शहरं
Join us  
Trending Stories
1
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
4
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
5
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
6
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
7
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
10
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
11
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
12
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
13
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
14
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
15
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
16
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
17
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
18
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
19
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
20
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

घरकूल लाभार्थ्यांना वारपिंडकेपारची रेती

By admin | Updated: February 2, 2015 23:00 IST

सिहोरा परिसरातील नद्यांच्या काठावर वास्तव्य करणाऱ्या गावकऱ्यांना वारपिंडकेपार गावातील घाटावरून रेतीची आयात करावी लागत आहे. यामुळे घरकुलांची बांधकाम

चुल्हाड/सिहोरा : सिहोरा परिसरातील नद्यांच्या काठावर वास्तव्य करणाऱ्या गावकऱ्यांना वारपिंडकेपार गावातील घाटावरून रेतीची आयात करावी लागत आहे. यामुळे घरकुलांची बांधकाम अडचणीत आले आहेत. यामुळे शासन विरोधात गावकरी असा वाद पेटणार आहे.सिहोरा परिसरात वैनगंगा आणि बावनथडी नद्यांचे खोरे आहेत. या नद्यांच्या काठावर अनेक गावांचे वास्तव्य आहेत. नद्यांच्या पात्रात दर्जेदार रेती असल्याने देशाची राजधानी दिल्लीत मागणी आहे. कॉमनवेल्सच्या बांधकामात हीच रेती उपयोगात आणण्यात आली आहे. परंतु या परिसरात वारपिंडकेपार गावातील रेतीघाट लिलावात काढण्यात आले आहे. अन्य गावात रेतीघाट लिलावात काढण्यात आले नाही. यात देवरी देव, सुकळी नकुल, बपेरा, देवसर्रा, महालगाव, सोंड्या गावाचा समावेश आहे. दरम्यान याच गावात रेतीचा भंडार आहे. गाव शेजारी असणाऱ्या पात्रातून रेतीचा उपसा केल्यास रेती स्वस्त दरात उपलब्ध होत आहे. परंतु या अनधिकृत रेती उपसा करताना बंदी लावण्यात आली आहे. या शिवाय ट्रॅक्टर वाहतुक करताना आढळून आल्यास दंड अथवा फौजदारी कारवाई करण्यात येत आहे. यामुळे ट्रॅक्टर मालक धस्तावली आहेत. दरम्यान या नद्यांच्या काठावरील गावात गरीबांना घरकुल मंजुर करण्यात आली आहे. दलित बांधवांना रमाई आवास योजनेच्या घरकुले देण्यात आली आहे. वाढत्या माहागाईत घरकुल बांधकामाचा अनुदान अल्प आहे. दारिद्र्य रेषेखालील आणि अन्त्योदय यादी उदरनिर्वाह करणारे कुटूंब या योजनेत पात्र करण्यात आले आहेत. घरकूल बांधकामाचा अनुदान सव्वा लक्ष रूपयाच्या घरात आहे. या दरवाढीत अनुदान राशीत एकाच खोलीचे बांधकाम करणे शक्य आहे. सध्यास्थित विटा, सिमेंट, लोखंड तथा कारागिराचे दर वाढले आहे. घरकुल बांधकाम निधीची जुळवा जुळव करीत असताना पुन्हा रेती महागली आहे. यामुळे गरीब घरकुल लाभार्थी चांगलेच चक्रावली आहेत.गावात नदीचे पात्र असताना वारपिंडकेपार गावातून रेतीची आयात करण्याची पाळी या घरकुल लाभार्थ्यावर आली आहे. गावातील पात्रातून अनधिकृत रेतीचा उपसा करताना कारवाईचा बडगा आहे. यामुळे गावकरी गांगरली आहेत. यामुळे गरिबांचे खच्चीकरण करण्यात येत आहे. घरात अन्न धान्य असताना उपाशी झोपण्याची वेळ या घरकुल लाभार्थ्यावर आली आहे. गावातील पात्रातून रेतीचा उपसा करण्याची सुट देण्याची ओरड घरकुल लाभार्थी करीत आहेत. या गावापासून रेतीघाट लांब पल्ल्याच्या ठिकाणी आहेत. या घाटावरून रेतीची आयात करताना गरीब घरकूल लाभार्थ्यांना परवडणारी नाही. अंदाजे दोन हजार रूपये ट्रॅक्टर प्रती ट्रिप मिळणार आहे. यामुळे लाभार्थ्यांचे लचके तोडले जाणार आहेत. दरम्यान अनधिकृत रेतीचा उपसा तथा चोरटी वाहतूक थांबविण्यासाठी पोलीस आणि महसूल विभागाचे कर्मचारी दिवसभराचे कामकाज सोडून रेती घाटावर फेरफटका मारत आहेत. रात्री जनतेला सुरक्षितता देण्यासाठी पोलिसांची असणारी गस्त, नागरिकांना वाऱ्यावर सोडून रेतीघाट पिंजून काढत आहेत. यामुळे गावा गावात भुरट्या चोऱ्या वाढल्या आहेत. गावात पोलिसांचा धाक नाही. रात्री होणारी रेतीची चोरी थांबविण्यासाठी हा प्रयोग केला जात आहे. यामुळे जनतेपेक्षा रेती महत्वाची असल्याचे परिसरात दिसूनयेत आहे. लाभार्थ्यांना अल्पदरात रेती उपलब्ध करण्यासाठी गरज आहे. (वार्ताहर)