शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
6
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
7
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
8
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
9
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
10
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
11
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
12
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
13
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
14
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
15
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
16
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
17
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
18
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
19
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
20
Latest Marathi News LIVE: डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
Daily Top 2Weekly Top 5

पेट्रोल, डिझेलच्या दरवाढीचा सामान्यांना फटका

By admin | Updated: May 25, 2015 00:36 IST

युपीए सरकारच्या काळात पेट्रोल-डिझेलचे दर वाढण्यामुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाले होते.

आश्वासन निघाले फोल : वर्षभर कमी झाल्यानंतर पुन्हा वाढताहेत दरभंडारा : युपीए सरकारच्या काळात पेट्रोल-डिझेलचे दर वाढण्यामुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाले होते. परंतु केंद्रात मोदी सरकार सत्तेवर आल्यानंतर पेट्रोल-डिझेलचे दर कमी होण्यास सुरुवात झाली. परंतु, सन २०१५ चा शुभारंभ होताच पेट्रोल-डिझेल पुन्हा जुन्याच दरावर येताना दिसत आहेत. १ एप्रिल २०१४ च्या तुलनेत दर आताही कमीच आहेत. मात्र, महागाईची स्थिती अशीच कायम राहिल्यास पेट्रोल-डिझेलचे दर मागील दरापेक्षा अधिक होण्यास वेळ लागणार नाही. पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीमुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाले आहेत. मागील काही महिन्यांपासून पेट्रोल-डिझेलचे दर सातत्याने कमी होत असल्यामुळे त्यांना त्याची सवय पडली होती. आता आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ झाल्यामुळे आणि रुपयाच्या तुलनेत डॉलर मजबूत झाल्यामुळे पेट्रोल-डिझेलचे दर पुन्हा वाढत आहेत. अशा परिस्थितीत भारतीय तेल कंपन्यांसमोर दर वाढविण्याशिवाय पर्याय उरला नसल्याचे बोलले जात आहे. मागील वर्षी सत्तारूढ झालेल्या शासनाने पेट्रोल-डिझेलचे भाव कमी करण्याचे स्वप्न दाखविले. सलग पाचवेळा भाव कमी केल्याचा गाजावाजा केला. परंतु दरवाढीचा निर्णय केंद्र घेत नाही, हीच शोकांतिका ठरली. (प्रतिनिधी)आकड्यांची कमालमे २०१४ मध्ये आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूड आॅईलचे दर १३२ डॉलर प्रति बॅरल होते. त्यावेळी भंडाऱ्यात पेट्रोलचे दर ८३.४१ रुपये प्रति लिटर आणि डिझेलचे दर ६७.0६ रुपये प्रति लिटर होते. मे २०१५ मध्ये आंतर राष्ट्रीय बाजारात क्रूड आॅईलचे दर ८० डॉलर प्रति बॅरल आहेत. परंतु जनतेला जेवढा दिलासा मिळायला हवा होता तेवढा मिळाला नाही. आताही भंडाऱ्यात पेट्रोलचे दर ७६.८१ रुपये प्रति लिटर आणि डिझेलचे दर ६३.०४ रुपये प्रति लिटर आहेत.