शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

गॅस सिलिंडर पुन्हा 25 रुपयांनी महागले, आता मोजा 921 रुपये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2021 05:00 IST

विशेषत: सबसिडीमध्ये मात्र काहीच वाढ झाल्याचे दिसून येत नाही. याचा सरळ सरळ फटका गरीब व मध्यमवर्गीय कुटुंबीयांना बसणार आहे. एकीकडे सिलिंडरचे भाव वाढत असताना दुसरीकडे सातत्याने सबसिडी घटत आहे. जनसामान्यांचे महागाईमुळे कंबरडे मोडले असून, त्यात सिलिंडरच्या भाववाढीने अनेकांचे आर्थिक चक्र बिघडले आहे. गत वर्षभरात गॅस सिलिंडरचे भाव ४३६ रुपयांनी वाढले. तर सबसिडी मात्र कमी झाली आहे. याचा फटका सर्वसामान्यांना बसत आहे.

इंद्रपाल कटकवारलोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जीवनावश्यक वस्तूंमध्ये समावेश असलेल्या घरगुती गॅस सिलिंडरचे भाव वाढतच आहेत. मागील महिन्यात पन्नास रुपयांनी दरवाढ झाल्यानंतर आता पुन्हा त्यात २५ रुपयांनी वाढ झाली आहे. आता घरगुती प्रति सिलिंडरमागे ९२१ रुपये ग्राहकांना मोजावे लागणार आहेत. विशेषत: सबसिडीमध्ये मात्र काहीच वाढ झाल्याचे दिसून येत नाही. याचा सरळ सरळ फटका गरीब व मध्यमवर्गीय कुटुंबीयांना बसणार आहे. एकीकडे सिलिंडरचे भाव वाढत असताना दुसरीकडे सातत्याने सबसिडी घटत आहे. जनसामान्यांचे महागाईमुळे कंबरडे मोडले असून, त्यात सिलिंडरच्या भाववाढीने अनेकांचे आर्थिक चक्र बिघडले आहे. गत वर्षभरात गॅस सिलिंडरचे भाव ४३६ रुपयांनी वाढले. तर सबसिडी मात्र कमी झाली आहे. याचा फटका सर्वसामान्यांना बसत आहे.

सबसिडी बंद, दरवाढ सुरूच 

- जुलै २०२० मध्ये सिलिंडर ४६० रुपयांना मिळत होता. त्यानंतर सातत्याने गॅसच्या किमतीत वाढच होत गेली. जुलै २०२१ मध्ये गॅस सिलिंडर ८९४ रुपयांत उपलब्ध झाला होता. या महिन्यात २५ रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे आता ग्राहकांना ९२१ रुपये मोजावे लागणार आहेत. याचा फटका सर्वांना बसत आहे.

छोट्या सिलिंडरचे दर जैसे थे - जिल्ह्यात घरगुती व व्यावसायिक सिलिंडरच्या प्रमाणात छोट्या सिलिंडरलाही मागणी आहे. सद्य:स्थितीत पाच किलोचा छोटा सिलिंडर ३३९ रुपयांना मिळत आहे. घरगुती गॅसच्या किमतीत २५ रुपयांनी वाढ करण्यात आली. मात्र छोट्या सिलिंडरच्या दरात सध्यातरी कुठलीही वाढ झाल्याचे दिसून येत नाही. हा थोडासा दिलासा लहान सिलिंडर वापरकर्त्यांना मिळाला आहे.

 

टॅग्स :Cylinderगॅस सिलेंडर