शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

तुटपुंज्या निधीने रखडला गाेसेखुर्द प्रकल्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2022 05:00 IST

पवनी तालुक्यातील गाेसे खुर्द येथे वैनगंगा नदीवर पूर्व विदर्भातील महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. या प्रकल्पाला ३१ मार्च १९८३ राेजी प्रशासकीय मान्यता मिळाली. त्यावेळी या प्रकल्पाची मूळ किंमत ३७२.२२ काेटी रुपये हाेती. गत ३४ वर्षांत सातत्याने महागाई वाढली आणि प्रकल्पाची किंमतही वाढत गेली. केंद्रीय जलआयाेगाने २०१७ मध्ये १८ हजार ४९४.५७ काेटी रुपयांची सुधारित मान्यता दिली. २०२१-२२ मध्ये या प्रकल्पाची किंमत २१ हजार काेटींपर्यंत गेलेली असणार आहे.

अशाेक पारधीलाेकमत न्यूज नेटवर्कपवनी : रखडलेला गाेसे खुर्द राष्ट्रीय प्रकल्प २०२३ पर्यंत पूर्णत्वास जाण्यासाठी दरवर्षी दीड हजार काेटींची आवश्यकता असताना राज्य अर्थसंकल्पात केवळ ८५३ काेटी ४५ लाख रुपयांचा निधी देण्यात आला. या तुटपुंज्या निधीत हा प्रकल्प कसा पूर्ण हाेणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.पवनी तालुक्यातील गाेसे खुर्द येथे वैनगंगा नदीवर पूर्व विदर्भातील महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. या प्रकल्पाला ३१ मार्च १९८३ राेजी प्रशासकीय मान्यता मिळाली. त्यावेळी या प्रकल्पाची मूळ किंमत ३७२.२२ काेटी रुपये हाेती. गत ३४ वर्षांत सातत्याने महागाई वाढली आणि प्रकल्पाची किंमतही वाढत गेली. केंद्रीय जलआयाेगाने २०१७ मध्ये १८ हजार ४९४.५७ काेटी रुपयांची सुधारित मान्यता दिली. २०२१-२२ मध्ये या प्रकल्पाची किंमत २१ हजार काेटींपर्यंत गेलेली असणार आहे. हे प्रकल्प पूर्ण करण्यास विलंब लागला. त्यामुळे महागाईच्या निर्देशांकानुसार किंमत वाढत गेली. मात्र, शासनाने पुरेसा निधी उपलब्ध करून दिला नाही. त्यामुळे अद्यापही पूर्ण क्षमतेने सिंचनाची सुविधा उपलब्ध झाली नाही.केंद्र सरकारच्या ६० टक्के व राज्य सरकारच्या ४० टक्के निधीची तरतूद आहे. मात्र, पुरेसा निधी अद्यापही मिळाला नाही. उपसा सिंचन प्रकल्पाचे कामही अपूर्ण आहेत. हा प्रकल्प पूर्ण कसा हाेणार, असा प्रश्न आहे.

कालव्यांसह उपसा सिंचनचे काम अर्धवट- तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हस्ते या प्रकल्पाचे भूमिपूजन २२ एप्रिल १९८८ राेजी करण्यात आले. या धरणाचे काम २००८ ला पूर्ण झाले. पंरतु, उजवा व डावा कालवा, उपकालवे अद्यापही पूर्ण हाेऊ शकले नाही. नेरला, माेखाबर्डी, आंभाेरा, टेकेपार उपसा सिंचन याेजना पूर्णत्वासाठी आवश्यक निधी देण्यात आला नाही. त्यामुळे अपेक्षित सिंचन झाले नाही.

गाेसेखुर्द राष्ट्रीय प्रकल्पाचे काम दाेन वर्षात पुर्ण करण्याचे नियाेजन करण्यात आले आहे. ४ हजार काेटींची गरज आहे. केंद्र सरकार ६० टक्के व राज्य शासन ४० टक्के याप्रमाणे निधी उपलब्ध करुन देत आहे. तरतुदीनुसार वेळेत निधी मिळाला तर डिसेंबर २०२३ पर्यंत प्रकल्पाचे काम पूर्ण करुन सिंचन सुविधा देता येईल.- रा. गाे. शर्मा, कार्यकारी अभियंता गाेसे प्रकल्प

गाेसेखुर्द प्रकल्प उजव्या कालव्याचे काम मध्यल्या टप्प्यात अपूर्ण आहे. घाेडेझरी कालव्यासाठी पाण्यासारखा पैसा खर्च झाला. परंतु कालवा अपूर्ण आहे. अधिकारी व कंत्राटदारात समन्वय नाही. त्यामुळे काम संथगतीने सुरु आहे. हे गाेडबंगाल शाेधून काढण्यासाठी १९ मार्च राेजी जनमंचने सिंचन शाेध यात्रा आयाेजित आहे.- ॲड. गाेविंद भेंडारकर, संयाेजक, गाेसखुर्द संघर्ष समन्वय समिती 

 

टॅग्स :Gosekhurd Projectगोसेखुर्द प्रकल्प