तुमसर येथे कृषी उत्पन्न बाजार समिती येथील शिवभोजन केंद्राच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. या वेळी प्रमुख अतिथी म्हणून नगराध्यक्ष प्रदीप पडोळे, माजी खासदार मधुकर कुकडे, माजी आमदार चरण वाघमारे, उपविभागीय अधिकारी नितीन सदगिर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती भाऊराव तुमसरे, जि.प.चे माजी सभापती नरेश डहारे, बाजार समिती संचालक अरविंद कारेमोरे, पोलीस उपनिरीक्षक हेमंत पवार, शिवसेना विभागप्रमुख तथा बेरोजगार समितीचे अध्यक्ष अमित मेश्राम, नगररचना विभागाचे अधिकारी सौरभ कदम, उपमुख्य अधिकारी अंजली बारसागडे, संचालक अरविंद कारेमोरे, अनिल जीभकाटे, राजेश पटले, शिवसेना वाहतूक सेनेचे दिनेश पांडे, उपजिल्हा संघटक जगदीश त्रिभुवनकर इत्यादी उपस्थित होते.
महाराष्ट्र शासनाने अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या माध्यमातून राज्यभरात शिवभोजन केंद्र सुरू करण्यात आले. पूर्व विदर्भातील मोठी धान्य बाजारपेठ असलेल्या जयप्रकाश मार्केट यार्ड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात शिवभोजन केंद्र संचालक वंदनीय बाळासाहेब ठाकरे सुशिक्षित बेरोजगार सेवा सहकारी संस्थेच्या वतीने चालविण्यात येत आहे.
या वेळी वाहतूक सेनेचे तालुकाप्रमुख कृपाशंकर डहरवाल, युवासेनेचे प्रवीण गुप्ता, शाखाप्रमुख निखिल कटारे, तालुका प्रेस क्लबचे अध्यक्ष लीलाधर वाडीभस्मे, मोहन भोयर, देवचंद टेंभरे, लेखाधिकारी पंकज मुदंडा, सहसचिव अनिल भोयर, विक्रम लांजेवार, जाकीर तुरक, दिगंबर समरीत, लायन्स क्लबचे अध्यक्ष मनोज उकरे, सदस्य कुंदा वैद्य, जयश्री पोटभरे, राजू भुरे, माजी पंचायत समिती सदस्य बंटी बानेवार, बाजार समितीचे निशांत बोरकर, मुकुल मेश्राम, अविनाश दुपारे, सतीश बन्सोड, सागर शनीचरे, गुणवंत भुरे, घनश्याम पोटभरे, पुंडलिक मेश्राम, प्रकाश पोटभरे, छायाचित्रकार भूषण येळणे यांच्यासह शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.