शहरं
Join us  
Trending Stories
1
वीजग्राहकांसाठी आनंदाची बातमी! २६ टक्के वीजदर कमी होणार; CM फडणवीस म्हणाले, “इतिहासात प्रथमच…”
2
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
3
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
4
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
5
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
6
लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'
7
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
8
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
9
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
10
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
11
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
12
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
13
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
14
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
15
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
16
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
17
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
18
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
19
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
20
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...

करडीचे ग्रामविकास अधिकारी निलंबित

By admin | Updated: June 14, 2014 01:38 IST

ग्रामपंचायतीचा विविध निधींची स्वमर्जीने विल्हेवाट व अफरातफर प्रकरणी करडी ...

करडी (पालोरा) : ग्रामपंचायतीचा विविध निधींची स्वमर्जीने विल्हेवाट व अफरातफर प्रकरणी करडी (पालोरा) येथील ग्रामविकास अधिकारी जयंत डांगरे यांना निलंबित करण्यात आले आहे. ही कारवाई जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी राहूल द्विवेदी यांनी केली. याप्रकारामुळे गावात चर्चेला उधाण आले आहे.याबाबत असे की, करडी ग्रामपंचायतीच्या निधीच्या बाबतीत तफावत असल्याचे उघडकीला आले होते. या आशयाची माहिती व प्रकरण जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांच्या दालनात पोहचले होते. संपूर्ण प्रकाराची शहानिशा करून सीईओ द्विवेदी यांनी ग्रामविकास अधिकारी डांगरे यांचे निलंबन केले. डांगरे यांच्यावर करडी ग्रामपंचायतीच्या निधीमध्ये अखेर शिल्लक रकमेमध्ये कमी रक्कम दर्शविणे, निधीची अफरातफर करणे, प्रमाणकाशिवाय खर्च करणे, बँकेतून निधीची उचल करणे, परंतु रोकडवहीत नोंद न करणे, इतर विविध निधीचा उपहार करणे आदीचा ठपका ठेवण्यात आला आहे. यासर्व प्रकरणात ते दोषी आढळून आले आहेत.जयंत डांगरे यांच्या निलंबनाचे आदेश दि.६ जून २०१४ रोजी सीईओंच्या स्वाक्षरीनिशी निघाले आहेत. त्यांच्या निलंबनामुळे संबंधित पदाचा प्रभार जांभोरा येथील ग्रामविकास अधिकारी चाणप यांच्याकडे देण्यात आला आहे. डांगरे यांच्या निलंबना समितीची माहिती पंचायत समितीचे खंडविकास अधिकारी आगलावे तथा पंचायत विस्तार अधिकारी लक्ष्मीकांत बोहटे यांनी दिली. या प्रकारामुळे करडी येथे नागरिकांमध्ये चर्चेचा विषय ठरला आहे. (वार्ताहर)