शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

भंडारा जिल्ह्यात मेघनाथ यात्रेसाठी दीडशे बैलजोड्यांनी खेचून आणला गरदेव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2019 11:50 IST

धुलीवंदनाच्या दिवशी दर तीन वर्षांनी भरणाऱ्या मेघनाथ यात्रेची तुसमर तालुक्याच्या आष्टी येथे जय्यत तयारी सुरू झाली आहे. पुजेसाठी लागणारा खास गरदेव (ध्वजखांब) साठी दीडशे बैलजोड्याच्या सहाय्याने गावकऱ्यांनी खेचून आणला.

ठळक मुद्देतुमसर तालुक्याची आष्टी येथे सव्वाशे वर्षांची परंपरा

राहूल भुतांगेलोकमत न्यूज नेटवर्कभंडारा: धुलीवंदनाच्या दिवशी दर तीन वर्षांनी भरणाऱ्या मेघनाथ यात्रेची तुसमर तालुक्याच्या आष्टी येथे जय्यत तयारी सुरू झाली आहे. पुजेसाठी लागणारा खास गरदेव (ध्वजखांब) साठी दीडशे बैलजोड्याच्या सहाय्याने गावकऱ्यांनी खेचून आणला. सव्वाशे वर्षांची ही अनोखी परंपरा पाहण्यासाठी विदर्भ व महाराष्ट्रातील भविकांनी एकच गर्दी केली होती.तुमसर तालुक्यातील आष्टी गावात १२५ वर्षापासून धुलीवंदनाच्या दिवशी गरदेव मेघनाथची यात्रा भरते. दर तीन वर्षांनी गरदेवासाठी लागणाºया लाकडाला गावातील बैल जोड्यांच्या सहाय्याने जंगलातून खेचून आणले जाते. आष्टी व परिसराला दुष्काळापासून बचाव करण्यासाठी मेघनाथाची पूजा केली जाते. त्यासाठी गरदेवरूपी ७० ते ८० फूट उंच जोडीने असलेल्या वृक्षांची निवड केली जाते. त्याला नर-मादी म्हणतात. या वृक्षांची सावली एकमेकांवर पडणारेच वृक्ष निवडले जातात. त्यासाठी जंगलात पुजाºयाच्या मदतीने वृक्षांचा शोध घेतला जातो. एकदा असा वृक्ष सापडला की त्याला गरदेव म्हटले जाते. हा गरदेव बैलजोड्यांच्या सहाय्याने खेचून आणत. गरदेव रुसला तर १५० बैलाची शक्तीही त्या लाकडाला हलवू शकत नाही, असे गावकरी सांगतात. त्यावेळी गरदेवाला प्रसन्न करण्यासाठी शंभर ते सव्वाशे नारळ फोडून पूजा केली जाते. त्यानंतर गरदेव पुढे सरकतो. जंगलातून यात्रा स्थळापर्यंत गरदेव आणण्यासाठी दोनही लागतात. मंगळवारी आष्टा येथील गावकरी गरदेवला आणण्यासाठी जंगलात पोहचले असून सजविलेल्या दीडशे बैलजोडीच्या मदतीने त्याल खेचून आणले. हा सोहळा पाहण्यासाठी विदर्भ व मध्यप्रदेशातील भाविकांची मोठी गर्दी झाली आहे.

टॅग्स :cultureसांस्कृतिक