शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

गायत्री परिवाराने संस्कारक्षम पिढी निर्माण केली

By admin | Updated: June 7, 2017 00:32 IST

गायत्री मूर्तीची प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाला उपस्थिती हा एक ऐतिहासिक क्षण आहे.

परिणय फुके : सभामंडपासाठी सात लाखांच्या निधीची घोषणालोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : गायत्री मूर्तीची प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाला उपस्थिती हा एक ऐतिहासिक क्षण आहे. राष्ट्राच्या विकासाकरिता युवावर्ग, महिला वर्गाला संघटीत करून धार्मिक व आध्यात्यमिक ज्ञानाची जाणीव करून देण्यासाठी गायत्री परिवाराचे मोठे योगदान आहे. राष्ट्रनिर्माण, धर्मसंस्कृती याची जाणिव परिवाराचा उद्देश असल्याचे प्रतिपादन आमदार परिणय फुके यांनी केले.माँ गायत्री मूर्ती व प्राणप्रतिष्ठा व पंचकुंडीय गायत्री महायज्ञ कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष चेतन भैरम, नागपूरच्या नगरसेविका डॉ.परिणीता फुके, जिल्हा परिषद सदस्य आकाश कोरे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य राजेश बांते, गौरीशंकर देशकर, गणेशपूर ग्राम पंचायत सदस्य शेखर खराबे, आरती भैरम उपस्थित होते.देवस्थापना, गायत्री महायज्ञ व गायत्री मूर्तीची प्राणप्रतिष्ठा आ.परिणय फुके यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी फुके यांनी, गायत्री मंदिराच्या सभामंडपासाठी सात लाखांचा निधी स्थानिक निधीतून देण्याचे आश्वासन दिले. आजच्या आधुनिक युगात राष्ट्रधर्म संस्कृतीचे चांगले विचार लोप पावत आहे. नव्या पिढीत चांगले संस्कार घडविण्यासाठी स्वच्छ चरित्र, स्वच्छ मन गायत्री परिवारामुळेच चांगला समाज निर्माण करता येईल. देवसंस्कृतीची जाणीव यासाठी पंचकुंडीय गायत्री महायज्ञाचे आयोजन करण्यात आले. गायत्री मातेची प्राणप्रतिष्ठामुळे परिसरात चांगला समाज निर्माण होईल, असे प्रतिपादन केले. पत्रकार संघाचे अध्यक्ष चेतन भैरम यांनी, गायत्री परिवारामुळे राष्ट्र विकास व अंधश्रद्धा निर्मूलन, व्यसनमुक्ती, आध्यात्मिक, जीवन एक प्रेरणादायी आहे. गायत्री मातेचे प्राणप्रतिष्ठा हा ऐतिहासिक क्षण आहे. येथे आदर्श व्यक्तीमत्व व आदर्श जीवन व लोकहितार्थ कार्य करण्याची प्रेरणा भक्तजनांना मिळणार आहे. गर्भसंस्कार शिबिर, कार्यशाळा हे बळ देण्याचे काम आपले भाऊ - बहिण व वडीलधारी बांधव करीत आहेत असे प्रतिपादन केले. संचालन अरुण मरघडे यांनी केले. आभारप्रदर्शन सुधाकर शेंदरे यांनी केले. माँ गायत्री मूर्ती प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाला सहकार्य केले.