शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
3
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ११५ जण होरपळले, बचाव कार्य सुरू
4
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
5
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
6
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
7
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
8
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
9
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
10
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
11
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
12
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
13
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
14
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
15
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
16
पाकिस्तानसाठी हेरगिरी, पुरवली गोपनीय माहिती; निशांत अगरवालच्या शिक्षेवरील निर्णय न्यायालयाने ठेवला राखून
17
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
18
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
19
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
20
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  

गोरगरिबांचे जनधन खाते झाले ठणठण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2019 01:09 IST

भाजप सरकार हे खोटारडे आहे. गेल्या पाच वर्षात पूर्वापार चालत आलेल्या अनेक विकासाभिमुख योजना बंद पाडल्या. आश्वासने द्यायची मात्र त्याचे पालन करायचे नाही हा यांचा उद्योग आहे. गोरगरीब जनतेला स्वखर्चाने जनधन खाते उघडविण्यात आले.

ठळक मुद्देप्रफुल्ल पटेल : अर्जुनी मोरगाव तालुक्यात प्रचारसभा

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : भाजप सरकार हे खोटारडे आहे. गेल्या पाच वर्षात पूर्वापार चालत आलेल्या अनेक विकासाभिमुख योजना बंद पाडल्या. आश्वासने द्यायची मात्र त्याचे पालन करायचे नाही हा यांचा उद्योग आहे. गोरगरीब जनतेला स्वखर्चाने जनधन खाते उघडविण्यात आले. मात्र हे खाते ठणठण असून बंद पडले आहेत, असे वक्तव्य खा. प्रफुल्ल पटेल यांनी केले.भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघाचे काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस, पिरीपाचे उमेदवार नाना पंचबुद्धे यांचे प्रचारार्थ येरंडी महागाव येथे आयोजित प्रचार सभेत बोलत होते. या वेळी नाना पंचबुद्धे, लोकपाल गहाणे, गिरीष पालीवाल, यशवंत परशुरामकर, अ‍ॅड. के.आर. शेंडे, राजेश नंदागवळी, मनोहर चंद्रिकापुरे, सुनील फुंडे, प्रमोद लांजेवार, चंद्रशेखर ठवरे, नागपूरचे आ. प्रकाश गजभिये, बंडू भेंडारकर, नारायण डोंगरवार, चित्रलेखा मिश्रा, शामकांत नेवारे, आनंदकुमार जांभुळकर, जि.प.सदस्य किशोर तरोणे, भाष्कर आत्राम, राकेश लंजे, विशाखा साखरे, जगदीश मोहबंशी, नितीन पुगलिया, माणिक घनाडे, पुरुषोत्तम बाबा कटरे, बबन कांबळे, किरण कांबळे, शिशुकला हलमारे, रतिराम राणे, सुधीर साधवानी उपस्थित होते. ते पुढे म्हणाले, स्व. मनोहरभाई पटेल यांनी भंडारा-गोंदिया जिल्ह्यात शिक्षणाची गंगोत्री आणली. इटियाडोह धरण निर्मितीत त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. या माध्यमातून येथील शेती सुजलाम सुफलाम झाली.काँग्रेस-राष्टÑवादी काँग्रेसचे सरकार असताना धानाला २९०० रुपये प्रती क्विंटल हमी भाव होता. गेल्या ५ वर्षात किती भाव मिळाला हे तुम्हालाच ठाऊक आहे. निवडणुकीच्या तोंडावर ५०० रुपये बोनस जाहीर केला याचा लाभ शेतकऱ्यांना की व्यापाऱ्यांना मिळाला याचा विचार करा. शेतकऱ्यांना ६ हजार रुपये वार्षिक मदत देण्याचे मोदींनी जाहीर केले.काहींच्या खात्यात पैसे आले व ते परत गेले. आमचे सरकार सत्तेवर आल्यास अडीच हजार रुपये प्रती क्विंटल धानाला भाव देवू व राहुल गांधी यांनी बोलल्याप्रमाणे २० टक्के गरीब कुटुंबांना किमान ६ हजार रुपये प्रतिमाह देण्याच्या आश्वासनाचे आम्ही समर्थन करीत असल्याचे सांगितले. पेट्रोल, डिझेल, गॅसवर अवाढव्य कर घेतले जात आहे. जीएसटी लागू केली. प्रत्येक व्यक्तींकडून शासनाची कर वसूली सुरु आहे. देताना मात्र काहीच दिले जात नाही.दोन वर्षापासून मग्रारोहयोचे चुकारे मिळाले नाही. निराधारांचे पैसे, ओबीसींची शिष्यवृत्ती मिळाली नाही. केरोसिन, रेशन बंद झाले.बीआरजीएफ, नक्षल, ३०५४, ५०५४, सर्व शिक्षा अभियान, एनआरएचएम सारख्या योजना बंद केल्या.शेतकºयांकडून बळजबरीने पिक विमा घेतला जात आहे. मात्र लाभ कुणालाच दिला जात नाही. हे सरकार सामान्य माणसाच्या विरोधी आहे.नोटाबंदी, जीएसटीमुळे लहान उद्योग बंद पडले. चौकीदारी कुठेतरी थांबली पाहिजे. ही देशाची निवडणूक आहे.आम्हाला काम करणारे चौकीदार पाहिजे खोटारडे नाही. भारतात लोकशाही आहे, ती संविधानामुळे टिकून आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला सर्वश्रेष्ठ संविधान दिले आहे. यावरच देशाचा डोलारा उभा आहे,असे प्रतिपादन त्यांनी केले.

टॅग्स :prafull patelप्रफुल्ल पटेलLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक