शहरं
Join us  
Trending Stories
1
India-Pakistan War: उद्या देशात युद्धसज्जतेचा ‘मॉक ड्रिल’; सायरन, नागरिकांच्या बचावाचा सराव 
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: नोकरीत बढती मिळेल; अचानक आर्थिक फायदा होईल
3
राहुल गांधी अचानक ‘पीएमओ’त; पंतप्रधान माेदींसाेबत झाली बैठक
4
बारावीचा निकाल घसरला, यंदाही मुलींचाच डंका; कोकणची बाजी, लातूर पॅटर्न माघारला
5
चोंडीमध्ये आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक; विकास आराखड्यावर होईल शिक्कामोर्तब
6
पुतीन यांचा पंतप्रधान मोदी यांना फोन;  पहलगाम कट रचणाऱ्यांना सोडू नका
7
‘ती’ लईच हुशार ! यंदाही एक पाऊल पुढेच; ३८ महाविद्यालयांना मिळाला भाेपळा
8
प्राची ! पेट्रोलपंपावर काम करून कष्टाने गाठली यशाची उंची
9
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी, डीजीपींनी एसआयटी नेमावी : कोर्ट
10
मुंबईकरांना दिलासा, पाणीपुरवठ्यात कपात नाही
11
२० वर्षांपूर्वी बांगलादेशमधून तो आला; नवी मुंबईतील महिलेशी संसार थाटला 
12
नवजात अर्भकांचे लसीकरण प्रसूती विभागातच करा; राज्य सरकारच्या सूचना, लागू होणार नवे नियम
13
"महायुती म्हणजे 'तीन तिघाडा, काम बिघाडा"; काँग्रेस फोडण्याच्या मुद्द्यावरून प्रणिती शिंदेंची टीका
14
ड्रग्स टेस्टमध्ये दोषी आढळलेला कगिसो रबाडा पुन्हा IPL खेळणार, 'या' संघाविरूद्ध होणार 'कमबॅक'
15
हवाई हल्ल्याची तयारी... पाकिस्तानसोबत तणावाच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाचे सर्व राज्यांना निर्देश
16
भारताच्या संरक्षण वेबसाईट्सवर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती लीक झाल्याचा संशय
17
काही लोक काँग्रेस सोडत आहेत, आमची वेळ आल्यावर आम्हीही बदला घेऊ- विजय वडेट्टीवार
18
वाहतुकीचे नियम तोडले तर मिळतील निगेटिव्ह पॉईंट्स, ड्रायव्हिंग लायसन होणार सस्पेंड, अशी आहे नवी पॉईंट सिस्टिम
19
ही आहे भारताची ताकद; जर्मनी-फ्रान्सचा पाकिस्तानबाबत मोठा निर्णय, जाणून घ्या...
20
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी

गावरान आमराईचा गोडवा ओसंडला...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:57 IST

बाराभाटी : गावालगत ग्रामीण भागात गावरान आंब्याच्या आमराई आहेत, पण त्या अमराईत उन्हाळ्यात अनेक दिवस मुले खेळत असत, ...

बाराभाटी : गावालगत ग्रामीण भागात गावरान आंब्याच्या आमराई आहेत, पण त्या अमराईत उन्हाळ्यात अनेक दिवस मुले खेळत असत, बागडत असत, दिवसभर वेळ घालवून मनसोक्त असायचे, मन मोहरून जाई, पण आता हा आमराईचा गोडवा राहिलाच नाही, असे चित्र ग्रामीण भागातील आमराई बागेचे दिसत आहे. त्या गोडव्याच्या फक्त आठवणीच राहिल्या, सारी अमराई ओसंडून गेली आहे.

परिसरात अनेक गावाला लागून आमराई आहेत, या आमराई अख्खा उन्हाळा घालवत असत, आमराईमध्ये स्वदेशी खेळ आट्यापाट्या, लंगडी, फुगडी, डब्बा ड, मामाचे पत्र हरवले ते मला सापडले, नाक चिकली, बेंडवा, चंगाअष्टा, गाण्याच्या भेंड्या, नवरीनवरदेव असे खेळ खेळण्याच्या निमित्ताने घरून मुले-मुली पाण्याच्या बाॅटल घेऊन आमराईत दाखल होत.

लागलीच आमराईतही एका सरळ रेषेत आंब्याची झाडे लावली जात असत. या आमराई ह्या गावातील गर्भश्रीमंत व सावकारांच्या मालकीच्या आहेत आणि आमराईची रचना ही मनाला स्पर्शून जाणारी असायची, काय तो दुपारचा देखावा, किरकिरीचे सुमधुर संगीत, कडक उन्हाच्या मध्यस्थी आंब्यांची गर्द भरलेली घनदाट सावली असायची, असे वाटायचे ‘हे विश्वची माझे घर’... लागूनच तळे, बोळीची पार, त्या पारीवर मोहरलेले चिंचेचे झाड आहे, नकळत पोरांचा मोर्चा हा चिंचेच्या झाडाकडे वळून चिंचेचे आस्वाद घेत असत, चिंचांपासून अनेक रुचकर पदार्थ तयार करून खायची. एक वेगळीच गंमत असायची, ही मजा औरच आहे.

आमराईत आजही भर दुपारी मन एकदम प्रसन्न होते. आंबा हा फळांचा राजा आहे, अनेक मानवी, पशुपक्षी प्राणिमात्रांच्या मनावर आजही राज्य करत आहे. आंबा म्हटले की, तोंडाला पाणी येतेच हे नाकारता येत नाही. कलमी, नीलम, डागील, सेंदरी, तांबूस, कोयार, बुडगा, चिप अशा प्रकारचे आंबे आजही गावरान आमराईत आहेत.

गावरान आंब्याची नवलाई .....

आंब्यापासून अनेक पदार्थ तयार करतात, लोणचे, कैरी, पन्हे, खुला, आंबट भुरका, आमरस असे करीत असतात, तसेच आंब्याच्या गुहीचा पण उपयोग होतो, गुहीपासून नवीन रोपटे होतात, तर गुह्या वाळवून ठेवले की, त्यांना विकता येते, असा छोटासा व्यवसाय पण करता येतो. आज जर पाहिले, तर आंबा हा महागला आहे, दिवसेंदिवस गावरान आंब्याचे उत्पादन कमी होत आहे, कारण वादळवारा येतो. माकडे नासधूस करतात, अशामुळे आंब्याचा बहर हा फार काळ टिकत नाही आणि याचा उत्पादनावर परिणाम पडत असतो. अशा अनेक आठवणींच्या मोहात गावरान आमराई ओसांडली आहे, त्या आमराईच्या आठवणी आजही मनाला ताजेतवाने करतात, आठवणीने मन रमून जाते, पण असेच जगावे लागते आठवणींच्या साहाय्याने, याची साक्ष आजही गावरान आमराई देत आहेत.