज्य शासनाने विविध उपाययोजना आखल्या असून स्त्रीभ्रुण हत्या करणाऱ्या डॉक्टरांचे व सोनोग्राफी केंद्राचे नाव कळविणाऱ्या जागरूक नागरिकास २५ हजार रुपये रोख रक्कम बक्षिस देण्याची योजना राज्य शासनाने सुरू केली आहे. विशेष म्हणजे यासंबंधी माहिती देणाऱ्याचे नाव गुप्त ठेवण्यात येणार आहे.महाराष्ट्र राज्यामध्ये २०११ च्या जनगणनेनुसार लिंग गुणोत्तर प्रमाण ८९४ एवढे आहे. सन २००१ च्या जनगणनेच्या तुलनेत हे प्रमाण आता १३ अंशाने कमी झाले आहे. भंडारा जिल्ह्याचे सध्याचे लिंग गुणोत्तर प्रमाण ९५९ आहे. महाराष्ट्रातील ० ते ६ वर्ष या वयोगटातील नागरी नोंदणी जन्माच्या वेळीचे लिंग गुणोत्तर प्रमाण २०१५ मध्ये ९०७ होते. २०१६ मध्ये ते ८९९ एवढे झाले. म्हणजे ८ अंकाने घटले असून ही बाब चिंताजनक आहे. सांगली जिल्ह्यातील म्हैसाळ येथे घडलेल्या घटनेवरुन लिंग निदान होत असल्याचे निदर्शनास येते. यापूर्वी अशा घटना घडलेल्या आहेत. पीसीपीएनडीटी कायदा अस्तित्वात असतानाही गर्भलिंग निदान होत असून या घटनेची दखल घेत शासनाने १५ मार्च ते १५ एप्रिलदरम्यान सर्व रूग्णालयाची तपासणी मोहिम हाती घेतली आहे. ज्या सोनाग्राफी केंद्रावर गर्भलिंग निदान होत आहे, अशी माहिती नागरिकांना मिळाल्यास ही माहिती जिल्हा रूग्णालय, जिल्हाधिकारी यांना कळवावी. १०४ आणि या टोल फ्री क्रमांकावरही माहिती देऊ शकता. त्याप्रमाणे आपली मुलगी संकेतस्थळावर ही माहिती दिल्यास त्याची तात्काळ दखल घेण्यात येईल. गर्भलिंग निदान करणाऱ्या किंवा सोनोग्राफी केंद्राबाबत माहिती देणाऱ्या व्यक्तीस २५ हजार रूपयांचे रोख बक्षिस देण्यात येणार आहे. परंतु नागरिकांनी खात्रीशिर माहिती पुरवावी. विनाकारण सोनोग्राफी केंद्राची बदनामी होईल किंवा निष्पाप डॉक्टरला मनस्ताप होईल, अशी माहिती देऊ नये, असेही जिल्हा प्रशासनाने प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे. (नगर प्रतिनिधी)