शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

रंगाची उधळण न करणारे गवराळा गाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2018 22:19 IST

होळीच्या दुसरा दिवशी सर्वच जण उत्साहात रंगांची उधळण करतात. परंतु, लाखांदूर तालुक्यातील गवराळा या गावातील नागरिक मागील २५ वर्षांपासून रंगाचा सण भक्तीरंगात रंगून साजरा करतात.

ठळक मुद्दे२५ वर्षांपासूनची परंपरा कायम : लाकडांऐवजी केरकचºयाची करतात होळी

आॅनलाईन लोकमतलाखांदूर / विरली : होळीच्या दुसरा दिवशी सर्वच जण उत्साहात रंगांची उधळण करतात. परंतु, लाखांदूर तालुक्यातील गवराळा या गावातील नागरिक मागील २५ वर्षांपासून रंगाचा सण भक्तीरंगात रंगून साजरा करतात. होळीच्या दोन दिवसांत या गावात ग्रामसफाई करण्यात येते. यामुळे हे गाव संपूर्ण राज्यात आपले वेगळेपण टिकवून आहे.हिंदू धर्मात होळीच्या सणाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. होळीच्या दिवशी पुरणपोळी, साखरेची गाठी आणि धुळवडीच्या दिवशी रंगांची उधळण सर्वजण करतात. परंतु, गवराळा हे गाव या यासाठी अपवाद ठरले आहे. येथे कर्मयोगी अनासक्त ब्रह्मलीन किसनबाबा अवसरे यांचा २५ वा पुण्यतिथी महोत्सव २५ फेब्रुवारी ते २ मार्चपर्यंत आयोजित केला आहे.सन १९९२ मध्ये होळीच्या दिवशी गावातील धार्मिकस्थळाच्या बांधकामासाठी जागा दान मागून सायंकाळी मंदिरात त्यांचा मृत्यू झाला होता. मात्र, ज्या दिवसापासून अवसरे बाबा गावात आले तेव्हापासून गावात शांतता आल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. तेव्हापासून गावकºयांनी एकत्र येऊन होळी व धुळवडीचा सण परंपरेप्रमाणे साजरा न करता बाबांचा पुण्यतिथी महोत्सव म्हणून साजरा करण्याचे ठरविले. त्यानंतरच्या पिढ्यांनी हीच प्रथा सुरू ठेवली. गावात होळी पेटविली जाते. परंतु, ती लाकडांची नव्हे तर ग्रामसफाई करून जमा झालेल्या केरकचºयाची होळी असते. धुळवडीच्या दिवशी ग्रामगीता तत्त्वज्ञान, ग्रामसभा, ग्रामस्वराज्य या विषयांवर अनुभवी लोकांचे गावाचा विकास साधण्यासाठी मार्गदर्शन मिळते. हा कार्यक्रम ग्रामगीताचार्य तुकारामदादा यांचे उत्तराधिकारी लक्ष्मणदादा नारखेडे यांच्या उपस्थितीत व संतांच्या सहवासात दरवर्षी हा कार्यक्रम होत असतो. या कार्यक्रमात श्री गुरुदेव सेवा मंडळ तत्त्वज्ञान व ग्रामकुटुंब योजना राबवून ग्रामस्वराज्य संकल्पना ठरवली जाते. तीन दिवसीय कार्यक्रमात ग्रामगीता प्रवचन, कीर्तन, भजन, पालखी, प्रदक्षिणा, अवसरे महाराजांना मौन श्रद्धांजली यासह रक्तदान, नेत्रतपासणी व आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात येते.आदर्श परंपराराज्यात होळी व धुळवड मोठ्या उत्साहात साजरा करून लाकूड जाळले जाते. त्यामुळे प्रदूषण होते. रंगातही लाखो रूपये खर्च होतात. निष्पाप प्राण्यांचे बळी घेतले जातात. यामुळे पर्यावरणाची हानी होते. हा प्रकार गवराळा या गावात होत नाही. त्यामुळे हे गाव सर्वांसाठी आदर्श ठरू पाहत आहे. गावात सारे हसतखेळत राहतात.